आतली बातमी, ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होणार?

ठाकरे गटाच्या गोटात सध्या जोरदार हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाची आज मुंबईत ट्रायडेंट हॉटेलमध्ये अतिशय महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत काय-काय चर्चा होते? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

आतली बातमी, ठाकरेंच्या पक्षाची ट्रायडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होणार?
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 16, 2024 | 3:36 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी व्ह्यूरचना आखण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यासह आणखी काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

राज्यातील सर्वच पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पावसाळी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आता सगळ्याच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची व्ह्यूरचना आखण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीत राज्यात विशेषत: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सामना बघायला मिळेल. महाविकास आघाडी सध्या चांगलीच उत्साहात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे.

ठाकरे गटाची याआधीदेखील एक बैठक

लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या दोन संयुक्त बैठका पार पडल्या आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असावा, प्रचार कसा असावा आणि व्ह्यूरचना काय असावी? याबाबत या बैठकांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची देखील एक महत्त्वाची बैठक याआधी पार पडली होती. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. महाविकास आघाडीत आपल्याला कोणत्या जागा मिळाव्यात किंवा कोणत्या जागांसाठी आग्रही राहावं याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. यानंतर आता ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांच्या दुसऱ्या बैठकीतही विधानसभा निवडणुकीसाठी व्ह्यूरचना आखण्यात येत आहे.

मविआचा 96-96-96 चा फॉर्म्युला?

महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपाबाबत सूत्रांकडून एक अंदाज व्यक्त केला जातोय. महाविकास आघाडीत आगामी निवडणुकीत समसमान जागावाटप केलं जाऊ शकतं. तीनही पक्षांना प्रत्येकी 96 जागांचं वाटप केलं जाऊ शकतं. तसेच आपापल्या मित्रपक्षांना आपल्या कोट्यातून जागा सोडल्या जाऊ शकतात.

ठाकरे गटाच्या आजच्या बैठकीत चर्चा काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट आणि काँग्रेसला 100 जागा हव्या आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटालाही जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. ज्या पक्षाच्या जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरवला जाऊ शकतो. त्यामुळे जास्त जागा मिळाल्या तर जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे. या विचाराने प्रत्येक पक्षाकडून जास्तीत जास्त जागा मागितल्या जाण्याची शक्यता आहे. याचबाबत साधकबाधक व्ह्यूरचना आखण्यासाठी ट्रायडेंट हॉटेलमध्ये ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.