राम मंदिर तुम्ही नाही…त्यासाठी रंजन गोगोईंना खासदार केलं, फडणवीसांचा दावा राऊतांनी थेट खोडून दाखवला

राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. राम मंदिराचा प्रश्न मोदींनी सोडवला नाही. कोर्टाने सोडवला आहे.

राम मंदिर तुम्ही नाही...त्यासाठी रंजन गोगोईंना खासदार केलं, फडणवीसांचा दावा राऊतांनी थेट खोडून दाखवला
sanjay raut,
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 5:12 PM

मुंबई: राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. राम मंदिराचा प्रश्न मोदींनी सोडवला नाही. कोर्टाने सोडवला आहे. त्यानंतर तेव्हाचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी खासदार करण्यात आले, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाचं प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराचा प्रश्न काही मोदींनी सोडवला नाही. मोदींनी करून नाही दाखवलं. ते सर्वोच्च न्यायालयाने करून दाखवलं. त्या बदल्यात सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळ मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केलं, असं राऊत म्हणाले.

कारसेवकांना कोणताही पक्ष नव्हता

राम मंदिराच्या मुद्द्यावर कोणी काही म्हटलं तरी इतिहास, दस्ताऐवज रेकॉर्ड्स आहेत. सीबीआय स्पेशल कोर्ट निर्माण झालं त्यासमोरचे साक्षीपुरावे आहेत, बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना आरोपी केलं होतं. आडवाणींबरोबर ठाकरे त्यातील एक आरोपी आहेत. मग कोर्ट मूर्ख होते का? शेकडो कारसेवक मुंबईतून गेले तेव्हा त्यांना कोणताही राजकीय पक्ष नव्हता. अगदी विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे, चंद्रकांत खैरे, सतीश प्रधान अनेक लोक आमचे इथून गेले होते. त्या काळातील सामना पाहिला तर कोण कोण कुठून निघाले त्याची मॉनिंटरींग मुंबईतून होत होती. सेना भवनात त्या काळात वॉर रूम तयार झाली होती, असं त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी वातावरण तापवलं

राम मंदिराच्या आंदोलनात शिवसेनेचं योगदान ऐतिहासिक आहे. हा लढा थंड पडला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो आणि वातावरण तापवलं. सरकारला जाग आली. अयोध्येशी आमचा संबंध काय हे रामाला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

तेव्हा तुम्ही कुठे होता?

1992 साली बाबरीच्या पतनानंतर मुंबईत दंगा उसळला होता. ती हिंदुत्वाची सर्वात मोठी लढाई होती. त्यासाठी आमच्या शेकडो सैनिकांचं बलिदान झालं आहे. आम्ही न्यायालयात उभं राहिलो, आमच्यावर खटले झाले. तेव्हा तुम्ही कुठे होता?, असा सवाल त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Why I killed Ganghi विरोधात काँग्रेस आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत केली ही मागणी

Beed : अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भरला आठवडी बाजार, भाजीपालाही मोफत

फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्या चिन्हावर लढला होतात, राऊतांनी भुजबळांसह सेनेच्या वाघांची यादी वाचली

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.