विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे?; आणखी तीन बडे नेतेही चर्चेत

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे?; आणखी तीन बडे नेतेही चर्चेत
Sangram Thopte
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 11:46 AM

मुंबई: विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून चार नेत्यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. येत्या 28 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. त्याचवेळी विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मात्र, हे पद कुणाला द्यायचं हे ठरत नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. सध्या या पदासाठी काँग्रेसमधून चार नावे पुढे आली आहेत. भोरचे आमदा संग्राम थोपटे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

थोपटेंचं नाव जवळपास निश्चित

पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीतून नापसंती आहे. तर अशोक चव्हाण या पदासाठी इच्छूक नसल्याचं समजतं. नितीन राऊत यांनाही ऊर्जा खातं सोडायचं नसल्याने अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर पक्षातून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे येत्या 27 डिसेंबर रोजी थोपटे अर्ज भरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

कोण आहेत संग्राम थोपटे

संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत आहे. सर्वाधिक चर्चेतील आमदार म्हणून संग्राम थोपटे यांना ओळखलं जातं. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार म्हणून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या चार दशकांपासून भोर विधानसभा मतदारसंघावर थोपटे कुटुंबाची सत्ता आहे. संग्राम थोपटे यांनी मतदारसंघात अनेक विकासाची कामे करून मतदारसंघावर पकड कायम ठेवली आहे. अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवल्यानंतरही त्यांनी राजकारणात स्वत:चा ठसा उमटवला आहे.

थोपटे कुटुंबाची सत्ता

संग्राम नारायण थोपटे हे 38 वर्षाचे आहेत. ऐन तरुण वयातच त्यांना विधानसभेवर जाता आलं. त्यामुळे दिग्गज नेत्यांची भाषणं, त्यांचा अभ्यास आणि कामाची पद्धत पाहून थोपटे यांची जडणघडण झाली. पुण्यातील भोर हा त्यांचा विधानसबा मतदारसंघ. बीएपर्यंत शिक्षण घेतलेले थोपटे हे व्यवसायाने शेतकरी आहेत. भोरमध्ये गेल्या चार दशकांपासून थोपटे पितापुत्रांची सत्ता आहे. ‘भोर म्हणजे थोपटे’ व ‘थोपटे म्हणजे भोर’ हे समीकरण झालेलं आहे. चौरंगी लढत असो की थेट सामना असो… थोपटे यांनी प्रत्येक आव्हान पलटवून लावलं आहे.

कोण आहेत संग्राम थोपटे?

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत

ते पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात

संग्राम थोपटे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांना होती

मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केली होती

संबंधित बातम्या:

अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबर रोजी; नवा अध्यक्ष कोण? राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं

Gorai Car Accident | भाचीचं ऐकलं असतं तर? ड्युटीवर निघालेल्या मामाचा कारच्या धडकेत मृत्यू

लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवा, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.