Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: अजित पवारांकडून पत्नी, मुलगाच नव्हे आईच्याही खात्यात पैसे ट्रान्स्फर; किरीट सोमय्यांच्या आरोपांनी खळबळ

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि आईच्याही नावे बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (kirit somaiya slams ajit pawar over corruption)

VIDEO: अजित पवारांकडून पत्नी, मुलगाच नव्हे आईच्याही खात्यात पैसे ट्रान्स्फर; किरीट सोमय्यांच्या आरोपांनी खळबळ
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 1:55 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि आईच्याही नावे बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोमय्यांनी हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सोमय्यांच्या या दाव्यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. मोहन पाटील, विजया पाटील, नीता पाटील आणि सुनेत्रा पवार एका कंपनीत पार्टनर आहेत. अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांचे पैसे आले आहेत. ते परत दिले गेलेच नाही. अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आले. त्यांनी जावई, नीता पाटील, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि एए पवार यांच्या खात्यात हे पैसे वर्ग केले. ए ए पवार हे अजित पवार यांच्या आईचं नाव आहे. अजित पवार यांनी घोटाळ्याचे पैसे पूर्ण ट्रान्सफर केले आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला.

चोरी पकडली जाणार नाही असं पवारांना वाटतं का?

गेल्या महिन्याभरापासून आयकर खात्याच्या धाडी सुरू आहेत. हजारापेक्षा जास्त कोटीची बेनामी संपत्ती बाहेर आली आहे. शेकडो कोटीचे नॉन ट्रान्स्फरंट एन्ट्रीज आहेत. त्याला हवालाही म्हणता येईल आणि शेल कंपन्यांचे व्यवहारही म्हणता येईल. बंद झालेल्या कंपन्यातूनही पैसे आलेले आहेत. आपण पाच पंधरा लेअर सुरू केल्या म्हणून आमची चोरी पकडली जाणार नाही, असं शरद पवारांना वाटतं का? असा सवालही त्यांनी केला आहे.

धाडीपासून लक्ष विचलीत करण्यासाठीच सोमय्याप्रकरण

गेल्या 19 दिवसात पवार कंटुंबाचा सातबारा आम्ही त्यांच्या हातात दिला आहे. म्हणून आयकर विभाागाने आणि नंतर ईडीने धाडी मारल्या. मात्र या धाडीपासून लक्ष विचलीत करण्यासाठी मलिकांच्या माध्यमातून समीर वानखेडेंचं प्रकरण बाहेर काढण्यात आलं. आम्ही गेल्या दोन महिन्यापासून अभ्यास करत होतो. माझी टीम काम करत होती. नंतर हा आरोप सिद्ध झाला. गुरु कमोडिटी हे व्यक्तीचं नाव आहे. मी कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यात जात नाही. पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्राला लुटले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. मात्र, ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्ध झालं आहे, असं सांगतानाच 9 दिवस ईडीची धाड सुरू आहे हे अजित पवारांनी सांगांवं, असं सोमय्या म्हणाले.

संबंधित बातम्या:

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाच पुरावे देणार, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

(kirit somaiya slams ajit pawar over corruption)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.