BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; आज महत्त्वाची बैठक

पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे.

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; आज महत्त्वाची बैठक
bjp
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 10:50 AM

मुंबई: पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. (bjp’s meeting today ahead of mumbai corporation election)

आज दुपारनंतर भाजपची ही बैठक होणार असल्याचं सांगण्यात येतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, अतुल भातखळकर, खासदार मनोज कोटक आणि पालिकेतील काही नगरसेवक आदी नेते या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येते. या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की अन्य कुणाला सोबत घ्यायचं यावरही चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट

दरम्यान, शिवसेना महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा घाट घालत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी गेल्या आठवड्यात केला होता. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. निवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत का? निवडणुका पुढे ढकलल्या आणि नाही ढकलल्या तर काय प्लान असेल यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश

दरम्यान, या बैठकीत भाजपच्या सर्व विद्यमान नगरसेवकांना आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार थोड्या मतांनी पराभूत झाले, त्या मतदारसंघांसाठी या बैठकीत खास रणनीती तयार करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

गुजराती व्होटर वळवण्यासाठी चर्चा?

या बैठकीत मुंबईतील गुजराती समाज भाजपकडेच कसा राहील यावर रणनीती ठरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मधल्या काळात शिवसेनेने गुजराती समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मेळाव्यांचं आयोजन केलं होतं. तसेच काही गुजराती नेत्यांना पदही दिली होती. त्यामुळे गुजराती समाज शिवसेनेकडून जाण्यापासून कसा रोखता येईल, त्या दृष्टीनेही या बैठकीत खल होणार असल्याचं सांगण्यात येतं.

मनसे सोबत युती होणार?

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. मात्र, काँग्रेसचे काही नेते अजूनही आघाडी करण्याची भाषा करत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीबाबतची काँग्रेसची ठोस भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपची रणनीती काय असेल? मनसेबरोबर युती करता येऊ शकते का? मनसेचा प्रांतवाद बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर एकत्रित येता येईल का? या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (bjp’s meeting today ahead of mumbai corporation election)

संबंधित बातम्या:

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

(bjp’s meeting today ahead of mumbai corporation election)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.