गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (NCP chief spokesperson nawab malik demand SIT inquiry of NCB case)

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा
NAWAB MALIK
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 2:16 PM

मुंबई: केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दखल घ्यावी. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. वसुली सुरू आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. आता त्यांचाच पंच समोर आला असून त्यानेच गौप्यस्फोट केले आहेत. याबाबत पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांशी बोलणार. या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे. या लोकांनी हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. कुठे तरी या घटनेची दखल घेऊन त्याची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे. याबाबत मी मागणी करणार आहे. उद्या रात्री मुंबईत आल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस आयुक्तांना भेटून ही मागणी करणार आहे, असं मलिक यांनी सांगितलं.

त्यांचाच पंच बोलत आहे

प्रभाकर साईल याचा व्हिडीओ हे एक षडयंत्रं असल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना काहीही बोलू द्या. साळी स्वत:च सांगतो तो गोस्वीचा बॉडीगार्ड आहे. मी गोसावी आणि भानुशालीचा व्हिडीओ काढल्यानंतर एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंग यांनी पीसी घेतली होती. त्यावेळी त्यांनी नऊ लोकांची नावे घेतली होती. त्यातील हा पहिल्या नंबरचा पंच आहे. पंच यांनीच आणले. पंच यांनीच ठरवले. तो गोसावीची बॉडी गार्ड आहे. त्याने गौप्यस्फोट केल्यानंतर हे षडयंत्रं सांगत आहेत. आमचं म्हणणं आहे चौकशी होऊ द्या. त्यात सर्व बाहेर येईल. हेच नाही इतर लोकांकडूनही यांनी पैसे घेतले आहेत. तेही हळूहळू बाहेर येतील. बोलू शकतील, असं त्यांनी सांगितलं.

ही तर संघटीत गुन्हेगारी

सुरुवातीपासून सांगत आहे बोगस केसेसे तयार केल्या जात होत्या. फिल्म इंडस्ट्रीतले आणि श्रीमंत लोकांमध्ये भीती निर्माण करून त्यांच्या कढून पैसे उकळण्याचा हा धंदा आहे. फिल्म इंडस्ट्रीत एक केस रजिस्टर झाली. त्यात एकही अटक नाही. एक वर्षापासून केस तशीच पडून आहे. लोकांना बोलवून तोडपाणी केली जात आहे. कुणालाही अटक केली जात नाही. दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. हा गंभीर विषय आहे. संघटीत गुन्हेगारी सुरू आहे. त्याची दखल घेऊन एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरू केली पाहिजे. परमबीर सिंग सारखे माणसं शहरात अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांना लगाम घातला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात, मी स्वागताला तयार!

पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांकडे सापडले 100 कोटींचे घबाड; नोटा मोजायला 80 अधिकाऱ्यांना लागले तब्बल 18 तास

रंगेल राजाचे 5000 महिलांशी लैंगिक संबंध, फीमेल हार्मोन्स शरीरात सोडून राजाला केलं ‘शांत’!

(NCP chief spokesperson nawab malik demand SIT inquiry of NCB case)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.