शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या जागतिक मातृदिनानिमित्त हटके शुभेच्छा
मिलिंद नार्वेकर यांनी नुकताच ताडोबा अभयारण्यात मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या कॅमेरात टिपलेले सोनम वाघिणीचे तिच्या बछड्यासहचे काही फोटो ट्विट केले होते. त्याला अनुसरुन अनेकानी त्यांच्या ट्विटल प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यांनी जो फोटो ट्विट केला आहे,
मुंबईः मातृदिनाबद्दल (Mothers Day) अनेक प्रसिद्ध नेत्या अभिनेत्यांनी आपल्या आईबद्दल, मातृत्वाबद्दल सोशल मीडियावरुन (Social Media) शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या मातृत्वाबद्दल अनेक आपल्या भावना व्यक्त तर केल्या आहेतच पण शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मात्र मातृत्व दिनाबद्दल शुभेच्छा तर दिल्या आहेतच पण त्याही अगदी हटके. कारण ताडोबा अभयारण्यातील सोनम वाघिणीचा तिच्या बछड्यासहचा फोटो ट्विट करून त्यांनी जागतिक मातृत्व दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy Mother’s Day! pic.twitter.com/QjzB1jqYXJ
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) May 8, 2022
सोनम वाघीणीला मातृत्व दिनाच्या शुभेच्छा
मिलिंद नार्वेकर यांनी नुकताच ताडोबा अभयारण्यात मुक्काम केला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या कॅमेरात टिपलेले सोनम वाघिणीचे तिच्या बछड्यासहचे काही फोटो ट्विट केले होते. त्याला अनुसरुन अनेकानी त्यांच्या ट्विटल प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्यांनी जो फोटो ट्विट केला आहे, त्यामध्ये सोनम वाघीण उभी असून तिच्या छत्रछायेखाली तिच्या बछड्यासह ती उभी राहिली आहे. या फोटोला अनेकांनी रिट्विट आणि अनेकांनी लाईक्सही केले आहेत.
प्राण्यांबद्दल एक वेगळी प्रतिमा
मातृत्व दिनाबद्दल त्यांनी वाघीणाचा फोटो ट्विट केल्यानंतर समाजातही एक वेगळा संदेश दिला गेला आहे. अनेकांनी आपल्या आईसाठी आणि इतर मातांसाठी शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्यांनी वाघीणीला आणि तिच्या बछड्याला शुभेच्छा दिल्याने सोशल मीडियावरही प्राण्यांमधील मातृत्वाबद्दल अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोनमला सोशल मीडियावरुनही शुभेच्छा
वन विभागाकडे आणि अनेक सामाजिक संस्थांकडून वाघ या प्राण्यांविषयी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही याबाबत जागरुकता केली जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी वाघ प्राण्यातील मातृत्वबद्दल त्यांनी पोस्ट शेअर करत त्या पोस्टमध्ये त्यांनी सोनम वाघीणीला मातृत्वदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या पोस्टमुळेही वाघांबद्दल आणि प्राण्याबद्दल एक वेगळी भावना, आणि प्राण्यांच्या बदलत्या जीवनशैलीबद्दल यानिमित्त चर्चा करण्यात आली आहे.