MBBSची एकच जागा रिक्त; मेडिकल आणि डेंटल प्रवेशासाठी उत्तम प्रतिसाद
MBBS अभ्यासक्रमांसाठी यंदा जागांची वाढ होऊनही फक्त एकच जागा रिक्त राहिली आहे. तर BSC नर्सिंग अभ्यासक्रमाच्या 153 आणि दंत वैद्यकीय (बीडीएसच्या) सर्वाधिक 87 जागा रिक्त राहिल्या आहेत.
वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय (Medical and Dental) प्रवेशासाठी उत्तम प्रतिसाद मिळत असून MBBS अभ्यासक्रमांसाठी यंदा जागांची वाढ होऊनही फक्त एकच जागा रिक्त राहिली आहे. तर BSC नर्सिंग अभ्यासक्रमाच्या 153 आणि दंत वैद्यकीय (बीडीएसच्या) सर्वाधिक 87 जागा रिक्त राहिल्या आहेत. सीईटी सेलने मेडिकल प्रवेशाची (Medical Admission) गेल्या तीन वर्षांची आकडेवारी जाहीर केली आहे. एमबीबीएसच्या अभ्यासक्रमांसाठी यंदा 6 हजार 719 जागा होत्या. त्यापैकी 6 हजार 718 जागांवर प्रवेश झाले आहेत.
दंतवैद्यक पदवी अभ्यासक्रमासाठी 2 हजार 675 जागांपैकी 2 हजार 588 जागांवर प्रवेश झाले आहेत. तर 87 जागा रिक्त राहिल्या आहेत. नर्सिंगसाठी 5 हजार 725 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बीएडएस अभ्यासक्रमांसाठी जागांची कपात होऊनही 87 जागा रिक्त राहिल्या आहेत.
बीएस्सी नर्सिंगला मोठी मागणी
बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमांसाठी यंदा मोठी मागणी आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जागांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 5 हजार 860 जागा होत्या. त्यापैकी 5 हजार 707 जागांवर प्रवेश झाले आहेत. त्यापैकी 153 जागा रिकाम्या राहिल्या आहेत. गेल्या वर्षी 5 हजार 270 जागा होत्या, त्यापैकी 4 हजार 799 जागा भरल्या होत्या.
2021-22 या वर्षातील जागा आणि प्रवेश
एमबीबीएस – 6719 जागा, 6718 प्रवेश बीडीएस दंत- 2675 जागा, 2588 प्रवेश बीएएमएस- 5548 जागा, 5544 प्रवेश बीएचएमएस- 4215 जागा, 4154 प्रवेश युनानी- 410 जागा, 410 प्रवेश बीएस्सी नर्सिंग- 5860 जागा, 5707 प्रवेश