भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो; राऊतांनी उडवली खिल्ली

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे भाजने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on complaints against cm uddhav thackeray)

भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो; राऊतांनी उडवली खिल्ली
sanjay raut
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 12:59 PM

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात अपशब्द वापरल्यामुळे भाजने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. भाजप हा फार महान पक्ष आहे. ते परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतात, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. (shiv sena leader sanjay raut reaction on complaints against cm uddhav thackeray)

संजय राऊत यांनी भुवनेश्वरहून आल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपची खिल्ली उडवली. भाजप कुणावरही कारवाई करू शकतो. इतका महान पक्ष आहे तो. तो परग्रहावरील लोकांवरही गुन्हे दाखल करेल. त्यांच्या हातात यंत्रणा आहे. ते काही करू शकतात, असा हल्ला राऊत यांनी चढवला.

थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ऐकायला आला का?

तुम्हाला या थप्पडीचा आवाज सहा वर्षाने ऐकायला आला का? तुमच्या कानात काही तरी प्रॉब्लेम दिसतोय. आमच्याकडे कानाचे सर्जन आहेत. ज्यांना ही थप्पड सहा वर्षानंतर ऐकायला आली त्यांच्याकडे सर्जन पाठवून देण्यात येईल, असा टोला त्यांनी लगावला.

गहजब माजवण्याचं कारण नाही

खरं तर विषय संपलेला आहे. हा विषय कोर्टात प्रलंबित आहे. त्यावर काय चर्चा करायची? महाराष्ट्रात धमकी देण्याचा एक गुन्हा घडला. अशी धमकी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री मुख्यमंत्र्यांना दिली जाते तेव्हा गुन्हा दाखल होतो. त्यानंतर पोलीस तपास सुरू करतात. ज्यांनी गुन्हा दाखल केला आणि अटक केली त्या पोलिसांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांना निनावी धमकीचं पत्रं आलं होतं. ते पत्रं पाठवणारे आत आहेत. सुटले नाहीत. त्यांच्याविरोएधात काय पुरावे आहेत याबाबत संभ्रम आहे. योगी आदित्यनाथ यांनाही धमकी आली तेव्हा धमकी देणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत. मोदींनाही धमक्या येत असतात. त्यामुळे धरपकडी होतात. हे प्रमुख लोकं घटनात्मक पदावर असताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे यंत्रणेचं काम आहे. त्यामुळे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे मारण्याची धमकी दिली तर कितीही मोठा माणूस असेल तर कारवाई केली जाते. देशात तालिबानी पद्धतीचं राज्य नाहीये. कायद्याच्या रखवालदारांनी काही कारवाई केली असेल तर त्यात गहजब माजवण्याचं कारण नाही, असंही ते म्हणाले.

सूडबुद्धीची व्याख्या समजून घ्या

सूडबुद्धीची एकदा व्याख्या समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आमच्याविरोधात सूडाने कारवाई होत आहे. सूडाने कारवाया करायला आमच्या हातात सीबीआय ईडी नाही. या देशात कुठे आणि काय सूडाने कारवाया होतात या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका. अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक आणि देशातील अनेक लोकं यांच्याविरोधात ज्या कारवाया सुरू आहेत. त्याला सूडाच्या कारवाया म्हणतात. तुमच्याकडे तपास यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही सूडाच्या कारवाया करता आणि त्या सूडाच्या कारवायांना कायदेशीर कारवाया म्हणता. महाराष्ट्र धमकीबद्दल कारवाई झाली तर ती सूडाची कारवाई? ती सूडाची असेल तर बिनबूडाची असेल. कारवाई कायदेशीर असते. जर कायदेशीर कारवाई नसेल तर ती न्यायालयात टिकत नाही. अजूनही या देशातील न्यायालये काही प्रमाणात स्वतंत्र आहेत. आणि न्यायबुद्धी स्वतंत्र बाण्याने अजूनही न्यायदान करत असते, असंही त्यांनी सांगितलं. (shiv sena leader sanjay raut reaction on complaints against cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, संजय राऊतांनी पुन्हा नारायण राणेंना डिवचले

अनिल परब पोलिसांच्या संपर्कात असलेला व्हिडीओ, आता त्याच व्हिडीओत दिसणारे उदय सामंत म्हणतात..

अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही, राऊत कडाडले

(shiv sena leader sanjay raut reaction on complaints against cm uddhav thackeray)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.