Maharashtra Live Updates : सोने वधारले तर चांदीच्या दरात घसरण
Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई: बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद अजूनही सुरूच आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
सोलापुरात काळविटांचा अपघात
सोलापुरात अपघातामध्ये 12 काळविटांचा मृत्यू, तर 2 जखमी
नव्याने झालेल्या बायपास रोडवरील अंडरपासवर घडली घटना
काळविटांच्या कळपाला अंडरपासचा अंदाज आला नाही
साधारणपणे चाळीस फुटावरून काळविटांचा कळप खाली पडला
केगावजवळील देशमुख वस्ती येथे घडली घटना
घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि वन विभागाचे अधिकारी दाखल
-
भारतात 2,967 वाघ शिल्लक
देशातल्या वाघांबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर
2018 च्या गणनेनुसार संख्या जाहीर
देशभरात वाघांसाठीचे 53 रिझर्व कॉरिडॉर
जगातल्या वाघांपैकी 70 टक्के वाघ भारतात
केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
-
-
पंढरपूर
शिर्डी आणि तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांना दोन वेळेचा मिळणार प्रसाद
आज पासून दररोज रात्री 8 ते 10 या वेळेस भाविकांना मिळणार श्री विठ्ठलाचा प्रसाद
मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी दिली माहिती
यापूर्वी फक्त दुपारी 12 ते 2 यावेळेतच मिळत होता प्रसाद
रात्रीच्या प्रसादामध्ये सार भात, खिचडी, ताक भात अशा अन्न पदार्थांचा असणार समावेश
जास्तीत जास्त भाविकांनी दोन्ही वेळेस प्रसादाचा लाभ घेण्याचे मंदिर प्रशासनाचे आवाहन
-
सोने वधारले तर चांदीच्या दरात घसरण
आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,800 रुपये
काल सोन्याचा भाव 52,650 रुपये होता
आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,590 रुपये
तर काल 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,420 रुपये होता.
आज चांदीचा भाव 72,200 रुपये किलो
कालपेक्षा चांदीच्या दरात 400 रुपयांची घसरण
-
सत्यजित तांबे यांनी घेतली भैया गंधी यांची भेट
सत्यजित तांबे यांनी घेतली नगरच्या भाजप शहर जिल्हाध्यक्षांची भेट
भाजपच्या शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे आणि सत्यजित तांबे यांची भेट
सत्यजित तांबे यांची प्रचार सभा झाल्यानंतर शहरातील भाजप कार्यालयाजवळ झाली दोघांची भेट
-
-
कोल्हापूर
करवीर तालुक्यातील दोनवडे येथील खळबळजनक घटना
विजेचा शॉक लागल्याचा केला बनाव
दोन मुली झाल्याने पत्नीचा पतीकडून सुरू होता छळ
आश्विनी एकनाथ पाटील यांचा खून
पती एकनाथ पाटील याला पोलिसांनी केली अटक
-
बच्चू कडू यांची परभणीत जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक
परभणी : बैठकीला प्रहार संघटनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी,
बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
परभणीत बच्चू कडू यांची पत्रकार परिषद,
बच्चू कडू थोड्याच वेळात बैठकीसाठी उपस्थित राहणार.
-
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्याबाबत लिहीलं पत्र
कापसाचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात
कापसाला किमान 10 हजार रुपये क्विंटल दर मिळण्याची
सध्या कापसाला 8 हजार रुपये क्विंटल दर
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांचं विविध नेत्यांना चौथ पत्र
-
धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय कधी?
निवडणूक आयोग देणार अंतिम निर्णय
30 जानेवारीला ठाकरे आणि शिंदे गट लेखी म्हणणं पाठवणार
ठाकरे गटाकडून वकिलांशी दीर्घकाळ चर्चा झाल्याची माहिती
सोमवारी सकाळी ठाकरे गटाकडून मेल पाठवला जाणार
शिंदे गटाकडूनही तज्ज्ञ वकिलांशी चर्चा
सोमवारी निवडणूक आयोगात सुनावणी होणार नाही
-
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीला खुली ऑफर
औरंगाबाद : एमआयएम पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करायला तयार,
एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली ऑफर,
भाजपला रोखायची महाविकास आघाडीची इच्छा असेल तर आम्ही सोबत निवडणुका लढवायला तयार,
प्रकाश आंबेडकर यांच्या शिवसेनेच्या युतीनंतर एमआयएमची महाविकास आघाडीला ऑफर.
-
नवीन संसदेत देखील बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावा
नाशिक – छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र,
केंद्र सरकारशी पत्र व्यवहार करून लवकर निर्णय घेण्याची केली मागणी,
विधान भवनानंतर आता लोकसभेत देखील लागणार बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र ?
-
डोंबिवलीत धक्कादायक प्रकार
भरदिवसा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी केला लैंगिक अत्याचार
पोलीस असल्याचे खोटे सांगत करत केला लैंगिक अत्याचार
तरुणी आपल्या मित्रासोबत खाडी परिसरात फिरायला गेली असताना घडला प्रकार
विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तपास सुरू
आरोपी शोधासाठी पोलिसांकडून तीन पथक रवाना
-
ओबीसी मंत्रालयाकडून ओबीसींच्या घरांसाठी आता नवी योजना
औरंगाबाद : ओबीसी समाजातल्या गरिबांना घर बांधण्यासाठी ओबीसी मंत्रालय देणार अनुदान,
सावित्रीबाई फुले आवास योजना असं या योजनेचे नाव,
या योजनेतून ओबीसींना घर बांधण्यासाठी केली जाणार आर्थिक मदत,
ओबीसी मंत्रालयाची मोठी घोषणा,
ओबीसी मंत्रालयाचे मंत्री अतुल सावे यांनी केली घोषणा.
-
सुखोई 30 आणि मिराज 2000 या विमानांना मोठा अपघात
सुखोई 30 आणि मिराज 2000 या विमानांना मोठा अपघात
अपघातात 2 जणांचा मृत्यू
अपघात स्थळी बचाव कार्य सुरू
दोन्ही विमानांनी ग्वालियर विमानतळावरून उड्डाण केलं होतं
प्रशिक्षणार्थी पायलट विमान चालवत असल्याची प्राथमिक माहिती
-
एकाच दिवसांत दोन लढाऊ विमाने कोसळले
भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांचा अपघात
राजस्थानमधील भरतपूर येथे एक विमान कोसळले
मध्य प्रदेशातील मुरैना येथेही हवाई दलाच्या विमानाचा अपघात
-
विधानपरिषद शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस, अजित पवार मात्र खासगी दौऱ्यावर
अजित पवार यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना व भुम येतील बानगंगा – आयान साखर कारखान्याची अचानक पाहणी
पवार यांचा कारखाना दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता
निवडणुकीच्या वातावरनात पवार मात्र साखर पेरणीत
अजित पवार हे आज त्यांच्या ताब्यातील कारखाने यांचा घेणार आढावा
भल्या पहाटे 6 वाजता केली भाऊसाहेब बिराजदार कारखान्याची पाहणी
-
चार दिवस बँकांना कुलूप
देशातील बँकांचे कामकाज होणार ठप्प
सरकारी धोरणांविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना आक्रमक
30 आणि 31 जानेवारी दिली संपाची हाक
28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार
सलग चार दिवस बँका राहतील बंद
सलग 4 दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांना मोठा फटका
एटीएममध्ये रोख रक्कम संपण्याची शक्यता
धनादेशांचा निपटारा न झाल्याने येऊ शकते अडचण
-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांचं निधन
कुलगुरू दिलीप मालखेडे बऱ्याच दिवसापासून होते आजारी
पुणे येथे कॅन्सर झाल्याने घेत होते उपचार
उपचारा दरम्यान दिलीप मालखेडे यांचं निधन
-
यवतमाळ : दोन गटात राडा,राड्यात तब्बल १२ जण गंभीर जखमी
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात १२ जण गंभीर जखमी
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील देऊरवाडी बुटले येथे रात्री दरम्यान दोन गटात झाला राडा
राड्यासाठी पुण्यावरून बोलावण्या आले होते युवकांना लठ्याकाठ्या घेऊन
यवतमाळ सह काहींना उपचारासाठी नागपूर हलविले
सर्वच गंभीर जखमीना डोक्यावर मार
-
पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव काय
कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 106.52 पेट्रोल आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.91 आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 106.14 आणि डिझेल 92.66 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर
-
चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
पिंपरी चिंचवड : शहर काँग्रेसने आज मागविले इच्छुक उमेदवाराचे अर्ज,
शहराध्यक्ष कैलास कदम यांची माहिती,
आज 10 वाजता शहराध्यक्ष यांच्या कार्यालयात स्वीकारणार इच्छुकांचे अर्ज,
इच्छुक उमेदवारांचे येणारे अर्ज पक्षश्रेष्ठीं कडे सादर करणार.
-
चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
शहर काँग्रेसने आज मागविले इच्छुक उमेदवाराचे अर्ज
शहराध्यक्ष कैलास कदम यांची माहिती
आज 10 वाजता शहराध्यक्ष यांच्या कार्यालयात स्वीकारणार इच्छुकांचे अर्ज
इच्छुक उमेदवारांचे येणारे अर्ज पक्षश्रेष्ठींकडे सादर करणार
-
राज्यातील पोलीस दलामधील 1480 बँडसमन पदे कधी भरली जाणार असा औरंगाबाद खंडपीठाचा प्रश्न
औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने गृहविभाग तसेच राज्याचा पोलीस महासंचालकांना केली विचारणा,
राज्यभर पोलीस बँडसमन पदाची गरज असताना मेगाभर्तीमध्ये केले जाते दुर्लक्ष,
जाहिराती अभावी रोजगाराच्या संधीपासून उमेदवार मुकणार अशी भीती वाटताच औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल,
20 फेब्रुवारी रोजी होणार पुढील सुनावणी.
-
पदवीधर निवडणुकीत प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
पदवीधर निवडणुकीत प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस
प्रचाराचा शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज नाशिकमध्ये मेळावा घेणार
सत्यजित तांबे यांचा मात्र डोर टू डोअर प्रचारावरच भर
शुभांगी पाटील यांची देखील प्रत्यक्ष गाठीभेटींवर भिस्त
आज संध्याकाळी पाच वाजता प्रचार संपणार
-
नाशिक पोलिसांच्या 102 या मदत कक्षाला बॉम्ब पेरल्याची माहिती मिळालीये
नाशिक पोलिसांच्या 102 या मदत कक्षाला बॉम्ब पेरल्याची माहिती मिळालीये
नाशिक शहरातील द्वारका आणि सारडा सर्कलजवळ बॉम्ब पेरल्याची माहिती मिळाल्याने खळबळ उडालीये
पोलीस बॉम्बशोधक पथकासह घटनास्थळी दाखल
मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने अफवा असल्याचं समोर आलं
फेक कॉल करणारा संशयित गोकुळ तवणार हा मनोरुग्ण असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न
-
चरण वाघमारे यांनी भंडारा पोलिसांना केली सुरक्षा पुरविण्याची मागणी
भंडारा : माजी आमदार चरण वाघमारे यांनी भंडारा पोलिसांना केली सुरक्षा पुरविण्याची मागणी,
धान्य घोटाळ्यातील आरोपीची माजी आमदारांना भीती,
चरण वाघमारे यांना भीती वाटत असल्याने भंडारा पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली,
सूरक्षा देण्यास पोलिस हलगर्जीपणा करत असल्याच्या आरोप वाघमारे यांनी केला आहे.
-
ब्लड बँकेत आग, फ्रिजचे नुकसान, जीवितहानी नाही
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली
मात्र तात्काळ उपाययोजना केल्याने आग आटोक्यात आली
या आगीत रक्त साठवण्यासाठी असलेले फ्रिज व इतर वस्तूंचे नुकसान झाले
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
-
अकोला जिल्हात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू
बार्शीटाकळी तालुक्यातल्या कान्हेरी येथील शेत शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या दोन्ही यूवकांचा बुडून मृत्यू
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यकर्त्यांनी काढले दोन्ही मृतदेह बाहेर
-
चिमुकल्यांना चॉकलेट देताना सावधान! जेलीने घेतला 9 महिन्याच्या बाळाचा जीव
रत्नागिरी जिल्ह्यातील धक्कादायक घटना
रत्नागिरीच्या गुहागरमधील साखरी आगार येथील घटना
9 महिन्याच्या बाळाच्या घशात जेलीचे चॉकलेट अडकल्याने मृत्यू
श्वास घेता न आल्यामुळे बाळाचा तडफडून मृत्यू, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
गुहागरमधील साखरी आगर गावातील ही दुदैवी घटना घटना आहे
बाळाच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी गावातील डॉक्टरकडे नेले
मात्र, येथील डॉक्टरच्या सल्ल्यावरुन त्याला घोणसरे येथे नेत असताना रस्त्यातच या बाळाचा मृत्यू झाला
-
अमरावती जिल्ह्यातील एसटी आगारातील बंद पडलेले स्वतःच्या मालकीचे डिझेल पंप एसटी महामंडळ पुन्हा सुरू करणार
एसटी महामंडळ आता पुन्हा थेट डिझेल कंपनीकडून डिझेल खरेदी करून पंप सुरू करणार
अमरावती व परतवाडा आगारात दोन दोन तर सहा आगारात प्रत्येकी एक डिझेल पंप
आतापर्यंत खाजगी पेट्रोल पंपाकडून खरेदी केले जात होते डिझेल
Published On - Jan 28,2023 6:38 AM