Maharashtra Kesari Live : अंतिम सामन्यात शिवराज राक्षे विजयी, ठरला 65 वा महाराष्ट्र केसरी

| Updated on: Jan 14, 2023 | 11:03 PM

Maharashtra Maharashtra Kesari Live : महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात अखेर पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगरचा मल्ल शिवराज राक्षे विजयी झालाय. या अंतिम सामन्यात त्याची लढत पुण्याचा मल्ल महेंद्र गायकवाड यांच्यासोबत झाली. अतिशय थरार हा सामना ठरला. दोन्ही पैलवान एकमेकांना भारी पडत होते. अखेर शेवटच्या क्षणी शिवराज राक्षेने महेंद्रला कुस्तीच्या आखाड्यात चितपट केलं.

Maharashtra Kesari Live : अंतिम सामन्यात शिवराज राक्षे विजयी, ठरला 65 वा महाराष्ट्र केसरी

पुणे : महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात अखेर शिवराज राक्षे विजयी झालाय. या अंतिम सामन्यात त्याची लढत पुण्याचा मल्ल महेंद्र गायकवाड यांच्यासोबत झाली. अतिशय थरार हा सामना ठरला. दोन्ही पैलवान एकमेकांना भारी पडत होते. अखेर शेवटच्या क्षणी शिवराज राक्षेने महेंद्रला कुस्तीच्या आखाड्यात चितपट केलं.

महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari) अंतिम सामन्याच्या थराराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झाले. माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad)  यांच्यात उपांत्य सामना पार पडला. अतिशय थरारक असा हा सामना बघायला मिळाला. अखेर या थरारक सामन्यात महेंद्र गायकवाडचा विजय झाला.

माती विभागाच्या मल्लांची कुस्ती संपल्यानंतर मॅट विभागाचे शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात उपांत्य फेरीची लढत सुरु झाली. दोन्ही मल्लांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. अखेर 8-2 च्या फरकाने शिवराज राक्षेने मजल मारली.  त्यानंतर दोन्ही उपांत्य फेरीतील विजयी मल्ल आमनेसामने आले.

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jan 2023 08:08 PM (IST)

    ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकल्यानंतर शिवराज राक्षेची पहिली प्रतिक्रिया

    खूप आनंद होतोय. आनंद शब्दांत सांगता येत नाहीय, अशी पहिली प्रतिक्रिया शिवराज राक्षे याने दिली.

  • 14 Jan 2023 07:51 PM (IST)

    शिवराज राक्षेचा धोबीपछाड, ठरला 65 वा महाराष्ट्र केसरी

    शिवराज राक्षे ठरला 65 वा महाराष्ट्र केसरी

    महेंद्र गायकवाड ठरला उपविजेता

  • 14 Jan 2023 07:48 PM (IST)

    शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड, अंतिम सामना सुरु, चुरशीची लढत

    महेंद्र गायकवाडने शिवराज राक्षेचा प्रयत्न हाणून पाडला.

    शिवराज राक्षेला पंचांकडून कुस्ती करण्याची सूचना

    दोघांमध्ये चुरशीची लढत

  • 14 Jan 2023 07:44 PM (IST)

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम थरार, महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे आमनेसामने

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना सुरु

    महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात थरार

  • 14 Jan 2023 07:12 PM (IST)

    ‘महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार’, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे :

    – या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी होताच मामासाहेब मोहोळ यांच्याकडून गदा दिली जाते

    – याचा एक आनंद आपल्याला सर्वांना मिळतो

    – आम्ही पण राजकारणात कुस्ती करतो, पण ती फक्त टीव्हीवर असते

    – ऑलम्पिकमध्ये महाराष्ट्र मेडल मिळवण्यात मागे राहिला का?

    – महाराष्ट्र मिशन ऑलम्पिक सुरू करणार, त्यासाठी बृजभूषण आपली मदत घेणार

    – महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच मेडल मिळवणार

    – आपल्या राज्यात खेळाडूंना 2 वर्षांपासून मानधन मिळत नाही

    – जे 6 हजार मानधन मिळत होते ते आता 20 हजार करूया

    – वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार मानधन आहे ते आता साडे सात हजार करूया

    – महाराष्ट्र केसरी खेळाडूंना राज्य सरकार नोकरीत संधी देणार

    – महिला केसरीसाठी राज्य सरकार मदत करणार

  • 14 Jan 2023 07:09 PM (IST)

    महाराष्ट्र सरकारने मिशन ऑलम्पिकसाठी मदत केली पाहिजे : बृजभूषण सिंह

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील बृजभूषण सिंह यांच्या भाषणातील मुद्दे :

    – महाराष्ट्राच्या धरतीला आणि शिवरायांना वंदन करतो,

    – महाराष्ट्र सरकारने मिशन ऑलम्पिकसाठी मदत केली पाहिजे

    – ऑलम्पिकसाठी महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, तो दूर झाला पाहिजे

    – महिला महाराष्ट्र केसरी संदर्भात विचार केला पाहिजे, महिला कमी नाहीयत

    – रामदास तडस यांनी यावर विचार केला पाहिजे

  • 14 Jan 2023 06:20 PM (IST)

    महाराष्ट्र केसरी अंतिम सामना, महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात रंगणार थरार

    महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना रंगणार

    माती विभागाचे विजयी मल्ल महेंद्र गायकवाड आणि मॅट विभागाचे विजयी मल्ल शिवराज राक्षे यांच्यात लढत होणार

    दोन्ही उपांत्य फेरी पार पडल्यानंतर अंतिम सामन्यासाठी दोन्ही मल्लांना एक तासाचा वेळ देण्यात आलाय

  • 14 Jan 2023 06:15 PM (IST)

    मॅट विभागाचे शिवराज राक्षे विजयी

    मॅट विभागाचे शिवराज राक्षे विजयी

    हर्षवर्धन सदरगीर आणि शिवराज राक्षे यांच्यात चुरशीची लढत झाली

    अखेर 8-2 च्या फरकाने शिवराज राक्षे विजयी

  • 14 Jan 2023 06:12 PM (IST)

    मॅट विभागाचे शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात चुरशीची लढत

    मॅट विभागाचे शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात चुरशीची लढत शिवराज राक्षे – 6, हर्षवर्धन – 1

  • 14 Jan 2023 06:10 PM (IST)

    मॅट विभागाच्या पहिल्या फेरीची समाप्ती, निकाल 0-6

    मॅट विभागाच्या पहिल्या फेरीची समाप्ती, निकाल 0-6

  • 14 Jan 2023 06:09 PM (IST)

    Maharashtra Kesari : शिवराज राक्षे – 5, हर्षवर्धन सदगीर – 0

    महाराष्ट्र केसरी स्पर्धा Live Update :

    शिवराज राक्षे- 5

    हर्षवर्धन सदगीर – 0

  • 14 Jan 2023 06:02 PM (IST)

    मॅट विभागाचा थरार सुरु

    मॅट विभागातील नांदेडचा शिवराज राक्षे (Nanded Shivraj Rakshe) आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Nashik Harshvardhan Sadgir) यांच्यात सामना सुरु झालाय

  • 14 Jan 2023 05:58 PM (IST)

    माती विभागात महेंद्र गायकवाड विजयी

    महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad)  यांच्यात पहिल्या फेरीतील पहिला सामना

    पुण्याचा महेंद्र गायकवाड विजयी

  • 14 Jan 2023 02:03 PM (IST)

    आमदार रवी राणांची बॉक्स क्रिकेट मैदानात तुफान फटकेबाजी

    अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात बॉक्स क्रिकेट, झुंबा डान्स, योगा मैदानच उद्घाटन

    आमदार रवी राणा यांच्याहस्ते संपन्न झाला सोहळा

    यावेळी उद्घाटन झाल्यावर रवी राणांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला

  • 14 Jan 2023 12:57 PM (IST)

    पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याच्या धमकीप्रकरणी एक जण पुणे पोलिसांच्या ताब्यात

    संशयित आरोपीचा पोलिसांकडून तपास सुरू

    पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती

    पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे

  • 14 Jan 2023 11:33 AM (IST)

    Pune Live- टराज ठाकरेंना माझा वैयक्तिक विरोध नाहीट

    ती गोष्ट आता जूनी झाली आहे

    बृजभुषण सिंहाची प्रतिक्रिया

    महाराष्ट्राकडून मला भरपूर प्रेम मिळालं आहे

    महाराष्ट्र सारखा मोठा भाऊ राहिलेला आहे

    महाराष्ट्र केसरीची स्पर्धा होईल आता बघूयात

  • 14 Jan 2023 10:35 AM (IST)

    Nashik Live- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा सत्यजित तांबे यांना विरोध

    -सत्यजित तांबे बंडखोर, महाराष्ट्र शिक्षक सेनेचा आरोप

    -सुधीर तांबे उमेदवार असते, तर मदत केली असती

    -मात्र सुधीर तांबे उमेदवार नसल्याने सत्यजित तांबे यांना पाठिंबा नाही

    -सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसल्याने विरोध

  • 14 Jan 2023 08:40 AM (IST)

    पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार का?

    आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 1.74 टक्क्यांची वाढ

    आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भावात पुन्हा वाढ

    क्रूड ऑईल 85.49 डॉलर बॅरलवर पोहचले

    6 जानेवारी रोजी ब्रेंट क्रूड ऑईलचे भाव 78.57 डॉलर

    ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 8 डॉलर प्रति बॅरलची वाढ

    ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 9 टक्क्यांची वाढ

  • 14 Jan 2023 08:09 AM (IST)

    Kolhapur Live- कोल्हापूर शहरात आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा होणार

    30 जानेवारीपर्यंत येणार एक दिवस आड पाणी

    शिंगणापूर जल उपसा केंद्रातील तांत्रिक अडचणीमुळे महापालिकेचा निर्णय

    ए,बी आणि ई वॉर्डात होणार होणार अपुरा पाणीपुरवठा

    तिन्ही वार्डांना योग्य दाबाने मिळणार पाणी

  • 14 Jan 2023 07:59 AM (IST)

    महाराष्ट्र एकीकरण समितीचा आता चलो मुंबईचा नारा

    27 फेब्रुवारीला महाराष्ट्र एकीकरण समितीचा आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा निर्धार

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमा प्रश्नाकडे वेधणार लक्ष

    महाराष्ट्र सरकार सीमा प्रश्नाकड अजूनही गांभीर्याने पाहत नसल्याची सीमा बांधवांची तक्रार

    महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी करणार धरणे आंदोलन

  • 14 Jan 2023 06:41 AM (IST)

    पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या

    मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश

    आर्थिक नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज

    शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली

    मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

  • 14 Jan 2023 06:38 AM (IST)

    अनधिकृत बांधकामा विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

    शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

    सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी 17 जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    मात्र विकासकांच्या इशाऱ्यावर कारवाई करत असल्याचा आरोप करत जागा मालक व गावकरीने केले ठिय्या आंदोलन

    कल्याण ग्रामीण परिसरातील निळजे गावामधील धक्कादायक घटना

  • 14 Jan 2023 06:30 AM (IST)

    तब्बल 18 तासानंतर पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातलं आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी केलं आंदोलन स्थगित

    उद्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

    मुख्यमंत्र्यांची भेट घेत विद्यार्थी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार

    आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम नाही, विद्यार्थ्यांच्या भावना

  • 14 Jan 2023 06:25 AM (IST)

    कल्याण मधील 17 वर्षीय खेळाडू तरुणीचा त्या अपघातात दुर्देवी मृत्यू

    कबड्डी आणि शॉर्ट बॉल्समध्ये अनेक ठिकाणी झाला होता तिचा सत्कार

    दीक्षा गोंधळी असे या तरुणीचे नाव असून तिची आई आणि वडील हे तिघेही देवदर्शनासाठी शिर्डी जात असताना झाला अपघात

    या अपघातात दीक्षाची आई गंभीर जखमी असून वडील किरकोळ जखमी

    या घटनेने कल्याण शहरावर शोककळा पसरली

Published On - Jan 14,2023 6:13 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.