AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : परत बांग दिली तर आमचे लोक हनुमान चालिसा वाजवणारच, राज ठाकरेंचा पुन्हा इशारा

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

Raj Thackeray : परत बांग दिली तर आमचे लोक हनुमान चालिसा वाजवणारच, राज ठाकरेंचा पुन्हा इशारा
परत बांग दिली तर आमचे लोक हनुमान चालिसा वाजवणारच, राज ठाकरेंचा पुन्हा इशाराImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 2:39 PM
Share

मुंबई: परवा औरंगाबादेत अजान झाली. त्यावेळी मी पोलिसांना आवाहन केलं. अन्यथा भडकवायचं असतं तर काय प्रकरण झालं असतं मला सांगा. आम्ही शांततेत सांगतो. सरकारने ऐकावं. पोलिसांनी समजून घ्यावं. आमच्या लोकांची धरपकड. कशासाठी मोबाईलच्या काळात. माणसं पकडून काय हातात लागणार आहे, असं सांगतानाच परत बांग (LoudSpeaker Ban) दिली तर आमचे लोक हनुमान चालिसा (hanuman chalisa) वाजवणारच, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी दिला. महिला आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो एवढं समजत नाही? यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे? हे आवाज बंद झाले पाहिजेत. हा विषय एक दिवसाचा नाही. 4 तारीख दिली म्हणून फक्त 4 तारखेलाच आंदोलन राहणार नाही. आंदोलन सुरूच राहील, असं इशाराही त्यांनी दिला. कालपण सांगितलं, परत सांगतो हा सामाजिक विषय आहे. धार्मिक नाही. त्याला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही धार्मिक वळण देऊ, असंही त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भोंग्यांवरून आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. हा विषय एक दिवसाचा नाही. महाराष्ट्र सैनिक आणि हिंदू बांधवांना हेच सांगायचं हा विषय एका दिवसाचा नाही. ज्या मशिदीत भोंगे लागेल त्या ठिकाणी हनुमान चालिसा दुप्पट लावा. पोलीस मुंबईतील 135 मशिदींवर काय कारवाई करणार आहे. ते आम्हाला एकदा समजू देत. ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही आमच्या धर्माला घट्ट राहावं लागेल. तुमच्या सणासुदीला लाऊडस्पीकर लागतो तर समजू शकतो. पण 365 दिवस तुम्ही लावत असाल तर आम्हाला नाही ऐकायचं ते, असं राज ठाकरे म्हणाले.

हा कोणता न्याय आहे?

आज सकाळापासून मला राज्यातून फोन येत आहेत. आमच्या नेत्यांना फोन येत आहेत. राज्याच्या बाहेरूनही अनेक ठिकाणाहूनही फोन येत आहेत. माहिती मिळत आहे. पोलिसांचे फोन येत आहेत. काही गोष्टी पोलीस सांगत आहेत. सर्वसाधारणपणे आता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, सैनिकांना पोलीस नोटीस पाठवत आहेत. ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्याबाबत का होते एवढाच प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना सजा देणार. ताब्यात घेणार. जे पालन करत नाहीत त्यांना मोकळीक देणार. हा कोणता न्याय आहे?, असा सवाल त्यांनी केला.

केवळ आमच्या मुलांना का अटक करता?

तरी सांगतो. 90 ते 92 ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोकं तयार होते. मशिदीतील मौलवींचे आभार मानतो. आमचा विषय त्यांना नीट समजला. पण मला आता मुंबईचा जो रिपोर्ट आला. त्याप्रमाणे मुंबईत 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिदींवर पाच वाजेच्या आत अजान लागली गेली. नांगरे पाटील यांचा फोन आला ते म्हणाले आम्ही सर्वांशी बोललो. ते भोंगे लावणार नाही. मग 135 मशिदींवर कारवाई करणार की नाही केवळ आमच्या मुलांना का अटक करता? असा सवालही त्यांनी केला.

हा विषय क्रेडिटचा नाही

हा विषय क्रेडिटचा नाही. सामंजस्याचा आहे. सामुहिक आहे. मला क्रेडिट घ्यायचं नाही. तुम्ही दाखवलं. आम्ही बोललो. लोकांनी अजान बंद केली. मौलवींनी ऐकलं. पोलिसांचही धन्यवाद. मीडियाचेही धन्यवाद. हा सामुहिक प्रयत्न होता. लोकांचा त्रास होतो तो कमी होईल ही अपेक्षा होती, असं ते म्हणाले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.