AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट करणार, पोलिसांना धमकीचा कॉल; अवघ्या काही तासात आरोपीच्या…

अवघ्या दोन अडीच तासातच जुहू पोलिसांनी या फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. त्याने पोलिसांना फेक कॉल केल्याची माहिती उघड झाली आहे.

मुंबईतील लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट करणार, पोलिसांना धमकीचा कॉल; अवघ्या काही तासात आरोपीच्या...
mumbai localImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 06, 2023 | 11:21 AM
Share

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : मुंबईतील लोकलमध्ये सीरिअल बॉम्बस्फोट करण्यात येणार आहे, असा धमकीचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. या फोननंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली असून पोलिसांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि अवघ्या दोन अडीच तासातच फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहे. फोन करणाऱ्याला अटक केल्यानंतर हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने फोनवरून धमकी दिली. मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहेत. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे, असं या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी कोणत्या लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असं विचारताच फोन करणाऱ्याने लगेच फोन कट केला. पोलिसांनी लगेच त्यानंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने फोन बंद केला होता. त्यानंतर पोलीस तात्काळ अलर्ट मोडवर आले. एकीकडे पोलिसांनी याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. तर दुसरीकडे फोन कॉल कुठून आला याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

लोकेशन ट्रेस झाले अन्….

कंट्रोल रुमला फोन आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे आरोपीचं लोकेशन शोधून काढलं. आरोपी जुहू परिसरात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी लगेच जुहू पोलिसांना याबाबतची माहिती दिली. जुहू पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी पकडला

अवघ्या दोन अडीच तासातच जुहू पोलिसांनी या फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणाऱ्या अशोक मुखियाला जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील नेहरू नगर परिसरातून अटक केली आहे. तो 25 वर्षांचा आहे. तो मुंबईतील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. आरोपी बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध बिहारमध्येही गुन्हा दाखल आहे. आता मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.

त्याने पोलिसांना फेक कॉल केल्याची माहिती उघड झाली आहे. सध्या आरोपीने धमकी का दिली?, तो दारूच्या नशेत होता का? या सर्व प्रश्नांचा तपास सध्या जुहू पोलीस करत आहेत. कोणत्याही रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आलेला नाही आहे. हा फक्त एक बनावट कॉल होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आधीही फोन आला

यापूर्वीही हरियाणाच्या गुरुग्राममध्ये पोलिसांना असाच धमकीचा फोन आला होता. दिल्ली आणि मुंबईतीली डोमेस्टिक एअरपोर्ट आणि इंटरनॅशनल एअरपोर्टवर मोठा बॉम्ब स्फोट होणार असल्याची धमकी या आरोपीने दिली होती. त्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर आले होते. गुरुग्राम पोलिसांनी या फोनची माहिती मुंबई पोलिसांनाही दिली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.