Corona Vaccine | एकही कंपनी पात्र ठरली नाही, अखेर मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं होतं. (bmc global tender for vaccine cancelled after 23 days)

Corona Vaccine | एकही कंपनी पात्र ठरली नाही, अखेर मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 6:45 PM

मुंबई: कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं होतं. मात्र, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक बसला आहे. दरम्यान, महापालिका नव्याने टेंडर प्रक्रिया करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (bmc global tender for vaccine cancelled after 23 days)

कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. मात्र या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊच कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या. मात्र, लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत. त्यामुळे अखेर ही ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे. तसेच एकाही लस उत्पादक कंपनीने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. त्यामुळेही महापालिकेला लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकली नाही. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच लस मिळण्याची शक्यता मावळली असून आता केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसींवरच पालिकेची सर्व भिस्त असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

म्हणून ग्लोबल टेंडर

मुंबईत अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढलं होतं. या टेंडरद्वारे 1 कोटी डोसची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई ही देशातील पहिली महापालिका ठरली होती.

फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीची माघार

फायझर अस्ट्रॅझेनेकाची लस पुरवणाऱ्या कंपनीनेही लसीकरण मोहिमेत भाग घेतला होता. नंतर या कंपनीने माघार घेतली. पण ही माघार घेण्याचे नेमकं कारण काय? याचा कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. तसेच कोणतेही कारण न देता फायझर अस्ट्रॅझेनेका कंपनीने ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याने मुंबई महापालिकेला मोठा धक्का बसला होता. कोरोनाची तिसरी लाट धडकण्याआधी प्रत्येक मुंबईकरांना ऑगस्ट अखेरपर्यंत लस मिळावी, असे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पण नऊ कंपन्या बाद झाल्याने आता पालिकेच्या अडचणीत भर पडली आहे. (bmc global tender for vaccine cancelled after 23 days)

संबंधित बातम्या:

Corona Vaccine | मुंबई महापालिकेच्या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराची माघार, इतर 7 कंपन्यांकडून कागदपत्रं नाहीत

मुंबई महापालिकेचं एक पाऊल पुढे, लसीसाठी ग्लोबल टेंडर काढलं, 1 कोटी डोसची मागणी

Maharashtra Coronavirus LIVE Update : अखेर मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द, मुंबईकरांना लवकर लस मिळण्याची आशा संपुष्टात

(bmc global tender for vaccine cancelled after 23 days)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.