अनिल परबच काय, अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते, कितीही नोटिसा पाठवा : संजय राऊत
ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली हा मुख्यमंत्र्यांना धक्का वगैरे काही नाही. अनिल पबरच काय अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. (sanjay raut slams bjp over ed notice to anil parab)
मुंबई: ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली हा मुख्यमंत्र्यांना धक्का वगैरे काही नाही. अनिल पबरच काय अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री त्यांच्या जवळचा आहे. त्यामुळे कितीही नोटिसा पाठवा. आम्ही घाबरणारे आणि डगमगणारे नाही, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. (sanjay raut slams bjp over ed notice to anil parab)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी परिवहन मंत्री अनिल पबर यांना ईडीने पाठवलेल्या नोटिशीवरून भाजपला सुनावले आहे. भाजपच्या नेत्यांना या या दिवशी अनिल परबांना चौकशीला बोलवणार हे कसं कळतं? किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कळतं… अजून दहा लोकांना महितीय… काय चाललंय? नोटिसा पाठवा, प्रेम पत्र आहेतही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाठवलेली. आम्ही त्यांना उत्तर देऊ.. आमच्यावर कायदेशीर कारवाई होतेय म्हणून आम्ही पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना धमक्या वगैरे देणार नाही. आम्ही या प्रक्रियेला पूर्ण सामोरं जाऊ, अनिल परब उत्तर देण्यास समर्थ आहेत, असं राऊत म्हणाले.
मग आरती करायची काय?
माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरीही अशा नोटीस आल्या. परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. ते मंत्री आहेत त्यापेक्षा ते शिवसैनिक आहेत. शिवसेना कमजोर होईल, सरकारला तडे जातील आणि टपून बसलेल्या डोमकावळ्यांचा फायदा होईल असं होणार नाही. असे घाव आम्ही पचवले आहेत. आमची चिंता, अनिल परबांची चिंता अजिबात करू नका, असं सांगतानाच केंद्रीय मंत्र्यांवर कायदेशीर झाली. या देशात कोणावरही होऊ शकते. जर एखादी जबाबदार व्यक्ती कायद्याचं पालन न करता बेफाम वागली तर कायदेशीर कारवाई होईल. माझ्यावरही होऊ शकते. कायद्याचं उल्लंघन केल्यावर आरती करायची का? असं नाही होतं. विशेषत: जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींनी विशेष जबाबदारीने वागलं पाहिजे, असे टोलेही त्यांनी लगावले.
दीवार टुटेगी नही, कितना भी सर पटकलो
मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अनेक लोक आहेत. अनिल देशमुखही मुख्यंत्र्यांच्या शरद पवारसाहेबांच्या जवळचे होते. अनिल परबच नाही तर अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे नोटिसा पाठवल्या तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं सांगतानाच लव लेटर येत आहेत. सरकारला दोन वर्षे होत आहेत. सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल. दीवार टूटेगी नही, कितना भी सर पटकलो. लव लेटरचं स्वागत करतो. कितीही पत्र काढा, आमचे लाखो शिवसैनिक तयार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.
रक्ताची किंमत मोजावी लागेल
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. हरियाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांवर हल्ला झाला. जालियनवाला बाग हत्याकांडासारखा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांनी रक्त सांडलं. या रक्ताची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप शासित राज्यात मंदिरे उघडली का?
भाजपने मंदिरे उघडी करण्यासाठी संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू केलं आहे. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. मंदिरं इतर राज्यात उघडली आहे का पाहा. विशेषत: भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मंदिरं उघडली का ते पाहा आधी. हिंदुत्ववादी केद्रांतल सुद्धा सरकार आहे असं आम्ही मानतो. त्यांनाही चिंता आहे, पण तेच काळजी घ्या म्हणून सांगत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. (sanjay raut slams bjp over ed notice to anil parab)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 August 2021 https://t.co/ZKb2sr6sXN #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
संबंधित बातम्या:
काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान
जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक, खडसे-महाजन-गुलाबरावांची एकत्र हजेरी?
(sanjay raut slams bjp over ed notice to anil parab)