मुंबई तुंबू नये म्हणून पालिका अ‍ॅलर्ट; रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

पावसाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे यंदाही मुंबापुरीची तुंबापुरी होऊ नये म्हणून महापालिकेने कंबर कसली आहे.

मुंबई तुंबू नये म्हणून पालिका अ‍ॅलर्ट; रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना
Iqbal singh Chahal
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 6:32 PM

मुंबई: पावसाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे यंदाही मुंबापुरीची तुंबापुरी होऊ नये म्हणून महापालिकेने कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज शहरातील विविध एजन्सींची एक बैठक बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. तसेच पावसाने जोर पकडण्याआधीच आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. (BMC chief Chahal holds pre-monsoon review meeting)

आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील पावसाळाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांच्यासह संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई पोलीस, मध्य व पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो इत्यादी संस्थांचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

आयुक्तांच्या सूचना

>> नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ तातडीने हटवून ठरवून दिलेल्या ठिकाणी हा गाळ टाका.

>> सर्व 24 विभागांमध्ये पर्जन्य जल वाहिन्या खात्याच्या चमूसह इतर सर्व चमू सुसज्ज व तैनात आहेत. तसेच ज्या परिसरांमध्ये पाण्याचा निचरा कमी वेगाने होत असल्याचा अनुभव आहे, अशा सर्व ठिकाणी उदंचन संच (De-watering Pump) बसविण्यात आले आहेत. तसेच या संचांना डिझेलचा पुरेसा साठा असल्याची खातरजमा वेळोवेळी करण्यात येत आहे. याबाबत सर्व विभागांमध्ये रंगीत तालिम (Mock Drill) देखील घेण्यात आली आहे.

>> सर्व 24 विभागांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी पावसाळी जाळ्या (Water Entrance) आहेत, तसेच ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणाऱ्या पावसाळी जाळ्या (Water entrence); इत्यादींची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करा. त्याचबरोबर पावसाळी जाळ्यांबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी कामे करायची असेल तर ती तातडीने करून घ्या.

>> 24 विभागांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी ‘मॅनहोल’ आहेत, तसेच ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो, अशा परिसरांमध्ये असणारे ‘मॅनहोल’; इत्यादींची तपासणी विभाग स्तरावर वेळोवेळी करा. त्याचबरोबर याबाबत साफसफाई, दुरुस्ती, परिरक्षण आदी जी कामे करणे गरजेचे असेल, ती कामे देखील वेळोवेळी व वेळेत करवून घ्या.

>> गेल्यावर्षीच्या पावसाळ्यादरम्यान मुंबई सेंट्रल परिसरातील नायर रुग्णालय व ‘बी’ विभाग कार्यक्षेत्रातील जे. जे. रुग्णालय; या 2 महत्त्वाच्या व मोठ्या रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात पाणी साचल्याचे निदर्शनास आले होते. ही बाब लक्षात घेता, या दोन्ही रुग्णालयांच्या स्तरावर पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत असल्याची व्यवस्था सक्षम असल्याची खातरजमा वेळोवेळी करून घ्या.

>> सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्राची दररोज पाहणी करावी. या अंतर्गत पावसाळाविषयक कार्यवाही, नालेसफाई, मॅनहोल, वृक्ष व वृक्ष छाटणी इत्यादींची कामे व्यवस्थित व वेळेत होत आहेत का? याची नियमितपणे पाहणी करा.

>> विद्युत वितरण कंपन्यांनी काही खोदकाम केले असल्यास ही कामे पूर्ववत करून घ्या. वेळेत हे काम पूर्ण करा.

>> मुंबई मेट्रोची कामे ज्या ठिकाणी सुरू आहेत, त्या ठिकाणी योग्यप्रकारे बॅरिकेड्स लावा. तसेच बॅरिकेड्स व्यवस्थित लावलेली आहेत की नाही याची खातरजमा करून घ्या.

>> महापालिकेच्या सर्व 7 मंडळांचे उप आयुक्त / सह आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर मुंबई मेट्रो, एम. एम. आर. डी. ए., म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोलीस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि संबंधित संस्थांसोबत संयुक्त बैठकांचे तातडीने आयोजन करा. या संस्थांशी सातत्याने समन्वय ठेवा.

>> शहरातील धोकादायक इमारतींबाबत आवश्यक ती कार्यवाही सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार (SoP) तातडीने करून घ्या. तसेच म्हाडाच्या अखत्यारितील इमारतींबाबत देखील योग्य ती कार्यवाही करा.

>> आपत्कालीन व्यवस्थापनाचा भाग म्हणून सर्व 24 विभागात तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करा. संभाव्य गरज लक्षात‌ घेऊन या ठिकाणी अन्न व पाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन करा.

>> मुंबई अग्निशमन दलाच्या स्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजना व नियोजन याबाबत वेळोवेळी आढावा घेण्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी यांना निर्देश. (BMC chief Chahal holds pre-monsoon review meeting)

संबंधित बातम्या:

ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; पालिका आयुक्तांची भर पावसात नालेसफाईची पाहणी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना, ठाणे महापालिका ऑन अ‍ॅक्शन मोड

Maharashtra Coronavirus LIVE Update :वाशिम जिल्ह्यात आढळले 71 नवे रुग्ण, 108 जणांना डिस्चार्ज 

(BMC chief Chahal holds pre-monsoon review meeting)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.