Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख

पालिकेकडून 'आर-मध्य' बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

Water Supply: दहिसर, बोरिवलीत दोन दिवस पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या वेळ आणि तारीख
नागपुरात आज पाणीबाणीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 7:00 AM

दहिसर (Dahisar), बोरिवलीच्या (Borivali) काही भागात 5 मे रोजी रात्री 11.55 वाजल्यापासून 6 मे रोजी रात्री 11.55 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पालिकेकडून ‘आर-मध्य’ बोरिवली पश्चिम परिसरात लिंक रोडच्या पूर्वेकडील पाईपलाईन वळवण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईनचं काम सुरू असताना ‘आर-मध्य’ विभागातील चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा आणि संपूर्ण बोरिवली पश्चिममध्ये 6 मे रोजी संध्याकाळी 7.10 ते रात्री 9.40 आणि सकाळी 11.50 ते दुपारी 1.50 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. ‘आर उत्तर’ विभागातील एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गाव, कांदरपाडा, लिंक रोड आणि संपूर्ण दहिसर पश्चिम विभागात रात्री 9.40 ते रात्री 11.55 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय.

राज्यात पाणीटंचाईची भीती

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत विक्रमी उष्म्यामुळे राज्यभरातील धरणांमधून 27 टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे सध्या केवळ 44 टक्के पाणीसाठाच शिल्लक आहे. मुंबईतील धरणांत 27 टक्के तर ठाणे जिल्ह्यातील धरणांत 45 टक्के पाणीसाठा उरला आहे. वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसांत या साठ्यात आणखी घट झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

2 मार्चला राज्यातील धरणांमध्ये 71 टक्के पाणीसाठा होता. 15 दिवसांपूर्वी राज्यात सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या पुणे विभागात सध्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वांत कमी पाणी शिल्लक आहे. तापमानवाढीपुढे येत्या काही दिवसांत इतर विभागातील धरणांमधील जलसाठ्यावरही परिणाम होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या 45 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उल्हास नदीची पाणी पातळीही समाधानकारक आहे. असं असूनही वितरण व्यवस्थेतील दोषामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अशा अनेक शहरांसह नवी मुंबईतील काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवतेय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.