दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी

शिवसेनेने दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. (narayan rane slams shivsena over dadra nagar haveli by-election result)

दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच; नारायण राणेंची फटकेबाजी
narayan rane
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 12:42 PM

मुंबई: शिवसेनेने दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. त्यानंतर शिवसेनेने थेट भाजपलाच थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यावरून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. दुसऱ्यांच्या मुलाचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी चढवला आहे.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. बऱ्याच दिवसाने मी तुमच्यासमोर आलो आहे. काहींचे फटाके ऐकत होतो. संजय राऊतांचे अग्रलेख दोन दिवसांपासून वाचत होतो. देशात पोटनिवडणुका झाल्या. एक जागा अपक्ष उमेदवार जिंकला. शिवसेनेने मात्र डंका सुरू केला आम्ही जिंकलो. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही जिंकलो असा डंका पिटत आहेत सर्वत्र. मी मुद्दामहून त्या विजयी उमेदवाराची निशाणी मागवून घेतली. बॅट घेऊन उभा असलेला फलंदाज ही त्या उमेदवाराची निशाणी आहे. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच, असा सणसणीत टोला राणेंनी लगावला.

राऊतांना भानच नाही

कलाबेन डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं, आम्ही दिल्ली काबीज करणार, असा दावा राऊत करत आहेत. संजय राऊतांना लिखाण करताना त्यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर जागेवर डोकं राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसतील, असा हल्लाही त्यांनी चढवला.

मोदींची मेहरबानी म्हणून निवडून आलात

भाजपवर टीकेचा भडीमार सुरू आहे. आता 56 आमदार आहात. ते मोदींमुळेच निवडून आला आहात. नाही तर 8च्यावर गेला नसता. राजकीय निरीक्षकही त्यावेळी हाच आकडा सांगत होते. मोदींची मेहरबानी म्हणून 56चा आकडा आला. युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं, असं सांगतानाच मुख्यमंत्री काय बोलतात ते कळत नाही. पत्रकारांना कसं कळतं? मुख्यमंत्र्यांची चौफेर फटकेबाजी म्हणून सांगता. पण फटकेबाजी नेमकी काय? मीडियाने आतापर्यंत सांभाळलं, असंही त्यांनी सांगितलं.

हेडिंगच वाचून दाखवल्या

यावेळी राणेंनी शरद पवार आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेने दिलेल्या हेडिंगच वाचून दाखवल्या. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे अधू मेंदूचे लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प तुमच्या दिवट्याने कसे अर्धवट टाकले हे पाहा, अशा हेडिंग सामनाने दिल्या होत्या. आज मात्र ते पवार आणि काँग्रेसचे गुणगाण गात आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. असं त्यांनी लिहिलं होतं.

संजय राऊत सरकलाय

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्राच्या सत्तेला टक्कर देण्याची भाषा केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संजय राऊत सरकलाय. एका माणासमुळे सत्ता बदलणार? मग मॅजोरिटी वगैरे कशासाठी हवी? असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

शिवसेनेच्या वाघिणीचं जंगी स्वागत, रश्मी ठाकरेंकडून डेलकरांचं औक्षण, मातोश्रीचा खास पाहुणचार

महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा फडकवला, आता कलाबेन डेलकर म्हणतात….

दादरा नगर-हवेलीतून शिवसेनेचं सीमोल्लंघन, आता अन्य राज्यातही निवडणूक लढवणार? आदित्य ठाकरेंना सांगितला प्लॅन

(narayan rane slams shivsena over dadra nagar haveli by-election result)

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.