Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: दाऊदला विमानात कोणी बसवलं होतं? त्याच्यासोबत कोण होतं?; किरीट सोमय्यांचा थेट सवाल

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. (kirit somaiya slams sharad pawar over dawood)

VIDEO: दाऊदला विमानात कोणी बसवलं होतं? त्याच्यासोबत कोण होतं?; किरीट सोमय्यांचा थेट सवाल
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 5:11 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानखेडे असल्याचा दावा केला आहे. मलिक यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यावरून थेट नवाब मलिक यांनाच सवाल केला आहे. दाऊदला विमानात कोणी बसवलं? त्याच्यासोबत कोण होतं? असा सवालच किरीट सोमय्या यांनी केला.

भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात किरीट सोमय्या बोलत होते. समीर तुझे वडील ज्ञानदेव नाहीत, दाऊद आहे… दाऊद आहेत… त्यांचा बाप नाही. तुमचा बाप आहे. ठाकरे सरकारमधील शरद पवारांना जाऊन विचारा, 199-94मध्ये दाऊदसोबत विमाना कोण बसलं होतं? असा सवाल सोमय्या यांनी केला. विसरले का शरद पवार, दाऊदला विमानत कोणी बसवलं होतं? कोण त्यांच्यासोबत बसलं होतं? दाऊद काढताय … ठाकरे पवारांना लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही सोमय्या यांनी केली.

नवाब मलिकांची नौटंकी

गेले 13 दिवस नवाब मलिक यांचं नाटक सुरू आहे. आम्ही अॅटम बॉम्ब फोडतो. त्यांनी लवंगी मिरची फोडली. तीही फूस्स गेली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घोटाळ्यापासून लक्ष विचलीत करायचं होतं. रोज उठून मलिक ट्विट करतात, फेसबूकवर पोस्ट टाकतात, नंतर पीसी घेतात. वानखेडे हिंदू नाही, मुस्लिम आहेत… मुस्लिम नाहीत, दलित आहेत… क्रांती रेडकरचा नवरा मुस्लिम आहे… त्याचं पहिलं लग्न झालं… हे झालं अन् ते झालं… गेल्या 13 दिवस हेच सुरू आहे. काय लावलं आहे महाराष्ट्रात? असा सवाल त्यांनी केला.

देव दिवाळीपर्यंत फटाके फोडणार

येत्या काळात अर्धा डझन लोकांचे फटाके फुटणार आहेत. दिवाळी ते देव दिवाळीपर्यंत हे फटाके फुटणार आहेत. या ठाकरे सरकारने घोटाळे केले. तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आहेत, असं सांगतानाच अजित पवारांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयांना खूश केलं. नवाब मलिकांनी त्यांच्या जावयांना खूश केले. पण मी या सर्वांचे फटाके फोडले, असं त्यांनी सांगितलं.

मलिक यांचा इशारा

सोमय्या यांच्या हल्ल्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. किरीट सोमय्या यांच्या धमक्यांना भीक घालत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. मी असा भांडाफोड करणार आहे की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना तोंड लपवून पळावे लागेल, असा इशारा मलिक यांनी दिला.

संबंधित बातम्या:

सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, भाजप नेते तोंड लपवून पळतील; नवाब मलिकांचा हल्लाबोल सुरूच

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली; नवाब मलिक ठाम

औरंगाबादेत मालमत्ता नियमित करण्यासाठी मुदतवाढ, 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया करण्याची परवानगी

(kirit somaiya slams sharad pawar over dawood)

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.