ईडीचा व्हिडीओकॉनच्या मालकांना दणका, दोन ठिकाणी धाडी, ICICI Bank Loan प्रकरणी मोठी कारवाई

ईडीने व्हिडिओकॉन या बड्या कंपनीशी संबंधित दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

ईडीचा व्हिडीओकॉनच्या मालकांना दणका, दोन ठिकाणी धाडी, ICICI Bank Loan प्रकरणी मोठी कारवाई
ईडीचा व्हिडीओकॉनच्या मालकांना दणका, दोन ठिकाणी धाडी
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 8:53 PM

मुंबई : मुंबईत ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. ईडीने (ED) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ताजी असताना आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. अर्थात हे प्रकरण वेगळं आहे. मात्र, कारवाई ही तितकीच मोठी आहे. ईडीने व्हिडिओकॉन या बड्या कंपनीशी संबंधित दोन ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. व्हिडिओकॉनचे मालक वेणूगोपाल धूत (Venu Gopal Dhoot) आणि राजकुमार धूत (Rajkumar Dhoot) यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने मलबार हिल आणि गोवंडीत धाड टाकली आहे. आयसीआयसी बँक लोन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबादेतही धाडी

ईडीने एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीने मुंबईतील मलबार हिल आणि गोवंडीत धाड टाकली. त्याचवेळी औरंगाबादेतही धाड टाकली. एकाचवेळी ही सगळी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी आणि कार्यालयांमध्ये अशाचप्रकारे धाडी टाकल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीने या प्रकरणातही ईडीने कारवाई केली आहे.

व्हिडीओकॉनचे मालक धूत बंधूंविषयी माहिती

व्हिडीओकॉन ही कंपनी इलेक्टॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. भारत, इटली, मलेशिया सारख्या अनेक देशांमध्ये या कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तू विकल्या जातात. कंपनीचे मालक वेणूगोपाल धूत यांनी त्यांच्या वडिलांच्या मदतीने या कंपनीची स्थापना केली. वेणूगोपाल यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील नंदनलाल धूत हे प्रसिद्ध उद्योजक होते. त्यांचे अनेक साखर कारखाने होते. वेणूगोपाल यांनी पुण्यात शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये व्यवसाय वाढवला. मात्र, त्यांना काहीतरी वेगळं करायचं ठरवलं.

वेणूगोपाल यांनी शेअर मार्केटकडे लक्ष दिलं. त्यानंतर त्यांनी अधिगण ट्रेंडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विकत घेतली. ही कंपनी त्यांनी 13 लाखात विकत घेतली होती. त्यानंतर कंपनीला चांगलं यश मिळालं. त्यानंतर त्यांनी कंपनीचं नाव बदलून व्हिडीओकॉन इंडस्ट्रिस असं ठेवलं. त्यानंतर व्हिडीकॉन कंपनीने भारतात कलरटीव्ही आणली. भारतात कलरटीव्हीचं उत्पादन करणारी व्हिडीओकॉन ही पहिली कंपनी होती. त्यानंतर कंपनीने इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे देखील उत्पादन सुरु केलं. वेणूगोपाल धूत यांचे भाऊ राजकुमार धूत हे राज्यसभेत खासदार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.

याप्रकरणी ईडीने गेल्यावर्षी 7 सप्टेंबर रोजी आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. चंदा कोचर यांनी पदाचा गैरवापर करुन व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज दिले असा आरोप आहे. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन कंपनीचे मालक धूत यांनी मिळून एक कंपनी उभारली होती. या कंपनीलाही कोट्यवधींचा लोन देण्यात आला, असाही आरोप करण्यात आला आहे. याच प्रकरणी ईडीचा तपास सुरु आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असा आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे (ED Court Summoned ICICI Bank Former CEO Chanda Kochhar).

ईडीने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात बँकेच्या कर्जात हेराफेरी आणि PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला.

संबंधित बातमीचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : देशातील सर्वात मोठ्या सिगारेट कंपनीच्या बॉसच्या पगारात 47 टक्के वाढ, आता दररोज एवढे लाख मिळणार

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.