AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : 3 स्टार पोलिसाशी हुज्जत, भाई जगताप यांची पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की, व्हिडीओ सगळं सांगतोय

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ते पोलिसांसोबत बाचाबाची आणि धक्काबुक्की करताना दिसत आहेत (Mumbai Congress Leader Bhai Jagtap clash with Mumbai Police during congress protest in Goregaon).

VIDEO : 3 स्टार पोलिसाशी हुज्जत, भाई जगताप यांची पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की, व्हिडीओ सगळं सांगतोय
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची पोलिसांसोबत बाचाबाची आणि धक्काबुक्की
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 4:16 PM
Share

अक्षय कुडकेलवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसचं शनिवारी (12 जून) पेट्रोल दरवाढीविरोधात गोरेगावमध्ये आंदोलन सुरु होतं. यावेळी कार्यकर्त्यांना सूचान देण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत भाई जगताप यांची बाचाबाची झाली. यावेळी भाई जगताप यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला जोराचा धक्का देखील दिला. हा संबंध प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे (Mumbai Congress Leader Bhai Jagtap clash with Mumbai Police during congress protest in Goregaon).

व्हिडीओत नेमकं काय?

भाई जगताप यांचा पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचा व्हिडीओ आता समोर आाल आहे. या व्हिडीओत काँग्रेसचं आंदोलन सुरु असल्याचं दिसत आहे. या आंदोलनात काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे देखील सहभागी झाले आहेत. जगताप यांच्या हातात माईक असतो. या आंदोलनावेळी काही पोलीस घटनास्थळी येतात. ते आंदोलकांना सूचना देतात. यावेळी भाई जगताप पोलिसांकडे येतात. ते पोलिसांना आरे-तुरेची भाषा वारताना दिसतात. हा (पोलीस) जर आंदोलन बंद करा, असं सांगत असेल तर हे आंदोलन संध्याकाळपर्यंत सुरु ठेवा, असं जगताप यावेळी म्हणतात. त्यानंतर इतर आंदोलक जोरजोरात घोषणाबाजी करतात.

पोलीस यावेळी भाई जगताप यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. यावेळी भाई जगताप थेट पोलिसांवर चालून जातात. ते एका पोलीस कॉन्स्टेबलला जोराचा धक्का देतात. विशेष म्हणजे यावेळी भाई जगताप यांच्यासोबत आंदोलनात सहभागी असलेले आंदोलकही पोलिसांवर चालून जाण्याचा प्रयत्न करतात. यावेळी प्रकरण चिघळेल याची जाणीव जगताप यांना होते. त्यानंतर ते आपल्या कार्यकर्त्यांना मागे सरकरण्याचं आवाहन करतात. यावेळी त्यांचे कार्यकर्ते आणखी जोमाने पोलिसांवर चालून जाण्याचा प्रयत्न करतात. अखेर भाई जगताप यांच्या आवाहनानंतर ते मागे सरकतात (Mumbai Congress Leader Bhai Jagtap clash with Mumbai Police during congress protest in Goregao).

व्हिडीओ बघा :

हेही वाचा : गुलामसारखी वागणूक तुम्हाला मिळत होती तेव्हा शिवसेनेचा स्वाभिमान कुठं होता? राम कदम यांचा सवाल

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.