परळीच्या सिरसाळा येथे अखेर एमआयडीसी होणार, उद्योग विभागाची मंजुरी; राज्य सरकारचा मोठा निर्णय
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे एमआयडीसी उभारण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर ही एमआयडीसी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Industry Department Approval to Sirsala MIDC says dhananjay munde)
परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीवर औद्योगिक क्षेत्र – 2 अंतर्गत एमआयडीसी उभारण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीच्यानंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान या संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली होती. त्याला अखेर उद्योग विभागाने मंजुरी दिली आहे. देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
मुंडेंची वचनपूर्ती
एमआयडीसीसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता. त्यानंतर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया उद्योग विभागामार्फत सुरू होती. मुंडे स्वतः याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते. दरम्यान उद्योग विभागाने मोठा निर्णय घेत, परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने मुंडे यांचे वचनपूर्तीकडे हे मोठे पाऊल मानले जात आहे.
तरुणांना रोजगार मिळणार
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. या भागातील सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढावे, इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळावा यासाठी आपण कटिबद्ध आहोत. एमआयडीसी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने परळीच्या विकासाबाबत पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्ण होताना आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. (Industry Department Approval to Sirsala MIDC says dhananjay munde)
परळी मतदारसंघात सर्वसामान्य माणसाची प्रगती, इथल्या युवकांना इथेच रोजगार हे मी पाहिलेले एक स्वप्न, निवडणुकीत दिलेला एक शब्द, पंचतारांकित एमआयडीसीचे स्वप्न आज सत्यात उतरण्यास सुरुवात झाली. सरकारने परळी एमआयडीसीच्या प्रस्तावास आज अधिकृत मान्यता दिली.धन्यवाद @Subhash_Desai साहेब, pic.twitter.com/v31JX0efe3
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 9, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: विधानसभा, लोकसभाही महाविकास आघाडी एकत्रित लढणार?; शरद पवारांचं मोठं विधान, वाचा सविस्तर
चंद्रकांत पाटील त्यांच्या वक्तव्यावर कधीच ठाम नसतात, एकनाथ खडसेंचं वक्तव्य
ठाकरे-मोदी भेटीवर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत
(Industry Department Approval to Sirsala MIDC says dhananjay munde)