Maharashtra Rain Live | बिपीन रावत यांनी माझ्या विनंतीवरून नौदलास मदत करण्याचे निर्देश दिले : संभाजीराजे

| Updated on: Jul 23, 2021 | 11:40 PM

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर सांगली साताऱ्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलंय...

Maharashtra Rain Live | बिपीन रावत यांनी माझ्या विनंतीवरून नौदलास मदत करण्याचे निर्देश दिले : संभाजीराजे
प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Jul 2021 11:33 PM (IST)

    बिपीन रावत यांनी माझ्या विनंतीवरून नौदलास मदत करण्याचे निर्देश दिले : संभाजीराजे

    चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी माझ्या विनंतीवरून नौदलास महाराष्ट्र पूरस्थिती मदतकार्यासाठी तैनात होण्याचे व सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत, असं खासदार संभाजीराजे म्हणाले.

  • 23 Jul 2021 10:56 PM (IST)

    कोल्हापूर नंतर आता पुणे जिल्ह्यातही पुराचं थैमान, 420 गावं बाधित, दोघांचा मृत्यू, 700 जणांचं स्थलांतर

    पुणे :

    कोल्हापूर जिल्ह्यानंतर आता पुणे जिल्ह्यातही पुराचं थैमान

    पुणे जिल्ह्यात 420 गावं पुरानं बाधित,

    आतापर्यंत दोन व्यक्तीचा झाला मृत्यू

    तब्बल 700 लोकांना प्रशासनानं केलं स्थलांतरित,

    3 हजार 114 हेक्टरवरती झालं पिकांच नुकसान,

    तर 6 जनावरे पाण्यात गेली वाहून,

    मुळशी आणि वेल्हा तालूक्याला मोठा फटका ,

  • 23 Jul 2021 10:52 PM (IST)

    साताऱ्यात कैलास स्मशानभूमीत शिरलं पुराचं पाणी, अंत्यसंस्कार सुरु असाताना पूर आला

    साताऱ्यात कैलास स्मशानभूमीत शिरलं पुराचं पाणी, अंत्यसंस्कार सुरु असाताना पूर आला, साताऱ्याच्या संगम माहूली येथील संबंधित प्रकार घडला, यावेळी कर्मचाऱ्यांची प्रचंड धांदल उडाली

  • 23 Jul 2021 10:37 PM (IST)

    मुंबईच्या सायन-कोळीवाडा परिसरामध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला

    मुंबई : मुंबईच्या सायन-कोळीवाडा परिसरामध्ये चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे. बिल्डींग नंबर 10 अशी हाी इमारत आहे. या परिसरामध्ये एकूण 25 अशी जुनी इमारत आहेत. जुनी आणि धोकादायक असल्यामुळे संबंधित इमारत मुंबई महानगरपालिकाने आधीच खाली केली आहे. इमारत रिकामी असल्याने यामध्ये रहिवासी अडकायची शक्यता कमी आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या टीम घटनास्थळावर दाखल होऊन अधिक माहिती घेत आहेत.

  • 23 Jul 2021 09:46 PM (IST)

    चिपळूणच्या गोवळकोट गावात पाणी ओसरायला सुरुवात

    चिपळूणच्या गोवळकोट गावात पाणी ओसरायला सुरुवात, गोवळकोट येथे पुराचे पाणी कमी होऊन रोडच्या खाली आलं आहे. काल घरे आणि मंदिरे पुराच्या पाण्यात होती. मात्र आता पाणी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. गावातील सर्व मंडळी सुरक्षित आहेत. दोन घरांचे नुकसान झाले आहे. चिपळूण बाजार पेठमध्ये अजून पाणी, गावकऱ्यांकडून मदत कार्य सुरु, कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे
  • 23 Jul 2021 09:27 PM (IST)

    वैतरणा नदीतून 2 लाईनमन कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश

    पालघर जिल्ह्यात संततधार पावसामुळे उपटलेल्या विद्युत खांबांच्या दुरुस्तीसाठी नवीन लाईन टाकत असताना आज संध्याकाळी दोन लाईनमेन पालघर तालुक्यातील वैतरणा नदीपात्रात अडकले होते. त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे .

  • 23 Jul 2021 08:48 PM (IST)

    तटरक्षक दलामार्फत चिपळूण, महाडला मदतकार्य

    तटरक्षक दलामार्फत चिपळूण, महाडला मदतकार्य खाद्यपदार्थ, पाणी हेलिकॉप्टरमधून टाकले जात‌ आहे दोन्ही शहरात पावसाचा हाहाकार

  • 23 Jul 2021 08:44 PM (IST)

    कृष्णा नदीची धोक्याची पातळी ओलांडण्याला फक्त एक फूट बाकी

    कृष्णा नदीची धोक्याची पातळी ओलांडण्याला फक्त एक फूट बाकी
    दुपारी 40 फुटांवर असणारं पाणी 44 फुटांवर 45 फुटांवर आहे कृष्णा नदीची धोक्याची पातळी
  • 23 Jul 2021 08:13 PM (IST)

    बारामती : नीरा देवधर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम, पावर हाऊसमधून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

    बारामती : नीरा देवधर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम – दिवसभरात ११७ मिमी पावसाची झाली नोंद – सायंकाळी पावर हाऊसमधून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग – धरणातून अद्याप पाण्याचा नियमीत विसर्ग नाही – पावसाचा जोर कायम असल्याने दक्षता घेण्याचं आवाहन

  • 23 Jul 2021 08:12 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 290 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील २९० कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, २९० कुटुंबातील १२७१ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील १०७ कुटुंबातील ४२५ व्यक्ती तर सावंतवाडीतील ८४ कुटुंबातील ४५१ व्यक्ती व कुडाळ तालुक्यातील ७२ कुटुंबातील २७३ व्यक्सींह इतर अन्य तालुक्यातील आहेत. ओरिसा वरून निघालेल्या NDRF च्या दोन टीम गोव्यात पोचल्या असून तिथून त्या टीम सिंधुदुर्गकडे येण्यास निघाल्या असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • 23 Jul 2021 08:09 PM (IST)

    इंद्रावती नदीला पूर आल्यामुळे छत्तीसगड-महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग बंद

    गडचिरोली : इंद्रावती नदीला पूर आल्यामुळे छत्तीसगड-महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे.  छत्तीसगड राज्यातून उगम पावणारी नदी इंद्रावती नदीला मोठा पूर आलेला आहे. यामुळे जगदलपुर ते निजामबाद हा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतो. पाहतागुडम सोमनपल्ली गावातील मार्गावर तीन फुट पाणी असल्यामुळे मार्ग बंद आहे. या राष्ट्रीय महामार्गावरून कोणी प्रवास करू नये. पाण्याचा प्रभाव सर्वात जास्त असल्यामुळे गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या अंतिम सीमेवरून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमंपल्ली इथुन मार्ग बंद आहे.

  • 23 Jul 2021 07:51 PM (IST)

    महाराष्ट्रात महासंकट, खासदार सुप्रिया सुळे अमित शाह यांच्या भेटीला

    महाराष्ट्रातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई देखील होते. या भेटीत पूराच्या पार्श्वभूमीवर मदतीविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शाह यांनी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं.

  • 23 Jul 2021 07:41 PM (IST)

    पूरग्रस्तांकडे प्राधान्याने लक्ष देऊन गरज भागविली जाणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

     चिपळूणमध्ये पूर्ण शहराला पाण्याने वेढा दिल्याने जी घटना घडलेली आहे ती अघटीत घटना आहे. थोड्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे अशा घटना घडल्या आहेत. परिस्थिती कंट्रोलमध्ये आल्यानंतर नुकसान लक्षात येईल. यात किती मालाचे नुकसान झाले, मृत्यूचा आकड़ा किती आहे यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पूरग्रस्तांना लागणारी मदत पूर्ण प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यानी सांगितले.

    आरोग्य विभागाच्या दृष्टीने पुराच्या तडाख्यात असलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करून ठेवण्यात आलेले आहेत. त्यासोबत आरोग्याची कुमक देखील पाठविण्यात आलीय. मोठया हॉस्पिटलमध्ये पेशंटसाठी बेड राखीव ठेवण्यात आलेत. आवश्यक त्या सूचना आरोग्य विभागाकडून दिल्या जात आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

  • 23 Jul 2021 07:08 PM (IST)

    अलमट्टी धरणातून केला जाणारा विसर्ग आणखी वाढवला, तब्बल 3 लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

    सोलापूर :

    अलमट्टी उपडेट :

    अलमट्टी धरणातून केला जाणारा विसर्ग आणखी वाढवला

    तब्बल 3 लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

    सकाळी 2 लाख क्यूसेक गतीने सुरू होता विसर्ग

  • 23 Jul 2021 07:03 PM (IST)

    Karad Rain : खंडोबाची पाली गाव पाण्याखाली, दुपारपासून ढगफुटी सदृष्य पावसाने तारळी नदीला पूर

    कराड : खंडोबाची पाली गाव पाण्याखाली, दुपारपासून ढगफुटी सदृष्य पावसाने तारळी नदीला पूर, प्रथमच पाली गावात शिरले पुराचे पाणी, खंडोबा मंदिर जलमय झालं आहे, तारळी धरणातूनही सुरु आहे पाणी विसर्ग

  • 23 Jul 2021 06:56 PM (IST)

    Koyna dam water : कोयनेचं पाणी प्रीतिसंगमावर, यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला पाणी लागलं

    कोयना धरणातून सकाळी सोडलेल्या पाण्याने कराडच्या कृष्णा कोयना नदीच्या  पाणी पातळी वाढ झाली आहे. कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पाणी लागले  असून प्रीतीसंगम  बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे तर कृष्णामाई घाटावरील मंदिरे निम्म्याहून अधिक पाण्याखाली आहेत.

  • 23 Jul 2021 06:53 PM (IST)

    Raigad rain : सावित्री नदीचा प्रवाह पुन्हा वाढला

    रायगड : सावित्री नदीचा प्रवाह पुन्हा वाढला, नदीपात्राबाहेर पाणी जाऊन वाहत आहे, आजूबाजूच्या गावांना पुन्हा धोका, सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचं प्रशासनाकडून आवाहन

  • 23 Jul 2021 06:06 PM (IST)

    कोयनाच्या पाणी पातळीत वाढ, प्रीतीसंगम बाग पूर्णपणे पाण्याखाली, कृष्णामाई घाटावरील मंदिरे निम्म्याहून अधिक पाण्याखाली

    कराड : कोयना धरणातून सकाळी सोडलेल्या पाण्याने कराडच्या कृष्णा कोयना नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पाणी लागले असून प्रीतीसंगम बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे तर कृष्णामाई घाटावरील मंदिरे निम्म्याहून अधिक पाण्याखाली आहेत.

  • 23 Jul 2021 04:53 PM (IST)

    कोयना धरण अपडेट

    कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 10 फुटावर, एकूण 53360 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू

  • 23 Jul 2021 04:37 PM (IST)

    पंचगंगेची पाणी पातळी 53 फुटांवर, पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता

    कोल्हापूर :

    पुणे- बंगळुरू महामार्गावर शिरोली नाक्याजवळ महामार्गावर पाणी

    थोड्याच वेळात महामार्गवरची वाहतूक पूर्णपणे बंद होणार

    पंचगंगेची पाणी पातळी 53 फुटांच्यावर पोहचली

    कोल्हापूर शहरातून पुणे-बंगलोर महामार्गकडे जाणारे सर्व रस्ते सुद्धा झाले बंद

  • 23 Jul 2021 03:55 PM (IST)

    रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन, 11 जणांचा मृत्यू

    रायगड : पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 61 वर गेला आहे.

  • 23 Jul 2021 03:43 PM (IST)

    महाड तालुक्यातील आकले भोरावमध्ये जीवितहानी झालेली नाही, सर्व सुरक्षित

    रायगड :

    महाड तालुक्यातील आकले भोरावमध्ये जीवितहानी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत.

    परंतु अंदाजे 20 गुरे वाहून गेलीत. नुकसान जास्त झाले आहे, कपडे,अन्नधान्य काहीच राहिले नाही.

    महाड तालुक्यातील तळई गावामध्ये काल रात्री दरड कोसळली होती.

    आज सकाळी येथे एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात झाली.

    आतापर्यंत मातीच्या ढिगाऱ्याखालून 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

    तर आणखी 30 ते 40 जण या ठिकाणी अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

    या दरडीखाली 30 ते 35 घरे दबल्याची भीती होती. मात्र पूरपरिस्थितीमुळे सर्व रस्ते बंद असल्याने बचावकार्य सुरु करण्यात आले नव्हते.

    आज सकाळी पूराचे पाणी ओसरायला लागल्यानंतर लगेचच या ठिकाणी स्थानिकांच्या व एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

  • 23 Jul 2021 01:42 PM (IST)

    रायगडमधील तळई गावात मोठी दुर्घटना, दरड कोसळून तब्बल 32 जणांचा

    महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून (Raigad Landslide) तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात (Talai Village) ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.

  • 23 Jul 2021 12:17 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात आणि तेलंगाना राज्यात मुसळधार पाऊस काल रात्रीपासून सुरू आहे

    सकाळी काही तासासाठी पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे

    या पावसाच्या फटका अनेक नद्या व नाल्यांना बसत आहे

  • 23 Jul 2021 11:19 AM (IST)

    Kolhapur | कोल्हापूरच्या शाहपूरी, कुंभार गल्ली परिसरात शिरले पंचगंगा नदीचे पाणी

  • 23 Jul 2021 10:53 AM (IST)

    उद्या मुंबईला होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार

    उद्या मुंबईकडे होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार

    कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर परिणाम

    काल 76 हजार लिटर संकलन घटल

    आज तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज

    पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलन आणि विक्री वर देखील परिणाम

    अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती

  • 23 Jul 2021 10:35 AM (IST)

    साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घरं मातीच्या ढिगा-या खाली, 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

    साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घरं मातीच्या ढिगा-या खाली,

    27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, 2 महिला अद्याप बेपत्ता

  • 23 Jul 2021 10:23 AM (IST)

    कोयनेचा विसर्ग वाढवला, धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांवर

    कोयनेचा विसर्ग वाढवला

    धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांवर

    23714 कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू

    धरणात 78.31tmc पाणीसाठा झाला

  • 23 Jul 2021 10:22 AM (IST)

    कोल्हापुरात दुर्दैवाने 2019 सारखी परिस्थिती, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर : सतेज पाटील

    जिल्ह्यात सरासरी 150 मिलीमीटर पाऊस झालाय

    गरज भासल्यास एनडीआरएफ च्या आणखी दोन टीम मागणवार

    आज रात्री पर्यंत पंचगंगा नदी 53 फुटांवर जाण्याचा अंदाज आहे

    दुर्दैवाने एक 2019 सारखी परिस्थिती येत आहे

    स्थलांतर मोठ्या प्रमाणावर केलंय

    आज संध्याकाळी पर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडतील

    याचा फटका काही प्रमाणात बसणार आहे

  • 23 Jul 2021 09:54 AM (IST)

    सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला

    सिंधुदुर्ग : पहाटे पासून पावसाचा जोर ओसरला. मात्र अजून सखल भागात पाणी जिल्ह्यात मागील २४ तासात १३७ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस वैभववाडी तालुक्यात २१९ मिमी पडला तर सावंतवाडी तालुक्यात २१० मिमी पावसाची नोंद

  • 23 Jul 2021 09:48 AM (IST)

    कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील सर्वच नद्यांना पूर

    सिंधुदुर्ग : राञी उशीरा झालेल्या ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी. कुडाळ मधील माणगाव खो-यातील सर्वच नद्यांना आला पूर अनेक रस्ते गेले पाण्याखाली पावसाने आता विश्रांती घेतली असली तरी अनेक ठिकाणी सकल भागात पाणी अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडीत…

  • 23 Jul 2021 09:18 AM (IST)

    कोल्हापूरच्या पूरस्थितीचं गंभीर, नद्यांची पाणी पातळी वाढल्याने पुणे बेंगलोर महामार्ग बंद

    कोल्हापूर जिल्ह्याची पूरस्थिती गंभीर रूप घेतीय. पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणार्‍या नद्यांची पाणी पातळी वाढल्याने महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.

  • 23 Jul 2021 08:00 AM (IST)

    पंचगंगा नदीची पाणीपातळी अजूनही झपाट्याने वाढतेय

    पंचगंगा नदीची पाणीपातळी अजूनही झपाट्याने वाढतेय

    पाणी पातळी वाढत राहिल्यास परिस्थिती गंभीर बनेल

    इंडिया रेप टीमचे प्रमुख ब्रिजेश रैकवार यांनी व्यक्त केली भीती

  • 23 Jul 2021 07:36 AM (IST)

    महाडच्या चवदार तळ्याला पुराचा वेढा

    महाडमधील चवदार तळे, शहर, बाजारपेठ परिसरातील पूरस्थिती

  • 23 Jul 2021 07:34 AM (IST)

    पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    पंचगंगा नदीने रात्री ओलांडली धोक्याची पातळी

    पंचगंगा नदीचे पाणी पातळी 46 फूट एक इंचांवर

    जिल्ह्यातील 110 हुन अधिक बंधारे पाण्याखाली

    नदीकाठच्या गावातील लोकांचे स्थलांतर सुरू

  • 23 Jul 2021 07:33 AM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यातही तीन ते चार दिवसांपासून संततधार, पूर्णा नदीला पूर

    बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे..  काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे… त्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून  जनजीवन विस्कळीत झालंय..  दुसरीकडे  प्रशासनाकडून  जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांनी सतकर्तेचा इशारा दिलाय..

    चिखली , मेहकर, लोणार,  शेगाव आणि खामगाव परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने या तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प तुटुंब भरले आहेत… त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे… या पावसामुळे पिकांना जिवदान मिळालेले आहे…  आणखी पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे

  • 23 Jul 2021 07:32 AM (IST)

    कोयना धरणातून 6 दरवाजे 1.5 फुट उचलणार

    कोयना धरणातून 6 दरवाजे 1.5 फुट उचलणार 10 हजार क्युसेक चा करणार विसर्ग धरणात आता 86 टिमएमसी पाणी

  • 23 Jul 2021 07:31 AM (IST)

    उल्हास नदीत पूर, कल्याण मुरबाड महामार्ग बंद

    उल्हास नदीत पूर आला होता. कल्याण मुरबाड महामार्गावर असलेल्या रायता पूल पाण्याखाली होता. हा पूल उल्हास नदीवर आहे ,पुलाला जोडणारा रस्त्याच्या मोठा भाग खचल्याने रास्ता बंद  आहे , जवळपास 30 तासापासूम कल्याण मुरबाड महामार्ग बंद आहे . दुरुस्तीचा कामाला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. तोपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

  • 23 Jul 2021 07:30 AM (IST)

    महाडमध्ये पाणीच पाणी, नदी आणि रस्त्यावरच्या पाण्याची पातळी एकच

    मुंबई गोवा हायवेवरुन केंभुर्ली येथील महाडकडे जाण्याच्या मार्गावर नदीची पातळी व रस्त्यावरील पाणी एकच झाल्यामुळे महाड मध्ये जाणारे मार्ग बंद. ( महाडपासून ४-५ किमी अगोदरचा व्हिडीओ)

Published On - Jul 23,2021 7:27 AM

Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.