समीर वानखेडे मुस्लिमच! नवाब मलिकांनी शाळेचा दाखलाच सादर केला, खरंच जातीच्या प्रमाणपत्राचं फ्रॉड केलं?
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत की हिंदू यावर आज कोर्टात फैसला होणार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल केला आहे.
मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत की हिंदू यावर आज कोर्टात फैसला होणार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल केला आहे. या दाखल्यानुसार समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचंच दिसून येत आहे. राष्ट्रवादीने हा दाखला व्हायर केला असला तरी काही वेळातच वानखेडे हे मुस्लिम की हिंदू आहेत हे कोर्टाकडून स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले व्हायरल केले आहेत. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं लिहिलं आहे. सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला 1989चा आहे. त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे. तर सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला 27 जून 1986चा आहे. त्यातही वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आणि जन्म ठिकाण मुंबई दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे वानखेडे हे मुस्लिम असल्याचं दिसून येत आहे.
समीर दाऊद वानखेडे, पण संभ्रम कायम
विशेष म्हणजे समीर वानखेडे यांच्या दोन्ही दाखल्यांवर समीर दाऊद वानखेडे असा नावाचा उल्लेख आहे. त्यात समीर ज्ञानदेव वानखेडे असा उल्लेख नाही. विशेष म्हणजे सेंट जोसेफ हायस्कूलच्या नावाने दोन दाखले व्हायरल होत आहेत. एका दाखल्यात समीर दाऊद वानखेडे आणि दुसऱ्या दाखल्यात समीर ज्ञानदेव वानखेडे असा उल्लेख आहे. पहिल्या दाखल्यात धर्म मुस्लिम दाखवण्यात आला आहे. तर दुसऱ्या दाखल्यात जात महार दाखवण्यात आली आहे. ज्या दाखल्यावर जात महार आणि वानखेडे समीर ज्ञानदेव लिहिलं आहे त्याची कॉपी अटेस्टेड करण्यात आलेली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंचा खरा दाखला कोणता? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेकडूनही कागदपत्रं सादर
या संदर्भात महापालिकेकडूनही वानखेडेंबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली होती. वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं दिसून आलं आहे. महापालिकेने ही सर्व कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटमुळे त्यांच्याविरोधात निर्णय जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या मते तर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून ही कागदपत्रं कोर्टात सादर केली आहेत. मात्र, या वृत्ताला पालिकेने दुजोरा दिला नसला तरी पालिकेने कोर्टात कागदपत्रं सादर केल्याने उद्या कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात उद्या इन चेंबर सुनावणी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या सुनावणीवेळी समीर वानखेडे यांच्या वकिलांनाही ही कागदपत्र दिली जाणार आहे. त्यामुळे वानखेडे यांच्याकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या:
मोठी बातमी! 35 वर्षांपासून महानिर्मितीकडे असलेलं कोयना धरण विकण्याच्या तयारीत
Maharashtra News LIVE Update | समीर वानखेडेंच्या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर धर्म मुस्लिम