Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख शरद गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात महत्वाची घोषणा केली आहे.

Ganpat Gaikwad Firing | भाजप आमदार गोळीबार प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Feb 03, 2024 | 4:38 PM

कुष्णा सोनावळकर, मुंबई, दि.3 फेब्रुवारी 2024 | भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केला. या गोळीबारात शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्याविषयावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ले सुरु केले आहेत. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल, असा निर्णय फडणवीस यांनी जाहीर केला. आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.

गुन्हे शाखा करणार तपास

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. आता एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होणार आहे. यामुळे उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्याकडून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेने लागलीच तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील तिघं आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दोन आरोपी फरार

दरम्यान, आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यात आमदार गणपत गायकवाड आणि हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड इतर दोन फरार आहेत. त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. दुपारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलीस किती दिवस कठोडी मागणार? हे पाहावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

आमदार गायकवाड यांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी आपण केलेल्या कृत्याचा आपणास पश्चताप नसल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा

भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिसी ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार, आमदारास अटक

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.