भाजप नेत्यांवर कारवाई केली नाही म्हणून नगराळेंची उलचबांगडी?; वाचा पडद्यामागे काय घडलं?

अँटालिया बॉम्बस्फोट प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही म्हणून मागच्या वर्षी परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून (Mumbai Police Commissioner) हटवण्यात आलं. त्यानंतर हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांना पोलीस आयुक्तपदी बसवण्यात आलं.

भाजप नेत्यांवर कारवाई केली नाही म्हणून नगराळेंची उलचबांगडी?; वाचा पडद्यामागे काय घडलं?
भाजप नेत्यांवर कारवाई केली नाही म्हणून नगराळेंची उलचबांगडी?; वाचा पडद्यामागे काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 4:27 PM

मुंबई: अँटालिया बॉम्बस्फोट प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही म्हणून मागच्या वर्षी परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून (Mumbai Police Commissioner) हटवण्यात आलं. त्यानंतर हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांना पोलीस आयुक्तपदी बसवण्यात आलं. मात्र, त्यांनाही आता या पदावरून हटवण्यात आलं आहे. संजय पांडे (Sanjay Pandey) यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बसवण्यात आलं असून हेमंत नगराळे यांना साईड पोस्टिंग देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यावर कारवाया सुरू आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे नवनवे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. त्याच वेगाने मुंबई पोलिसांनीही भाजप नेत्यांवर कारवाई करावी, असं सरकारला वाटत होतं. मात्र, हेमंत नगराळेंकडून अपेक्षित कारवाई होत नव्हती. भाजप नेत्यांवर वेगाने कारवाई करण्यास ते मागे पुढे पाहत होते. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर आतापर्यंत संजय पांडे कार्यरत होते. राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती झाल्यावर पांडे नाराज होते. त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्रं लिहून आपली नाराजीही कळवली होती. आता त्यांना राज्य पोलीस दलातील दुसऱ्या क्रमांकाचे पद देण्यात आलं आहे. म्हणजे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. काहीच दिवसांपुरती त्यांची सेवा बाकी आहे. याच दरम्यान महापालिका निवडणुका होणार आहेत. अशावेळी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे.

कारवाईत टाळाटाळ

भाजप नेत्यांवरील कारवाईस टाळाटाळ आणि निष्क्रियता यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे, असा दावा एका एनसीपीच्या नेत्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. नगराळे हे 1987च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंग आणि सचिन वाझेमुळे सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का लागला होता. त्यामुळे नगराळेंकडे पोलीस आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला होता. भाजप नेत्यांवर नगराळे कारवाई करतील अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आशा होती. मात्र, तसे होऊ शकले नाही.

राऊतांच्या पीसीनंतरही कारवाई नाही

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजप नेत्यांवर आरोप केले होते. तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून त्यांनाही याबाबतची माहिती दिली होती. या पत्रकार परिषदेनंतर मुंबई पोलीस अॅक्शन घेतील अशी राऊत यांना अपेक्षा होती. मात्र, नगराळे यांनी याबााबतही काहीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळे सरकारची त्यांच्याबद्दलची नाराजी वाढत होती, असं सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकणार नाहीत : किरीट सोमय्या

Big Breaking : युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

तुमची खुर्ची हलतेय, किती तरी मंत्री जेलमध्ये जाण्यासाठी वेटिंगवर; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.