AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई मनपाकडून खासगी लसींचे दर जाहीर, कोव्हिशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, तर स्पुतनिक व्हीची किंमत किती?

मुंबईत लसीकरण मोहीम अधिक वेगाने करण्यात येणार आहे. यावेळी खासगी रुग्णालयाने लसींसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करू नये म्हणून महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांसाठी लसींचं दरपत्रक (vaccine rate) जाहीर केलं आहे.

मुंबई मनपाकडून खासगी लसींचे दर जाहीर, कोव्हिशिल्ड 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, तर स्पुतनिक व्हीची किंमत किती?
कोरोना लसीकरण
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 4:32 PM
Share

मुंबई: मुंबईत लसीकरण मोहीम अधिक वेगाने करण्यात येणार आहे. यावेळी खासगी रुग्णालयाने लसींसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करू नये म्हणून महापालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयांसाठी लसींचं दरपत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयात कोव्हिशिल्डसाठी 780 रुपये, कोव्हॅक्सिन 1410 रुपये, आणि स्पुतनिक व्हीसाठी 1 हजार 145 रुपये दर ठरवण्यात आले आहेत. त्यात 5 टक्के जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्काचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच यापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (BMC declares covid 19 vaccine rate for private hospitals covishield covaxin and sputnik v)

तक्रार कुठे कराल?

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण राष्ट्रीय मोहीम अंतर्गत, अधिकाधिक नागरिकांना लस देता यावी यासाठी खासगी रुग्णालयांना सशुल्क लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी लस उत्पादकांनी ठरवलेले उत्पादन दर आणि त्यावर लागू होणारे कर हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोविड लसींचे कमाल दर निश्चित केले आहेत. या दरांनुसारच खासगी रुग्णालयांनी आकारणी करावयाची असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी अधिक रक्कम मागितल्यास complaint.epimumbai@gmail.com या मेलवर तक्रार करण्याचे आवाहन पालिकेने केलं आहे.

तर दरात बदल करणार

नमूद केलेल्या दरानुसारच खासगी रुग्णालयांनी लाभार्थ्यांकडून लसीकरण शुल्क आकारण्यात यावे. अवाजवी शुल्क आकारण्यात आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असं पालिकेने म्हटलं आहे. तसेच या दरात पालिका बदलही करू शकते, असंही नमूद करण्यात आलं आहे. नागरिक, गृहसंकुल पदाधिकारी तसेच औद्योगिक संस्था प्रमुखांनी सदर लस दर निश्चितीची नोंद घ्यावी. अवाजवी दर आकारण्यासंदर्भातील तक्रार complaint.epimumbai@gmail.com या ई-मेलवर नोंदविण्यात यावी, असे आवाहन पालिकेने केलं आहे.

असे आहेत दर (मूळ दर, 5 टक्के जीएसटी, कमाल सेवा शुल्क, कमाल निर्धारित दर)

1. कोविशिल्डः 600+30+150=780 रुपये

2. कोव्हॅक्सिनः 1200+60+150=1410 रुपये

3. स्पुतनिक-व्हीः 948+47+150=1145 रुपये  (BMC declares covid 19 vaccine rate for private hospitals covishield covaxin and sputnik v)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : औरंगाबादेत म्युकरमायकोसिसची गंभीर परिस्थिती असतानाही उपचारासाठी मिळेनात इंजेक्शन

VIDEO | मालक रुग्णवाहिकेत, इमानदार कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात

महापालिका निवडणुका वेळेत घ्या, शिवसेनेला चारीमुंड्या चीत करू; आशिष शेलारांचा दावा

(BMC declares covid 19 vaccine rate for private hospitals covishield covaxin and sputnik v)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.