Maharashtra Live Updates : सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा आहे की नाही? सस्पेन्स कायम

| Updated on: Jan 30, 2023 | 6:14 AM

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Live Updates : सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा आहे की नाही? सस्पेन्स कायम
Maharashtra Latest Breaking News Image Credit source: tv9 marathi

मुंबई: इराणमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, 440 जखमी. उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये गर्दीत ट्रक घुसला, 5 जणांचा मृत्यू, अनेक जखमी. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Jan 2023 07:46 PM (IST)

    Entertainment News Live: शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबाहेर चाहत्यांची तुंबड गर्दी

    ‘पठाण’ चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर ‘मन्नत’ बंगल्याबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची गर्दी

    शाहरुखने मानले चाहत्यांचे आभार

  • 29 Jan 2023 07:43 PM (IST)

    Cricket News Live: अंडर 19 महिला T-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा विजय

    भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून केला पराभव

    दक्षिण आफ्रिकेत पार पडला सामना

  • 29 Jan 2023 05:05 PM (IST)

    पुण्यात सिंहगड रोडवर पुन्हा अपघात

    पीएमपी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक

    दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना

    सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक हद्दीत झाला अपघात

  • 29 Jan 2023 04:14 PM (IST)

    Entertainment News Live: महेश बाबूच्या भावाचा पत्नीवर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप

    तेलुगू अभिनेता नरेश बाबूचा पत्नी रम्या रघुपतीवर गंभीर आरोप

    रम्याने जीवे मारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्सना दिली सुपारी- नरेश बाबू

    नरेशची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी, वाचा सविस्तर

  • 29 Jan 2023 04:10 PM (IST)

    Entertainment News Live: 12 दिवसांच्या पतीने अभिनेत्रीसाठी मृत्यूपत्रात सोडले तब्बल 81 कोटी रुपये

    हॉलिवूड अभिनेत्री पामेला अँडरसनच्या पूर्वाश्रमीच्या पतीने मृत्यूपत्रात तिच्यासाठी सोडली खूप मोठी रक्कम

    जॉन पीटर्सने पामेलासाठी मृत्यूपत्रात तब्बल 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 81 कोटी रुपयांहून अधिक रक्कम सोडली

    जॉन पीटर्स हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता

    नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला खुलासा, वाचा सविस्तर

  • 29 Jan 2023 01:32 PM (IST)

    आमदार रवी राणा यांचा मोठा दावा

    अमरावती पदवीधर मतदारसंघात उभे असलेल्या 23 पैकी 9 ते 10 उमेदवार माझ्या संपर्कात

    भाजपचे डॉ. रणजित पाटील निवडुन आल्यानंतर ते विजयी निवडणुकीत येतील, त्यांनी आजच माघार घेतली आहे

    काँग्रेसचे धिरज लिंगाडे यांची भाजपमध्ये यायची तयारी आहे

    तुम्ही निवडणूक आले की त्यांना भाजपमध्ये घेऊन घ्या

    आमदार रवी राणा यांचा मोठा दावा

  • 29 Jan 2023 12:07 PM (IST)

    प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणूकांच रणशिंग फुंकलं

    प्रकाश आंबेडकरांनी आगामी निवडणूकांच रणशिंग फुंकलं

    वंचित बहुजन आघाडीची पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात विराट सभा

    प्रकाश आंबेडकर करणार उद्या सभेला संबोधित

    सायंकाळी 5 वाजता कोल्हेवाडीत जाहीर सभा

    ठाकरे आणि वंचितची युती झाल्यानंतर उद्या पहिलीच जाहीर सभा

    प्रकाश आंबेडकर सभेत काय बोलणार ?

  • 29 Jan 2023 11:51 AM (IST)

    महाकुंभात तब्बल 75 क्विंटलचा मनाचा मालपुरीचा महाप्रसाद

    जामनेर गोद्री येथील गोर बंजारा व लबाना – नायकडा महाकुंभात तब्बल 75 क्विंटलचा मनाचा मालपुरीचा महाप्रसाद

    महाप्रसादासाठी 25 क्विंटल गव्हाचे पीठ 50 क्विंटल गुळ आणि दीड क्विंटल शुद्ध तुपात मालपुरीचा महाप्रसाद

    महाकुंभ परिसरात रात्रीपासूनच महाप्रसादासाठी सुरुवात

    कुंभात लाखो भाविकांना मिळणार मानाच्या मालपुरीचा प्रसाद

  • 29 Jan 2023 11:08 AM (IST)

    बातमी म्हणजे इम्पॅक्ट! Tv9 मराठीच्या बातमीचा दणका…

    Tv9 मराठीच्या बातमीचा दणका

    आळंदीमधील इंद्रायणी नदी पात्रात रसायनयुक्त पाणी सोडल्याप्रकरणी सहा कंपनी मालकावर गुन्हा दाखल

    महापालिकेच्या घरगुती सांडपाणी वाहिण्याद्वारे कंपन्यातील रसायन युक्त पाणी नदी पत्रात सोडल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केलाय

    या प्रकरणात पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात असणाऱ्या सहा कंपनी मालकांविरोधात गुन्हा दाखल

    महापालिकेच्या जलनि:सारण विभागाने गुन्हा दाखल केलाय

  • 29 Jan 2023 11:06 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोट निवडणूक अपडेट

    चिंचवड विधानसभा पोट निवडणूक अपडेट

    -चिंचवड विधानसभा आणि कसबा पेठ पोटनिवडणूक संदर्भात काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक

    -2 फेब्रुवारीला मुंबई मधील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे

    -पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम यांना बैठकीला उपस्थित राहण्याबाबत प्रदेश कार्यालयातुन पत्र

    -चिंचवड विधानसभा पोट निवडणूक उमेदवारी संदर्भात ही बैठक

  • 29 Jan 2023 10:48 AM (IST)

    मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतली खासदार उदयनराजे भोसले यांची भेट

    अमित ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर

    मनसेच्या संघटन बांधणीसाठी अमित ठाकरे साताऱ्यात

    उदयनराजे भोसले यांची घेतली सदिच्छा भेट

  • 29 Jan 2023 10:47 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड

    औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड

    पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा धक्कादायक प्रकार

    सरपंच पद साडे चौदा लाखात तर उपसरपंच पद 4 लाखात विकल्याचा प्रकार

    सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत लागली बोलू

    गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून केला ग्रामपंचायत पदांचा लिलाव

    सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा केला बनाव

    ग्रामपंचायत लिलावाचा व्हिडीओ लागला टीव्ही 9 मराठीच्या हाती

    सरपंच पदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा केला इन्कार

    गावातील नागरिकांकडून लिलावाचा जाहीर कबुली

    शकुंतला योगेश ससेमहल असं साडे चौदा लाख रुपये देऊन सरपंच पदी निवडून आलेल्या महिलेचे नाव

    राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव

    मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचाने उघड केला प्रकार

  • 29 Jan 2023 10:31 AM (IST)

    महाराष्ट्र, कर्नाटकात ईडीची छापेमारी

    मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकात अंमलबजावणी संचालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत एका कर्मचाऱ्याने सरकारला तब्बल 263 कोटींत गंडवल्याचं उघड झाले आहे. सविस्तर वाचा

  • 29 Jan 2023 10:17 AM (IST)

    सरकारची नवरत्न कंपनी देणार लाभांश

    भारत इलेक्ट्रॉनिक्स BEL देणार 60 टक्क्यांचा डिव्हिडंड

    शनिवारी कंपनीचे तिमाही निकाल जाहीर

    10 फेब्रुवारी 2023 रोजी रेकॉर्ड तारीख निश्चित

    यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने दिले 2:1 बोनस शेअरचे गिफ्ट

  • 29 Jan 2023 10:10 AM (IST)

    अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक; काही वेळातच मतदान साहित्य होणार मतदान केंद्रावर रवाना

    अमरावती विभागात एकूण 262 मतदान केंद्रे तर अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 75 मतदान केंद्रे

    अमरावती विभागातील 2 लाख 6 हजार 177 पदवीधर मतदार बजावणार उद्या मतदानाचा अधिकार

    2 तारखेला अमरावतीच्या नेमानी गोडाऊनमध्ये होणार मतमोजणी

    अमरावतीत भाजपचे रणजित पाटील तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात

  • 29 Jan 2023 08:42 AM (IST)

    देशात पेट्रोल डिझेल होईल स्वस्त?

    आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव गडगडले

    डबल्यूटीआई क्रूड 80 डॉलर प्रति बॅरलवरुन 79.68 डॉलर प्रति बॅरलवर

    मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर

    अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर

    औरंगाबाद 106.42 पेट्रोल आणि डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर

    नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

    नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर

    लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर

    कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर

    पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर

    सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर

  • 29 Jan 2023 08:15 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवड आणि मावळ दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवड आणि मावळ दौऱ्यावर

    पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मधील इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप समारंभासाठी उपस्थित राहणार

    तर मावळातील देहू मधील संत तुकाराम महाराज मंदिरात आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर दर्शनासाठी जाणार

  • 29 Jan 2023 08:14 AM (IST)

    चांदखेड हद्दीत बेकायदा पिस्तूल व काडतुसे बाळगलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

    -चांदखेड हद्दीत बेकायदा पिस्तूल व काडतुसे बाळगलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

    -बेकायदा पिस्तूल व तीन जिवंत काढत असे बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केल्याची घटना कासारसाई बेबड ओहोळ रस्त्यावर घडली

    -आकाश वैरागर असं बेकायदा पिस्तूल व काडतुसे बाळगलेल्या आरोपीचे नाव

    -या आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे

    -शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत तीन दिवसात तीन बेकायदा पिस्तूल बाळगलेल्या दोन आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे

  • 29 Jan 2023 08:07 AM (IST)

    कोल्हापुरात कैद्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण

    कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खळबळजनक प्रकार

    पुण्यातला मोक्कामधील आरोपी सागर रजपूत याने केली मारहाण

    मारहाणीत पोलीस शिपाई रुपेश ढमाले किरकोळ जखमी

    कळंबा कारागृहाच्या अतिसुरक्षा विभागात घडला प्रकार

    घटनेप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 29 Jan 2023 07:29 AM (IST)

    शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न करत असल्याच्या संशयातून परप्रांतीय तरुणांना चोप

    कोल्हापूरच्या वाशी गावातील घटना

    ब्लँकेट विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणांना चोप देत ग्रामपंचायत कार्यालयात ठेवले डांबून

    घटनेमुळे गावात काही काळ तणाव

    करवीर पोलिसांकडून संबंधित तरुणांची चौकशी

    चौकशीनंतर गैरसमजातून प्रकार घडल्याच आलं समोर

  • 29 Jan 2023 06:24 AM (IST)

    टाटा इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी पाहिली बीबीसी डॉक्यूमेंट्री

    TISS कॅम्पसमध्ये 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पाहिली BBC डॉक्युमेंटरी

    PSF च्या विद्यार्थ्यांचा दावा

    विद्यार्थीनी लॅपटॉपवर पाहिली डॉक्युमेंटरी

    डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर त्यावर चर्चाही करण्यात आली

    भाजप युवा मोर्चाने केला होता विरोध

  • 29 Jan 2023 06:20 AM (IST)

    नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटनासमोर

    एका अपल्पवयीन मतिमंद मुलीवर केले लैंगिक अत्याचार

    दोन जणांनी केले लैंगिक अत्याचार

    गाडीत बसवून एका अज्ञात स्थळी नेऊन केले लैंगिक अत्याचार

    सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही आरोपींना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात

    24 तासात घेतले ताब्यात. अखिलेश पासी आणि संतोष पासी अशी आरोपींची नावे

  • 29 Jan 2023 06:18 AM (IST)

    इराण भूकंपाने हादरले, 7 जणांचा मृत्यू

    इराणमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप

    आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू, 440 जखमी

    मृतांचा आकडा वाढण्याची भीती

  • 29 Jan 2023 06:14 AM (IST)

    सोलापुरात अपघातामध्ये 12 काळविटांच्या मृत्यू, 3 काळवीट जखमी

    काळवीट पडल्याची घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला दुर्दैवी प्रसंग

    सोलापूर-विजयपूर रोडवरील नव्याने झालेल्या बायपास रोडवरील अंडरपासवर घडली घटना

    मी रस्त्यावरून जात होतो त्यावेळी अचानक रस्त्यावरून काहीतरी फेकले असे वाटले मात्र व्यवस्थित पाहिल्यावर काळवीट असल्याचे दिसले

    काळविटाच्या कळपाला अंडरपासचा अंदाज न आल्याने साधारणपणे चाळीस फुटावरून काळवीटांचा कळप खाली रस्त्यावर पडला

    केगाव जवळील देशमुख वस्ती येथे ही दुर्दैवी घडली घटना

    यापूर्वीदेखील काही काळवीट मेले आहेत, मात्र इतक्या मोठ्याप्रमाणात पहिल्यांदाच पहिले

  • 29 Jan 2023 06:12 AM (IST)

    अमरावतीच्या छत्री तलावावर एकशे अकरा फूट हनुमानाची मूर्ती उभारण्याचा खासदार नवनीत राणांचा संकल्प

    पुतळा व मंदिर उभारण्यासाठी एक रुपया व एक वीट देण्याचं खासदार राणांचे आवाहन

    अमरावतीमधील बुधवारा भाजी बाजारमध्ये भव्य हनुमान चालीसा पठणाला राणांची उपस्थिती

    धर्माला पुढे आणण्यासाठी व धर्माला मोठं करण्यासाठी मी एक वर्षापासून लढत आहे, राणा यांचं विधान

Published On - Jan 29,2023 6:08 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.