AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील

आज देशात पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. देशातील लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे देश एकवटला होता. (Quit India Movement: jayant patil pays tribute to freedom fighters)

पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा, लोकशाही वाचवण्यासाठी देश एकवटल्याशिवाय राहणार नाही: जयंत पाटील
jayant patil
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 11:48 AM
Share

मुंबई: आज देशात पेगाससद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. देशातील लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे देश एकवटला होता, त्याचप्रमाणे आजही लोकशाही वाचवण्यासाठी, भारतीय संविधानाचा मान राखण्यासाठी संपूर्ण देश एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केला. (Quit India Movement: jayant patil pays tribute to freedom fighters)

जयंत पाटील यांनी आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. याच ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी ‘भारत छोडो’चा नारा देण्यात आला होता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून ब्रिटिशांना परतवून लावण्यात आले होते. आजही देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पेगासससारख्या गोष्टी आणत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे, असे पाटील म्हणाले.

स्वातंत्र्य चिरंतन ठेवण्याचा पुनर्निधार करुया: पवार

देशवासियांसाठी ‘नऊ ऑगस्ट’ क्रांतीदिनाचं महत्व स्वातंत्र्य दिनाइतकंच आहे. देशावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या इंग्रज सरकारला 1942 मध्ये आजच्याच दिवशी ‘चले जाव’ असं निक्षूण सांगण्यात आलं. स्वातंत्र्यासाठी ‘जिंकू किंवा मरु’ची शपथ देशवासियांनी घेतली. मोठे नेते तुरुंगात बंद झाल्यानंतर सामान्य माणसांनी नेतृत्वं हाती घेऊन स्वातंत्र्यलढा पुढे नेला. देशातला सामान्य माणूसही देशहितासाठी त्याग करु शकतो. प्राणांचं बलिदान देऊ शकतो. नेतृत्व करु शकतो, हे 9 ऑगस्टच्या ऐतिहासिक क्रांतीदिनाने सिद्ध केले आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य चिरंतन ठेवण्याचा पुनर्निर्धार करुया…, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. (Quit India Movement: jayant patil pays tribute to freedom fighters)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: दिल्लीत भाजप नेत्यांची खलबतं, देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या भेटीला

लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा झाली असेल, दानवेंशी चर्चा करायची गरज नाही; राऊतांचा खोचक टोला

Maharashtra News LIVE Update | नाशिकच्या सातपूर परिसरातील राज्य विमा कर्मचारी रुग्णालयाच्या बाहेर लसीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

(Quit India Movement: jayant patil pays tribute to freedom fighters)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.