Mumbai Water : यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचे टेन्शन नाही, पुढच्या 5 महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक!

उन्हाळ्याच्या हंगामाला (Summer) सुरूवात झाली आहे. याचदरम्यान आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सध्या धरणातील पातळीच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. एकूण 7 तलावांमधून सुमारे 160 दिवसांपर्यंत आरामात पाणीपुरवठा (Water supply) केला जाऊ शकतो, इतके पाणी या धरणांमध्ये शिल्लक आहे.

Mumbai Water : यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचे टेन्शन नाही, पुढच्या 5 महिन्यांचा पाणीसाठा शिल्लक!
मुंबईमध्ये यंदा पाणीकपात होण्याची शक्यता कमी आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 9:50 AM

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामाला (Summer) सुरूवात झाली आहे. याचदरम्यान आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सध्या धरणातील पातळीच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. एकूण 7 तलावांमधून सुमारे 160 दिवसांपर्यंत आरामात पाणीपुरवठा (Water supply) केला जाऊ शकतो, इतके पाणी या धरणांमध्ये शिल्लक आहे. जर आपण आकडेवारीनुसार पाहिले तर 20 मार्चपर्यंत धरणांमध्ये सुमारे 43 टक्के पाणी शिल्लक आहे. विशेष म्हणजे जे पुढील 160 दिवस पुरेल. आनंदाची गोष्ट म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणीसाठा जास्त असल्याचे देखील कळते.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाणी साठा जास्त 

गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये 40 टक्के पाणी धरणांमध्ये शिल्लक होते. तर यावेळी 43 टक्के शिल्लक आहे. 2021 मध्ये 16 जुलै ते 23 जुलै दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जास्तीत जास्त साठा मिळाला. त्याअगोदरच बीएमसी पाणीकपात करण्याच्या तयारीत होती. कारण सात तलावांमधील एकूण पाणीसाठा फक्त 17 टक्के होता. 22 जुलैपर्यंत पाण्याची पातळी 50 टक्के, त्यानंतर 24 जुलैला 60 टक्के आणि 28 जुलैला 70 टक्के च्या पुढे गेली होती. मुंबईत जुलै ते ऑगस्ट दरम्यान पुरेसा पाऊस पडला असल्यामुळे यंदा पाणीकपात होण्याची शक्यता तशी कमी आहे.

भातसा धरणात 45 टक्के पाणीसाठा 

सध्या ठाण्यातील भातसा धरणात 45 टक्के पाणीसाठा आहे. जो गेल्या वर्षी 42 टक्के होता. दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो तर शहराची 4,200 दशलक्ष लिटरची मागणी आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी बीएमसी पाणीपुरवठा वाढवण्याचे अनेक मार्ग शोधत आहे. जून 2021 मध्ये, नागरी संस्थेने मालाडमधील मनोरी येथे शहराच्या पहिल्या डिसॅलिनेशन प्रकल्पासाठी फर्मसोबत मेमो रँडम ऑफ अंडरस्टँडिंग वर स्वाक्षरी केली होती. मुंबईला एकून सात धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो.

संबंधित बातम्या : 

कंगना रणौत, नारायण राणे यांच्यानंतर मोहित कंबोज BMC च्या निशाण्यावर, पालिकेला अतिरिक्त बांधकामाचा संशय

TV9 Marathi Poll : एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून महाविकास आघाडीनं योग्य केलं का? जाणून घ्या जनतेचं मत

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.