VIDEO: माथी भडकवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, कठोर कारवाई करा, शंभुराज देसाई यांचे आदेश

मालेगाव, नांदेड, भिवंडी आणि अमरावतीत मुस्लिम बांधवांची माथी भडकवून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कारवाई करा. वातावरण चिघळवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका.

VIDEO: माथी भडकवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, कठोर कारवाई करा, शंभुराज देसाई यांचे आदेश
Muslim protestants
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 7:42 PM

मुंबई: मालेगाव, नांदेड, भिवंडी आणि अमरावतीत मुस्लिम बांधवांची माथी भडकवून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कारवाई करा. वातावरण चिघळवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, असे आदेशच गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांना दिले आहेत.

शंभूराज देसाई यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हे आदेश दिले आहेत. सरकारने या घटनेची गंभीरपणे देखल घेतली आहे. पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. काही समाजकंटक वातावरण भडकवत असतात त्यांना सोडू नका. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील काही शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून समाजाचा माथी भडकवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.

यंत्रणांना सतर्क केलं होतं

यापूर्वीही बाहेरच्या राज्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटू नये म्हणून यंत्रणांना सतर्क केलं होतं. पण नांदेड, मालेगाव या दोन तीन ठिकाणी काही प्रकार घडला. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जमाव पांगवण्यात आला. कठोर कारवाई करण्याचे पोलीसांना आदेश दिले आहेत. एकाही व्यक्तीला सोडणार नाही, असं देसाई यांनी सांगितलं.

अश्रूधुराचे नळकांडे फोडले

नांदेडमध्ये परवानगी नसातना मोर्चा निघाला होता. मोर्चा निघताच हिंसक वळण लागलं. पोलिसांवर दगडफेक झाल्याने पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला. काही ठिकाणी अश्रूधुराचे नळकांडेही फोडण्यात आले आहेत. मात्र, आता नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत असून संशयितांना ताब्यात घेण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नांदेडमध्ये पाच हजार जमावांचा मोर्चा

नांदेडमध्ये पाच ते सहा हजार मुस्लिम बांधव जमाव झाले होते. घोषणाबाजी देत हा मॉब येत होता. आमच्या पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. नांदेडमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नका. मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज असतील तर ते आम्हाला द्या. त्यावरून कारवाई करू, असं नांदेड पोलिसांनी सांगितलं. तसेच नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यांना काही निर्देश दिले होते, असंही पोलिसांनी सांगितलं.

त्यांना धडा शिकवा: चंद्रकांत पाटील

राज्यातील काही शहरात त्रिपुरातील घटनेचे पडसाद उमटल्यानंतर त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विदेशात जरी घटना घडली तर भारतात हिंसा करायची हे न कळणारं आहे. देशाचे नागरिक आहात तर मूठभर लोक देशभक्त मुस्लिमांना का बदनाम करतात? मुस्लिम समाजाला बदनाम करणाऱ्या या मूठभर लोकांना त्यांना धडा शिकवला पाहिजे, असं सांगतानाच परिस्थिती चिघळू नये याकडे सरकारने लक्ष द्यावं असं आवाहन पाटील यांनी केलं. तर, लोकशाहीत काही लोक काहीही बोलतात. त्यामुळे तुम्ही संतप्त होऊ नका. वातावरण बिघडवू नका. शांतता पाळा. आंदोलन चिघळू देऊ नका, असं आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.

संबंधित बातम्या:

अमरावतीत मुस्लिम संघटनांकडून त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद, मोर्चाला हिसंक वळण, 2 पोलीस जखमी

त्रिपुरातील घटनेचे नांदेडमध्ये तीव्र पडसाद; मुस्लिम समाजाच्या मोर्चाला गालबोट, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड

Afghanistan Bomb blast: मशिदीत स्फोट, मौलवीसह 12 लोक जखमी, 3 मृत्यू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.