मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मेट्रो कॉरिडोरचे 11 स्टेशन 85 टक्के पूर्ण, वाचा आपल्या जवळच्या मेट्रो स्टेशनचे किती टक्के काम पूर्ण!
मुंबईत मेट्रो उभारणीचे काम जोरदार सुरू आहे. विशेष म्हणजे जमिनीखाली मेट्रो उभारणीचे काम सुरू आहे. जमिनीपासून 20 मीटर खाली बांधण्यात येणाऱ्या 26 मेट्रो स्थानकांपैकी 16 मेट्रो स्टेशन 80 टक्क्यांहून अधिक तयार आहेत.
मुंबई : मुंबईत मेट्रो (Metro) उभारणीचे काम जोरदार सुरू आहे. विशेष म्हणजे जमिनीखाली मेट्रो उभारणीचे काम सुरू आहे. जमिनीपासून 20 मीटर खाली बांधण्यात येणाऱ्या 26 मेट्रो स्थानकांपैकी 17 मेट्रो स्टेशन 80 टक्क्यांहून अधिक तयार आहेत. त्याचबरोबर 10 स्थानकांचे काम 79 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. मुंबईतील पहिली भूमिगत मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान 33.5 किमीमध्ये बांधली जात आहे.
वाचा 26 स्टेशनचे काम किती टक्के पूर्ण
विशेष म्हणजे कॉरिडोरची 11 स्टेशन 85 टक्के तयार आहेत. अशी माहीती एमएमआरसीएल यांच्याकडून देण्यात आली आहे. कप परेड 84, विधान भवन 86, चर्चगेट 83, हुतात्मा चौक 82, सी एस एम टी 80, कालबादेवी 33, गिरगाव 33, ग्रांड रोड 48, मुंबई सेंट्रल 80, महालक्ष्मी 79, साइज म्युझियम 77, आचार्य अत्रे चौक 53, वरळी 76, सिद्धिविनायक 84, दादर 74, शितलादेवी 63, धारावी 78, बीकेसी 76, विद्यानगरी 78, सांताक्रुज 78, सीएसएमआयईए 79, सहारा रोड 79, सीएसएमआईए (आई) 80, मरोल नाका 84, एम आय डी सी 88, सिज्ज 86 तयार आहेत.
कप परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, एमआयडीसी, सिप्ज या स्टेशनची कामे 80 टक्यांपेक्षाही जास्त झाली आहेत. तर मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, वरळी, सहार रोड, डोमेस्टिक एअरपोर्ट स्टेशन या भागात 80 टक्क्यांपेक्षा जवळपास कामे झाली आहेत. सायन्स म्युझियम, शीतलादेवी, सीएसएमटी, दादर, धारावी, बीकेसी, विद्यानगरी या स्थानकांची कामे 70 टक्क्यांच्या जवळपास कामे झाली आहेत.
मेट्रो स्टेशनचे पूर्ण झाले काम
-कप परेड 84 – विधान भवन 86
-चर्चगेट 83 – हुतात्मा चौक 82
-सी एस एम टी 80 – कालबादेवी 33
-गिरगाव 33 – ग्रांड रोड 48
-मुंबई सेंट्रल 80 – महालक्ष्मी 79
-साइज म्युझियम 77 – आचार्य अत्रे चौक 53
-वरळी 76 – सिद्धिविनायक 84
-दादर 74 – शितलादेवी 63
-धारावी 78 – बीकेसी 76
-विद्यानगरी 78 – सांताक्रुज 78
-सीएसएमआयईए 79 – सहारा रोड 79
-सीएसएमआईए (आई) 80 – मरोल नाका 84
-एम आय डी सी 88 – सिप्ज 86
संबंधित बातम्या :
MHADA Examination : पेपर फुटीनंतर आता म्हाडा परीक्षेची नवी तारीख जाहीर, कधी होणार परीक्षा?