Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितलं नेमकं गणित

महाराष्ट्रासह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत.

Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितलं नेमकं गणित
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 3:15 PM

मुंबई: महाराष्ट्रासह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात कठोर निर्बंध लावले जात आहेत. महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागमार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच लॉकडाऊन कधी लावला जाऊ शकतो याची माहितीच दिली आहे.

राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना संसर्ग, ओमिक्रॉनचा धोका, लॉकडाऊन आणि निर्बंध यावर भाष्य केलं. यापुढे लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन लावण्याचं ठरवणार आहोत. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

निर्बंध लावायचे नाहीत, पण

ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नाही. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं.

ओमिक्रॉनचा वेग काळजी करायला लावणारा

दुपटीनं रुग्ण वाढण्याचं प्रमाण असं सुरु राहिलं, तर आणखी कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लोकांनी गर्दी टाळावी, निर्बंध पाळावेत आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी यावेळी केलं आहे. परदेशात लाखात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. ऑमिक्रॉनचा वेग हा काळजी करायला लावणारा आहे. या वेगावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही, तर रुग्णवाढीनं पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची भीतीही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला ओमिक्रॉनचे रुग्ण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. हा वेग वेळीच रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचलणं गरजेचं होतं, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. त्यामुळेच लग्न समारंभ, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स याबाबत निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या सर्व निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Rajesh Tope: राज्यात नवे नियम, ओमिक्रॉनचा धोका वाढला, शाळांचं काय होणार? टोपेंचं सविस्तर स्पष्टीकरण

Omicron | ‘तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल’, राजेश टोपेंनी सांगितलं तिसऱ्या लाटेचं गणित

अध्यापक विकास संस्था शहाण्यांना अधिक शहाणं करणार; सुपेंबद्दल अजितदादा नेमकं काय म्हणाले?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.