राष्ट्रवादीचं ‘मिशन 114’?, विधानसभेला तिकीट दिलेल्या 114 उमेदवारांसोबत पवारांची बैठक; मतदारसंघांचा घेतला आढावा

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. (nawab malik reaction on ncp meeting in mumbai)

राष्ट्रवादीचं 'मिशन 114'?, विधानसभेला तिकीट दिलेल्या 114 उमेदवारांसोबत पवारांची बैठक; मतदारसंघांचा घेतला आढावा
sharad pawar
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 4:11 PM

मुंबई: विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज आजी-माजी आमदारांसह विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलेल्या सर्व 114 उमेदवारांसोबत चर्चा केली. यावेळी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी मिशन 114च्या कामाला लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (nawab malik reaction on ncp meeting in mumbai)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आजी-माजी आमदार आणि विधानसभा निवडणुकीत तिकिट दिलेले 114 उमेदवार उपस्थित होते. यावेळी पवारांनी सर्वांकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनाही जाणून घेतल्या.

प्रश्नांची सोडवणूक करणार

या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधला. 2019च्या निवडणुकीत 114 उमेदवारांना तिकीट दिलं होतं. त्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला खासदार, मंत्रीही उपस्थित होते. यावेळी एकूण 55 लोकांनी आपली मते मांडली. मतदारसंघातील परिस्थिती, तिथले प्रश्न आदी मुद्दे त्यांनी बैठकीत मांडले. तसेच सरकारकडून असलेल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. या बैठकीत ज्या सूचना मांडण्यात आल्या आहेत. त्याची नोंद मंत्र्यांनी घेतली आहे. सरकारच्या माध्यमातून या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे, असं मलिक म्हणाले.

सरसकट आघाडी नाही

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी ओबीसींसाठी जागा आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसीच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणाशाही सरसकट आघाडी किंवा युती केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

चिपी विमानतळाला आघाडीच्या काळात मंजुरी

गणपती विसर्जन झाल्यावर जनता दरबार पुम्हा सुरू होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. चिपी विमानतळाला आघाडी सरकारच्या काळात मंजुरी मिळाली आहे. तेव्हा भाजप विरोधात होता. त्याचं काम आमच्या काळातलं आहे. भाजपनं उगाच‌ याचं श्रेय घेऊ नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी?

दरम्यान, तीन वर्षानंतर विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 114 जागा आल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादीने या 114 मतदारसंघावरच अधिक फोकस करण्यास सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. या 114 मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पवारांनी आज जाणून घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीने मिशन 114 हाती घेतल्याचं बोललं जात आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. आजची बैठक सुद्धा मतदारसंघातील मोर्चेबांधणीचा भाग असल्याचंच राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. (nawab malik reaction on ncp meeting in mumbai)

संबंधित बातम्या:

‘फालतू गप्पा नको, बेळगाव महाराष्ट्राचे की नाही ते स्पष्ट करा’, फडणवीसांच्या टीकेनंतर राऊतांचं थेट आव्हान

‘बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव’, फडणवीसांचा घणाघात

आधी फडणवीस, आता शेलारांकडून राणेंच्या विधानापासून फारकत; शेलार म्हणाले, विमानतळाच्या उद्घाटनला मुख्यमंत्र्यांनी यावं

(nawab malik reaction on ncp meeting in mumbai)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.