दोन वर्षानंतर भाजपने विरोधी पक्ष म्हणून कामास सुरुवात केली ही चांगली गोष्ट; जयंत पाटलांचा खोचक टोला

सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं ठरवलं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं.

दोन वर्षानंतर भाजपने विरोधी पक्ष म्हणून कामास सुरुवात केली ही चांगली गोष्ट; जयंत पाटलांचा खोचक टोला
जयंत पाटील, जलसंपदा मंत्री
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 6:29 PM

मुंबई: सरकार कधी येणार याच्या चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करायचं ठरवलं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं. पाटील यांच्या या विधानाची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे, असा खरमरीत टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील, अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले होते चंद्रकांतदादा

भाजपची काल मुंबईत प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हे विधान केलं होतं. आपल्याला प्रखर विरोधी पक्षनेते बनायचं आहे. जूनपासून आपण काम करत आहोत. सरकार कधी येणार, देवेंद्रजी कानात तर सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… आता ही चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार कामही सुरू केलं असून वेळोवेळी तुम्हाला कार्यक्रमही दिले आहेत, असं पाटील म्हणाले होते.

नवाब मलिकांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रम आपण आदल्या दिवशी 9 वाजता एका व्हिडीओ कॉलवर दिला. दुसऱ्या दिवशी 26-27 मोठ्या शहरात आपण नवाब मलिकांचे पुतळे जाळले. मलिकांचा पुतळा जाळला गेला नाही, अटक केली नाही असं झालं नाही. इतकं कमी वेळात प्लानिंग झालं, असं त्यांनी सांगितलं. तसेच, इंधनावरील व्हॅट कमी करावा म्हणून आपण कार्यक्रम दिला. 400 हून अधिक जिल्हा केंद्र आणि तहसील केंद्रांवर निदर्शने करण्यात आली. निवेदने देण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं होतं.

त्यांची वेदना समजू शकतो

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. या राज्याचा प्रत्येक नागरिक मुख्यमंत्री आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आहेत तेव्हा पासून 11 कोटी लोकांना वाटतं मी मुख्यमंत्री आहे. मी सत्ताधारी आहे असं लोकांना वाटतं. लोकशाहीतील ही मोठी घटना आहे. मोदी सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्याला तो मंत्री आहे असं वाटत नाही. खासदार आहे असं वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता. राज्यात कायद्याचं राज्य नाही या फडणवीसांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. महाराष्ट्रात काय तरी द्याचं पूर्वी राज्य होतं. ते दोन वर्षापूर्वी घालवून कायद्याचं राज्य आलं. त्यामुळे काही तरी द्यावाल्यांची वेदना समजू शकतो, असा चिमटा त्यांनी काढला होता.

संबंधित बातम्या:

Photo : जमलेल्या माझ्या तमाम… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक झंझावात!

दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!

Maharashtra News LIVE Update | देशाला भाजपची हुकूमशाही नको आहे, त्यामुळे लोकांना पर्याय हवा आहे – शरद पवार

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.