AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काय वाटतं? ‘मातोश्री’ येथील भेटीनंतर केजरीवाल काय म्हणाले?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांमधील घडामोडींवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातून शिवसेना पक्ष गेलाय. त्यावर केजरीवाल यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेली, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काय वाटतं? 'मातोश्री' येथील भेटीनंतर केजरीवाल काय म्हणाले?
| Edited By: | Updated on: Feb 24, 2023 | 9:21 PM
Share

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान (Bhagwan Maan) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर तीनही नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी केजरीवाल यांनी महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांमधील घडामोडींवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष गेलाय. त्यावर केजरीवाल यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. विशेष म्हणजे केजरीवाल या घडामोडींकडे नेमकी काय प्रतिक्रिया देतात? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. अखेर केजरीवाल यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिलीय.

“गेल्या काही दिवसांत जो काही घटनाक्रम घडला, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली. त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरीला गेलं. त्यांचं सर्व चोरी करुन गेले. पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, त्यांचे पिता बाळासाहेब ठाकरे वाघ होते. आणि ते वाघाचे पुत्र आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळेल, अशी मी आशा बाळगतो. ते येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बाजी मारणार”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

‘उद्धव ठाकरेंच्या भेटीची अनेक दिवसांपासून इच्छा’

“मी उद्धव ठाकरे यांचं धन्यवाद मानतो. त्यांनी आम्हाला चहासाठी आमंत्रित केलं. त्यांच्यासोबत विश्वातील अनेक विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या भेटीची माझी अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. विशेषत: कोरोना काळात मला आठवतं की, जेव्हा कोरानाचा हाहाकार सुरु होता तेव्हा आम्ही एकमेकांपासून शिकत होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. दिल्लीच्या लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्रापासून अनेक गोष्टी शिकल्या”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.

बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

“आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. आज देशाची परिस्थिती काय आहे त्यावर चर्चा झाली. देशातील तरुण आज बेरोजगारीने त्रस्त आहे. तरुणांना नोकरी मिळत नाहीय. दोन कोटी तरुणांना नोकरी देणार असं आश्वासन देण्यात आलेलं. पण त्यांना नोकरी मिळालेली नाही. सर्वसामान्यांना पेलवत नाही इतकी महागाई वाढली आहे. काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी केंद्र सरकार देशाला गहाण ठेवत आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांना विकत आहे”, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

“आम्ही आपसात का लढतात? आपसात का गुंडागर्दी करायची? दिल्लीत महापौर आमचाच असायला हवा. महापौरच्या निवडीसाठी आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागतं”, असा खेद त्यांनी यावेळी व्यक्त केली. “ईडी आणि सीबीआयचा वापर कायर लोग करतात. करु द्या. त्यांना भीती वाटते. त्यांना अटक करायचीय तर करु द्या. पण सत्याचा विजय होतो”, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.