‘रुग्णसेवेसाठी मला पारितोषिक नको, पण…’, डॉ. तात्याराव लहाने यांची उद्विग्न प्रतिक्रिया

डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत.

'रुग्णसेवेसाठी मला पारितोषिक नको, पण...', डॉ. तात्याराव लहाने यांची उद्विग्न प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 12:02 AM

मुंबई : “रुग्णसेवेसाठी मला पारितोषिक देऊ नका. मात्र त्रासही देऊ नका”, अशा शब्दांत ज्येष्ठ नेत्र विशेषज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी उद्विग्नता व्यक्त केली. मला गेल्या वर्षभरासाठी पगार नाही आणि क्वार्टरसाठी सात लाख रुपये दंड लावला, असं तात्याराव लहाने यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितलं. “आमची मन धरणी केली तरी मी आता परत जाणार नाही. ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर कारवाई व्हावी”, अशी मागणी केल्याचं तात्याराव लहान यांनी सांगितलं.

“सहा महिन्यापूर्वी रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांनी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करू दिली जात नाही असे सांगून आमची तक्रार केली. मूळात या शस्त्रक्रिया टप्या टप्याने केल्या जातात. आमच्याकडे सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जातं. तरी आमच्यावर खोटी तक्रार केली”, असं तात्याराव लहाने म्हणाले.

“चौकशी अधिकाऱ्यांची बदली करा, अशी आमची मागणी होती. प्रशासनाने एकाच बाजूने चौकशी केली. प्रशासनाकडून या विभागाला कसलीही मदत नाही. याउलट खोट्या तक्रारींना कंटाळलो आहोत”, अशी भूमिका तात्याराव लहाने यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

“30 वर्ष आम्ही काम केलं. आमच्यावर विश्वास न दाखवता 6 महिन्यांपूर्वी आलेल्या डॅाक्टरांवर विश्वास दाखवला. मग आम्ही तिथे काम करून काय उपयोग? म्हणून आम्ही राजीनामा दिला”, असं तात्याराव लहाने यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांनी अचानक आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ज्येष्ठ डॉक्टर डॉ. तात्याराव लहाने यांचादेखील समावेश आहे. डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी जे जे रुग्णालयाचे अधिष्ठातांवर गंभीर आरोप केले आहेत.

वरिष्ठ डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय? वाचा प्रसिद्धी पत्रक जसंच्या तसं

गेल्या काही दिवसांपासून आपण निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) यांनी पाठवलेले प्रेस रिलीज पाहीलेच असेल. नेत्र विभागातील प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीचे आम्ही शासनास मुद्देनिहाय उत्तर दिलेलं आहे. 1995 पूर्वी रोज फक्त 30 रुग्ण येणाऱ्या या विभागात आज 300 ते 400 रुग्ण दररोज येतात. या विभागाच्या कामाची दखल घेऊन केंद्र शासनाने 2008 मध्ये विभागास ‘विभागीय नेत्रचिकित्सा संस्थेचा’ दर्जा दिला. या विभागात महाराष्ट्रभरातून आणि इतर राज्यातून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.

डोळ्यांमधील दुर्धर आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत निर्माण झालेले रुग्ण शेवटची अपेक्षा घेऊन आत्मविश्वासाने या विभागात उपचारासाठी येतात. या विभागात वेगेवेगळ्या अतिविशोपचार सेवा दिल्या जातात. (उदा – मोतीबिंदु, काचबिंदु, मेडीकल आणि सर्जीकल रेटीना, बूबूळावरील शस्त्रक्रिया, लेसिक, लहान मुलांच्या डोळ्यावरील उपचार, तिरळेपणा, डोळ्यांचा कर्करोग, आकुलोपस्टी, सर्व प्रकारच्या तपासण्या) या सर्व सेवा त्या त्या तज्ज्ञांमार्फत रुग्णांना देणारा हा महाराष्ट्रातील एकमेव विभाग आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी आदिवासी आणि ग्रामीण भागात जाऊन येथील नेत्रतज्ज्ञ गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. मागील 28 वर्षात 692 शिबीरे घेऊन 30 लाख रुग्णांवर उपचार केले आहेत.

2016 मध्येही निवासी डॉक्टर संघटनेने या विभागाच्या विरोधात संप पुकारला होता. त्यातील 12 पैकी 11 डॉक्टरांनी क्षमा मागून तक्रार परत घेतली. त्यावेळेसही आमच्यावर झालेला अन्याय आम्ही रुग्णांसाठी सहन केला.

आता पुन्हा 22 मे 2023 ला सध्या कार्यरत असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या 28 निवासी डॉक्टरांनी अधिष्ठांकडे मार्ड संघटनेमार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीचे स्पष्टीकरण डॉ. गजानन चव्हाण यांच्यासह अधिष्ठाता यांनी नेत्र विभाग प्रमुखांकडे मागितले. पण अधिष्ठाता यांनी विभागाचे स्पष्टीकरण पोहचण्यापूर्वीच चौकशी समिती नेमली. या समितीत 31 मे ला सेवानिवृत्त होत असलेले डॉ. अशोक आनंद यांची चौकशी समिती अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

डॉ. अशोक आनंद यांची महिला छळ प्रकरणी डॉ. रागिनी पारेख यांनी यापूर्वी चौकशी केली आहे. तसेच त्यांनी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रणजीत माणकेश्वर, डॉ. भंडारवार, डॉ. एकनाथ पवार, डॉ. श्रीमती अभीचंदानी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या वरुन हे लक्षात येते की डॉ. अशोक आनंद यांचे समितीचे अध्यक्ष म्हणून अधिष्ठाता यांनी केलेली नियुक्ती म्हणजेच विभागातील अध्यापकांना आकस बुद्धीने त्रास देण्यासाठी आणि त्यांची बदनामी केली आहे हे सिद्ध होत आहे. या विभागामार्फत डॉ. अशोक आनंद यांच्याऐवजी इतर कोणाताही अध्यक्ष नियुक्त करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पण तसे न करता अधिष्ठाता यांनी चौकशी तशीच सुरु ठेवली.

सहा महिन्यापूर्वी विभागात पदव्यूत्तर अभ्यासक्राम शिकवण्यासाठी रुजी झालेल्या निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन आमचे म्हणणे न ऐकताच चौकशी सुरु ठेवण्यात आली आहे.

अधिष्ठाता यांनी मागील वर्षभरात या विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. वारंवार प्राध्यापकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही या विभागातील प्राध्यापक अपमान सहन करुन रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत आहेत. पुन्हा आता कसलीही चूक नसताना विभागातील प्राध्यापकांची बदनामी करण्यात येत आहे.

डॉ. लहान हे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र कार्यक्रम करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते आणि सर्व प्राध्यापक रात्रं-दिवस रुग्णसेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचे वेतन अद्यापही अधिष्ठाता यांनी अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थानासाठी 7 लाख रुपये दंड लावून रिक्त करण्यास सांगितले. तरिही रुग्णांशी असलेल्या बांधिलकीमुळे ते काम करीत आहेत.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.