VIDEO: आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून ‘म्याऊ… म्याऊ’च्या घोषणा; नेमकं काय घडलं विधानभवनाच्या पायरीवर?

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांचा बाप काढल्याने अधिवेशनाचं वातावरण तापलेलं असतानाच आज विधानभवन परिसरात अजबच प्रकार घडलाय.

VIDEO:  आदित्य ठाकरे येताच नितेश राणेंकडून 'म्याऊ... म्याऊ'च्या घोषणा; नेमकं काय घडलं विधानभवनाच्या पायरीवर?
nitesh rane
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 11:56 AM

मुंबई: आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आधीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांचा बाप काढल्याने अधिवेशनाचं वातावरण तापलेलं असतानाच आज विधानभवन परिसरात अजबच प्रकार घडलाय. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रवेश करत असताना विधीमंडळाच्या पायरीवर आंदोलन करत असलेल्या भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य यांना पाहून म्याऊ… म्याऊच्या घोषणा दिल्या. नितेश राणे या घोषणा देत असताना भाजपचे नेते मात्र हसत होते.

आज दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते. काय म्हणाले दादा, ठाकरे सरकार शोधून आणा… अशा घोषणा विरोधक देत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते.

रात्रीच्या बैठका बंद कराव्यात

आदित्य ठाकरे यांना धमकी आली आहे. त्यावरूनही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. धमकी देण्यासारखं आदित्य ठाकरे काय करतात? त्यांना कोणत्या आवाजात धमक्या आल्या. त्यांनी रात्री 7 आणि 8 नंतरच्या बैठका बंद कराव्यात म्हणजे त्यांना धमक्या येणार नाहीत, अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी दिली.

मेसेज पाठवून धमकी

दरम्यान, आरोपीने सर्वप्रमथ 8 डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पहिला मॅसेज पाठवला होता. या मॅसेजवर ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप आरोपीने आपल्या मॅसेजमध्ये केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी या मॅसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना दूरध्वनीवरून तिनदा कॉल केले. आदित्य यांनी ते कॉल स्वीकारले नाही. कॉल स्वीकारले नसल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: मुख्यमंत्री दोन दिवसात सभागृहात येतीलही, पंतप्रधान तंदुरुस्त, संसदेत का येत नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार?; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

Shakti Act: महिला अत्याचाराविरुद्ध शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनातच मंजूर होणार, काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.