नेहरुंनी ही माफी मागितली होती, तर मोदी कोण – संजय राऊत

महाविकासआघाडी मुंबईत उद्या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. पण अद्याप या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. संजय राऊत म्हणाले की, यामध्ये परवानगीचा विषयच नाही. भावना व्यक्त करायला परवानगी कशाला हवी असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

नेहरुंनी ही माफी मागितली होती, तर मोदी कोण - संजय राऊत
संजय राऊत
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 5:30 PM

महाविकासआघाडीचं मुंबईत उद्या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन होणार आहे. पण जोडे मारो आंदोलनाला अजून ही मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. याबाबत टीव्ही ९ मराठी सोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘आंदोलनाला परवानगी नाकारण्याचं कारण नाही. आणि आम्हाला पण परवानगीची गरज नाही. हुतात्मा चौकात जमून आम्ही गेट वे कडे जाणार असू शांतपणे तर त्याला परवानगीची गरज काय. लोकशाही मध्ये आंदोलन करायचे नाही का.भावना व्यक्त करायचे नाही का. संविधान बदलायच्या मागे हे सरकार आहे. उद्या आम्ही जाऊ तर आम्हाला अटक करा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानाच्या विरोधात आम्ही शांतपणे आमच्या भावना व्यक्त करु. हे जर चुकीचं असेल तर त्यांनी आम्हाला अटक करावी.’

‘राज्य सरकारला प्रतिमा आहे का. हे घटनाबाह्य सरकार आहे. शिवाजी महाराजांचा अपमान होतोय. माफी मागण्याने प्रश्न सुटत नाही. ही तुमची मजबूरी आहे. माफी मागितली म्हणजे उपकार केले नाही. लोकांनी तुम्हाला खरोखर जोडे मारतील. लोकांना व्यक्त होऊ द्या. तुम्हाला अडचण काय आहे.’

‘कोर्ट म्हणते बंदला परवानगी नाही. पण बंगालमध्ये काय झालं. इथे मोदींच्या चमच्यांचं राज्य आहे तर त्यांना परवानगी नाही. तिथे आंदोलनाला परवानगी. मग इकडे का नाही. माफी मागितली तर ठीक आहे. निवडणुका आहेत माफी मागावीच लागेल. नाक घासावेच लागेल. नेहरुंनी ही माफी मागितली होती. तर मोदी कोण आहेत.’ ‘आदित्य ठाकरे मालवणला गेले तेव्हा रस्ते अडवून नंगा नाच सुरु होता. भाजपचेच लोकं थयथयाट सुरु होता. मग त्यांचं लोकं जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करताय तर त्यांना अटक का नाही केली’

‘आंदोलन का यशस्वी होणार नाही. महाराजांच्या अपमानानंतर जर लोकं बाहेर पडले नाही तर त्यांनी पुन्हा महाराजांचे नाव घेऊ नये. आम्ही रस्त्यावर येऊ. आम्हाला सामाजिक भान आहे. कोणाला त्रास होऊ नये याचं भान आहे. काँग्रेसचं राज्य असताना देखील आम्हाला आंदोलनाची परवानगी मिळाली होती.’

‘सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणे मुर्खपणा आहे. सावकरांचे पाहू ना आम्ही. तुम्हाला पुळका आहे तर त्यांना भारतरत्न का देत नाहीत. सावरकराचं सहा सोनेरी पान हे मोदींनी वाचावे.’

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.