साहेब मी गद्दार नाही… राऊत बंधुंनी शिंदे गटाला डिवचले, दैनिक ‘सामना’तील ‘ती’ जाहिरात होतेय व्हायरल

या जाहिरातीत फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देण्यात आला आहे. संजय राऊत किंवा सुनील राऊत यांचा फोटो देण्यात आलेला नाही. शिवाय जाहिरातीत सर्वात वर शिवसेनचं मशाल चिन्ह छापण्यात आलं आहे.

साहेब मी गद्दार नाही... राऊत बंधुंनी शिंदे गटाला डिवचले, दैनिक 'सामना'तील 'ती' जाहिरात होतेय व्हायरल
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 9:32 AM

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या 23 जानेवारी रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने दैनिक ‘सामाना’तील पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीची चर्चा रंगताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी सामनात ही जाहिरात दिली आहे. त्यावर साहेब मी गद्दार नाही… असा मजकूर ठळक अक्षरात छापण्यात आला आहे. मजकूरासोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. राऊत बंधुंनी या जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे गटावर निशाणा साधल्याने आता शिंदे गट त्यावर काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राऊत बंधुंनी मुखपत्र ‘सामना’च्या मुखपृष्ठावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारी जाहिरात दिली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असल्याने आजच ही जाहिरात देण्यात आली आहे. त्यावर साहेब मी गद्दार नाही, असा मजकूर ठळक अक्षरात छापून शिंदे गटाला डिवचले आहे. त्यामुळे ही जाहिरात चांगली व्हायरल होताना दिसत आहे.

त्यात उमेदीने उभे राहू…

या जाहिरातीत आणखीही मजकूर छापण्यात आला आहे. गेलेल्या 40 गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद… जय महाराष्ट्र, असा निर्धारच संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी जाहिरातीतून व्यक्त केला आहे.

saamana

saamana

फक्त बाळासाहेबांचा फोटो

या जाहिरातीत फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देण्यात आला आहे. संजय राऊत किंवा सुनील राऊत यांचा फोटो देण्यात आलेला नाही. शिवाय जाहिरातीत सर्वात वर शिवसेनचं मशाल चिन्ह छापण्यात आलं आहे. त्याच्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव देण्यात आलं आहे.

गद्दार शब्दाचा उल्लेख

राऊत बंधुंनी या जाहिरातीतून शिंदे गटाला डिवचले आहे. या जाहिरातीत शिंदे गटाला झोंबणारा गद्दार हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट आता त्यावर कसा पलटवार करतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

उद्या जयंती

दरम्यान, उद्या 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत आणि इतर ठाकरे गटाचे नेते शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर येऊन अभिवादन करतील. यावेळी शिंदे गटाचे मंत्री किंवा आमदार अभिवादनासाठी येतात का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.