धारावीत सिलिंडरचा स्फोट, 14 जण होरपळले; दोघांची प्रकृती चिंताजनक

धारावीतील शाहू नगरात एका घरात गॅस सिलिंडर स्फोट होऊन झालेल्या स्फोटात 14 जण होरपळले आहेत. (14 injured in cylinder blast in Dharavi in Mumbai)

धारावीत सिलिंडरचा स्फोट, 14 जण होरपळले; दोघांची प्रकृती चिंताजनक
cylinder blast in Dharavi
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 2:53 PM

अक्षय मंकनी, मुंबई: धारावीतील शाहू नगरात एका घरात गॅस सिलिंडर स्फोट होऊन झालेल्या स्फोटात 14 जण होरपळले आहेत. त्यातील 12 जण किरकोळ भाजले असून 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. (14 injured in cylinder blast in Dharavi in Mumbai)

धारावीच्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी 12.28च्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिन आइणइ एका जेटीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दोघे 70 टक्के भाजले

एकूण 14 जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 12 जण किरकोळ भाजले आहेत. तर 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे दोघे 70 टक्के भाजल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डॉ. सायली यांनी सांगितलं.

धावपळ आणि आक्रोश

गॅस सिलिंडरचा स्फोट होताच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. क्षणात आगीने पेट घेतला. त्यामुळे या घरातील आणि आजूबाजूच्या घरातील 14 जण या आगीत होरपळले गेले. त्यामुळे स्थानिकांचा एकच आक्रोश सुरू झाला. तसेच आग विझवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. यावेळी काही लोकांनी आगीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ आग नियंत्रणात आणली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात नेण्यता आले.

महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महापौर पेडणेकर घटनेची माहिती घेण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. धारावीमध्ये खूप दाटीवाटीचा परिसर आणि निमुळत्या गल्ल्याचां परिसर असल्यामुळे हा सिलेंडरचा स्फोट आजूबाजूच्या दोन ते तीन घरांपर्यंत पसरलेला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान आणि आणि स्थानिक पोलिस दाखल झालेले आहेत. संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. नुकसान झालेल्या घरांची माहिती घेतली जात असून सध्या पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. (14 injured in cylinder blast in Dharavi in Mumbai)

संबंधित बातम्या:

दोन्ही मुली झाल्याने पतीचा संताप, पुण्यात महिलेला नग्न करुन भोंदूबाबाचा अंगारा फासला

बिझनेससाठी पाच लाख आणण्याचा तगादा, पत्नी माहेरी जाताच मुख्याध्यापकाने थाटला दुसरा संसार

सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या

(14 injured in cylinder blast in Dharavi in Mumbai)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.