Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी…घाटकोपर स्टेशन होणार हायफाय…!

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो.

Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी...घाटकोपर स्टेशन होणार हायफाय...!
Image Credit source: indiarailinfo.com
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:14 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) सकाळी सकाळी एक आनंदाची बातमी आहे. आता घाटकोपर रेल्वे स्टेशन हायफाय होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पुनर्विकास स्टेशनचा करण्यात येणार असून यामुळेच आता घाटकोपर (Ghatkopar) रेल्वे स्टेशन सुसज्ज असे होणार आहे. इतकेच नव्हेतर सरकते जिने तसेच लिफ्ट देखील स्टेशनमध्ये असणार आहे. यामुळे घाटकोपर स्टेशनवरून ये-जा करणाऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे. घाटकोपर स्टेशनवरून दररोज लाखांच्या संख्येमध्ये प्रवासी प्रवास (Travel) करतात. घाटकोपर स्टेशन तीन पादचारी पुलांशी जोडणारे तब्बल 12 मीटर रुंदीच्या जिन्यांनी जोडण्यात येणार आहे.

घाटकोपर स्टेशनचे रूपडे पलटणार

अनेक प्रवाश्यांना पायऱ्या चढण्यास आणि उतरण्यास त्रास होतो. मात्र, आता सरकत्या जिन्यांमुळे प्रवाश्यांचा त्रास कमी होणार आहे. मात्र, एलिव्हेटेड डेक बांधण्यासाठी स्टेशनचे तिकीट घर पाडण्यात आले असून प्लॅटफॉर्म 1 वर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मधल्या 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या उत्तर दिशेला आणखी 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येईल. यामुळे आता प्रवाश्यांना गर्दीची कटकट निश्चितपणे राहणार नाही. तसेच सीएसएमटी दिशेच्या 4 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या ऐवजी आता डबल डिस्चार्जचा नवा पादचारी पूल उभारला जाईल.

हे सुद्धा वाचा

सरकत्या जिन्याची व्यवस्था

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो. शिवाय मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. मात्र, ज्यावेळी आपण लोकलने प्रवास करतो, त्यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न अजिबात निर्माण होत नाही.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.