VIDEO: महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

सभागृहात मास्क घालून न येणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कोरोनाचं संकट अजून गेलं नाही. ओमिक्रॉनचा धोका आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे.

VIDEO: महाराष्ट्रासह देशभरात रात्रीचा लॉकडाऊन लागणार?; अजित पवार नेमकं काय म्हणाले?
ajit pawar
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 2:55 PM

मुंबई: सभागृहात मास्क घालून न येणाऱ्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कोरोनाचं संकट अजून गेलं नाही. ओमिक्रॉनचा धोका आहेच पण अजून नवीन विषाणूही आला आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोनाची गंभीर दखल घेतली आहे. आता तर रात्रीचा लॉकडाऊन करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू आहे, अशी माहिती अजित पवार यांनी साभागृहात दिली. त्यामुळे रात्रीचा लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोरोना संकटातही विधानसभेत बेफिकीर असणाऱ्या सदस्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. देशात कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधानही कोरोना संकटावर गंभीर आहेत. त्यामुळे देशात रात्रीचा लॉकडाऊन लावण्यावर उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे, असं अजित पवार म्हणाले.

मास्क लावूच बसा

विरोधी पक्षनेते तुम्हालाही विनंती आहे. आपल्या सर्व गोष्टी, व्हिडिओ, ऑडिओ बाहेर जातात. चॅनलला प्रक्षेपण केलं जातं. कितीही कुणी प्रयत्न केला तरी संकट काही संपलेलं नाही. आता अजून एक व्हेरिएंट पुढे आला आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. तर, सभापती नरहरी झिरवाळ यांनी सर्वांनी मास्क लावण्याच्या सूचना केल्या. बोलताना अडचण येत असेल तरच मास्क काढून ठेवा, अन्यथा मास्क लावूनच सभागृहात बसा, अशा सूचना झिरवाळ यांनी दिल्या.

कोविड मृत्यूंचे प्रमाण घटले

दरम्यान, मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असली तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आलेख घसरताच आहे. या महिन्यात जवळपास पाच दिवस मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नाही. राज्यात 14 डिसेंबर ते 20 डिसेंबरदरम्यान सक्रिय रुग्णसंख्या 9 टक्क्यांनी वाढली. हा आकडा 7,093 पर्यंत केला. यापूर्वीच्या आठवड्यात ही संख्या 6,481 एवढी होती. राज्य आजार सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणतात, रुग्णांमधील ही वाढ अगदी कमी प्रमाणात असून ती शहरापुरती मर्यादित आहे.

धारावी- माहीममध्ये रुग्णसंख्या घटली

मुंबईतील धारावी आणि माहीममध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गेल्या तीन दिवसात तर माहीममध्ये फक्त 14 रुग्ण आढळून आले आहेत. माहीममध्ये पार पडलेला मेळा आणि चर्चमधील वाढत्या संख्येमुळेही कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 15 ते 21 डिसेंबर या सहा दिवसात राज्यातील लसीकरण 24 टक्क्यांपर्यंत घसरले असून हा आकडा 5 लाख 34 हजारांपर्यंत गेला आहे.

संबंधित बातम्या:

Omicron| मोठा दिलासा, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा समूह संसर्ग नाही; बूस्टर डोसबाबत पुढच्या आठवड्यात निर्णय

बचत गटांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या भीमथडी जत्रेला सुरुवात

पुण्यात दोघांचा एकाच झाडाला गळफास, तरुणीचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.