PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळ दाखल होणार आहेत. त्यांचा आजचा मुंबई दौरा नेमका कसा असेल, याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenrda Modi) आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मरोळमध्ये मुंबई महानगरपालिका (BMC) आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेली अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळ दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा मुंबई दौरा नेमका कसा असेल, याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा कसा असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते मुंबई विमानतळावरून हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती येणार. मोदी दुपारी 2.45 वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्लॅटफॉर्म अठरावर दोन मिनिटांसाठी चालत वंदे भारतच्या ट्रेनकडे जाणार आहेत. वंदे भारतमध्ये लहान मुलांसोबत 7 मिनिट मोदी गप्पा मारतील. ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, साधारणता 3 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. मोदींना 1 मिनिटांचं यासंदर्भात प्रेसेंटेशन दिलं जाईल.
मोदी त्यानंतर प्लॅटफॉर्म 18 वरून वाहनाच्या दिशेने 2 मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरतीदाखल होतील. सीएसएसटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर 18 वरती हा साधारणता 15 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल.
पंतप्रधान मोदी पुन्हा 3.55 ला सीएसएमटीवरून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील. पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईविमानतळाच्या दिशेने रवाना होतील.
मोदी दुपारी 4.20 मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील. नंतर मोदी मुंबई विमानतळ ते मरोळ कारने जाणार आहेत. मरोळ येथील कार्यक्रमाला 4.30 वाजता पोहचतील. ऑलझकेरिया ट्रस्ट सैफी नवीन कॅम्पसच उद्घाटन होईल.
पंतप्रधान मोदी 5.50 वाजता मरोळहून कारने मुंबई विमानतळावर जाणार आहेत. तिथून मोदी सहा वाजता मुंबई विमानतळावरून दिल्लीच्या दिशेने रवाना होतील.