सर्वात मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय

सर्वात मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी
jitendra awhadImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 7:27 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलीय. राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कुटुंबियांना धमकी देण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलगी आणि जावयावर गोळी झाडण्याची धमकी देण्यात आलीय. धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. या प्रकरणात ‘बाबाजी’चे नाव आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. स्पेनमध्ये मारेकरी तयार ठेवल्याचे रिकॉर्डींगमध्ये उल्लेख आहे.

“मला सकाळी माझ्या एका मित्राने ही ऑडिओ क्लिप आणून दिली. त्यामध्ये काही धक्कादायक बाबी आहेत. माझ्या मुलीपर्यंत किंवा जावयापर्यंत? पण माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात पैदा व्हायचा आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी 40 लाख दिवसाला जमा करतो, 20 लाख वाटतो, आणि सारखं त्याने बाबाजी आणि शूटर्सचं नाव घेतलंय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

“माझ्या अंदाजाने जी माहिती मुंबईची आहे, मुंबईचा गँगवार जवळून बघितलेला मी माणूस आहे. हा बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. जो जे जे हत्याकांडातला एक आरोपी होता”, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.

“बाबाजीच्या नावावर खूप गुन्हे आहेत. तसा तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या जीवावर हे सगळं शूटर्सचं प्लॅनिंग करतोय, हे तो बोलून दाखवतोय. नंतर म्हणतोय मी बाबाजींचं काम करणार आहे. हे सगळं जे काही चालू आहे त्याला लगाम घातला गेला नाही तर गैरकृत्यातून जमवलेली पैशांची थैली त्याने डोकं जड व्हायला लागतं. स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत हे काय बोलणं झालं काय?”, असा सवाल त्यांनी केला.

“एवढी हिंमत सगळं खोटी सर्टिफिकेट्स देऊन मॅनेज करुन अधिकारी झालेला व्यक्ती करतो कसा? त्याने संपूर्ण म्हाडामध्ये पाहिजे तशी 100 घरे दिली आहेत. आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो. पण आता अती व्हायला लागलं आहे. मला कालच्या ट्विटमुळेच हे संभाषण मिळालं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये सहाय्यक आयुक्त?

या प्रकरणातील व्हारल ऑडिओ क्लिपमध्ये सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचं नाव आलं आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी महेश आहेर यांना मारहाण केली.

“तो स्वत:च्या तोंडाने कबूल करतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “एक गोष्ट मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल पाहिली की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार, असं तो क्लिपमध्ये बोलतोय”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.