Maharashtra Political News live : उद्धव ठाकरे यांचा नारायण राणे यांच्यावर घणाघात

| Updated on: Apr 28, 2024 | 11:36 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 28 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : उद्धव ठाकरे यांचा नारायण राणे यांच्यावर घणाघात

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. निवडणूक आयोगाची नजर उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर आहे. कमी खर्च दाखवल्याबद्दल धारशिव लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. उद्धव ठाकरे कोकणात प्रचारसभा घेणार आहे. त्याचवेळी मनसे नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी कोकणात येत आहेत. नागपुरात पहिल्या टप्यात झालेल्या निवडणुकीत लालपरीने 2 दिवसांत 54 लाख रुपये कमविले. नागपुरात सकाळपासून ढगाळ आणि पावसाचं वातावरण आहे. नाशिक लोकसभेत साधू मंहतांची एन्ट्री झाली आहे. तीन साधू महंत नाशिक लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरनंद महाराज आणि अनिकेत शास्त्री महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Apr 2024 09:55 PM (IST)

    मोदींच्या पुण्यातील सभेला अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर उपस्थित रहाणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेला मनसेकडून अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर उपस्थित रहाणार आहेत.  उद्या संध्याकाळी पुण्यात नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. भाजपकडून अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना सभेचे निमंत्रण आहे.  जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे.

  • 28 Apr 2024 09:43 PM (IST)

    काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

    कोल्हापूर : काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या हॉटेलमध्ये काल रात्री 12 वाजता जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी भेटले. या भेटीत काही नावे काढून कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचा सतेज पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी काँग्रेसने पंचशील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे.

  • 28 Apr 2024 01:57 PM (IST)

    अंबरनाथमध्ये महायुतीचा संवाद मेळावा

    अंबरनाथमध्ये महायुतीचा संवाद मेळावा पार पडला. कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात केलेली कामे घेऊन घरोघरी पोहोचा!, असं आवाहन महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलं.  अंबरनाथ आणि बदलापूरात लवकरच मेट्रो येणार असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. मेळाव्यात मनसे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

  • 28 Apr 2024 01:45 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांची बार्शीत जाहीर सभा

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बार्शीत जाहीर सभा होतेय. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बार्शीत आहेत.  बार्शीतील लक्ष्मी सोपान मार्केट यार्डात जाहीर सभा होत आहे.

  • 28 Apr 2024 01:30 PM (IST)

    ठाण्यातून शिवसेनेचा उमेदवार कोण असणार?

    ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांचे नाव जवळपास निश्चित होतंय. ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक आणि रविंद्र फाटक हे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. असं असताना आता अचानक नरेश म्हस्के यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरीत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. यावेळी काही नावांमध्ये बदल ही होण्याची शक्यता नाकारतां येत नाही.

  • 28 Apr 2024 01:15 PM (IST)

    विश्वजीत कदम यांची भूमिका काय?

    सांगलीची उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून राजकारण चांगलेच तापले होते. काँग्रेसचे विशाल पाटील विश्वजीत कदम यांनी यासाठी अतोनात प्रयत्न केले होते. आज प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचार काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल, असं विश्वजीत कदम यांनी सांगितले.

  • 28 Apr 2024 12:54 PM (IST)

    शरद पवार देशाचे शक्तीशाली नेते- संजय राऊत

    शरद पवार हे देशाचे शक्तीशाली नेते असल्याने नुकताच संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 28 Apr 2024 12:47 PM (IST)

    छगन भुजबळ यांचे मोठे विधान

    उज्वल निकम उत्कृष्ट असे वकील आहेत. राज्याच्या देशाच्या विरोधीचे आतंकवादी आहेत, त्यांच्याविरुद्ध यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

  • 28 Apr 2024 12:29 PM (IST)

    प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते- प्रकाश शेंडगे

    प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर झालेला हल्ला अयोग्य आहे. प्रकाश शेंडगे हे ओबीसी चळवळीचे नेते आहेत. मला सगळ्यांना सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जे आहे त्या संविधानाने मताचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

  • 28 Apr 2024 12:18 PM (IST)

    उद्या पुण्यात रेस कोर्स येथे नरेंद्र मोदी यांची सभा

    उद्या पुण्यात रेस कोर्स येथे नरेंद्र मोदी यांची सभा असून महायुतीच्या वतीने सर्वाना आवाहन करतो की सभेला यावे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

  • 28 Apr 2024 12:05 PM (IST)

    अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका

    व्यक्तीगत काम कोणी केली असतील तर तो व्यक्ती खूप मोठा आहे. स्वतःच्या खिशातून अशी काम केली जनतेच्या टॅक्समधून काम होत असतात. स्वतःकडे कोणी श्रेय घेत असेल तर सगळ्याच मतदारसंघात जाणारी काम ही टॅक्सच्या निधीतून जातात.

  • 28 Apr 2024 11:00 AM (IST)

    मतदानासाठी सवलत न दिल्यास कारवाई

    जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन मतदारसंघांत येत्या २० मे रोजी मतदान आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी किंवा दोन ते तीन तासांची सवलत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार सुट्टी किंवा दोन, तीन तासांची सवलत न मिळाल्याच्या प्राप्त तक्रारीनुसार संबंधित आस्थापनेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

  • 28 Apr 2024 10:53 AM (IST)

    मुख्यमंत्री कोल्हापूरात तळ ठोकून

    महायुतीचे ऊमेदवार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री केल्हापूरात तळ ठोकून आहेत. काल मध्यरात्रीपर्यंत स्थानिक पदाधिकार्यांसोबत त्यांच्या बैठका सुरू होत्या. छत्रपती शाहू महाराज यांच्याशी गादीचा वाद सुरू असलेल्या राजवर्धन कदम बांडे यांचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली.

  • 28 Apr 2024 10:40 AM (IST)

    चार उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी पुण्यात

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या पुण्यात सभा होत आहे. पुण्यातील रेस कोर्स मैदानावर होणार पंतप्रधानांची जाहीर सभा होईल.28 एकर मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या ही सभा होत आहे.

  • 28 Apr 2024 10:31 AM (IST)

    डॉ. सुभाष भामरे भरणार उमेदवारी अर्ज

    धुळे लोकसभा उमेदवार डॉ.सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत.उपमख्यमंत्री यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, दादा भुसे, जयकुमार रावल, गिरीश महाजन, विजय चौधरी यांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

  • 28 Apr 2024 10:20 AM (IST)

    भुजबळ समर्थक लोकसभेच्या रिंगणात

    छगन भुजबळ यांचं आता महायुतीत दबावतंत्र सुरु झाल्याची चर्चा आहे. समता परिषदेच्या मध्यमातून भुजबळांचं ओबीसी दबावतंत्र सुरु आहे. नाशिक आणि संभाजी नगर मधून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज भरले आहेत.राज्यातील ओबीसींची ताकत दाखवण्यासाठी भुजबळांचे समर्थक लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे.

  • 28 Apr 2024 10:09 AM (IST)

    नाशिकची जागा शिवसेनेचा लढवेल-हेमंत गोडसे

    नाशिकच्या जागेचा तिढा या अगोदर सुटलेला आहे ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनाच लढवेल, असे हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केले. महायुतीचा ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार सुरू आहे विद्यमान खासदार म्हणून महायुतीचा प्रचार सुरू केला आहे. प्रचार सुरु झालेला आहे. उमेदवारी औपचारिकता असल्याचे ते म्हणाले..

  • 28 Apr 2024 10:00 AM (IST)

    यंदाही ठाण्याची ‘तुंबई’; ३३ ठिकाणी साचणार पाणी

    ठाणे महापालिका हद्दीत यंदा पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणात वाढ झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या ठिकाणात दुपटीने वाढ झाली असून ही संख्या 33 झाली आहे. ही बाब पालिकेच्या सर्वेक्षणात उघडकीस आली आहे .गेल्या वर्षी ही संख्या 14 होती. परंतु यंदा त्यात वाढ होऊन सर्वाधिक दिवा प्रभाग समितीतील 16 सखल भागांचा समावेश आहे. दरवर्षी पावसाळ्यात ठाणे महापालिका क्षेत्रात विविध सखल भागात पाणी साचते त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो

  • 28 Apr 2024 09:44 AM (IST)

    Live Update | ठाणे आणि कल्याणमधून महायुतीचा अद्याप उमेदवार जाहीर नाही – संजय राऊत

    ठाणे आणि कल्याणमधून महायुतीचा अद्याप उमेदवार जाहीर नाही… उज्ज्वल निकम यांनी जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती… निकम उमेदवार असले तरी मविआच जिंकेल…. काही ठिकाणी महायुतीनं औपचारिकता म्हणून उमेदवार दिलेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 28 Apr 2024 09:35 AM (IST)

    Live Update | छावा संघटना लोकसभा निवडणूक लढवणार

    छावा संघटना लोकसभा निवडणूक लढवणार… उद्या करणार उमेदवाराची अधिकृत घोषणा… छावा संघटनेकडून 8 जण लढण्यास इच्छुक… बहुजन समाज ठरवेल तोच उमेदवार असणार… छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर यांची माहिती

  • 28 Apr 2024 09:20 AM (IST)

    Live Update | मॉर्निंग वॉकला आलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांचा कौल नेमका कुणाला ?

    पुणे शहरात राहणारे बारामतीकर कुठल्या पवारांच्या बाजूने ? पुण्यात कोण मारणार बाजी मोहोळ की धंगेकर ? पुण्यात नेमकी कुणाची हवा आणि का ? म्हणून आम्ही शरद पवार साहेबांच्या तुतारी सोबत नागरिकांनी व्यक्त केल्या शरद पवार यांच्या बद्दल आशा भावना… तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉकला आलेल्या पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच ठाम मत… मोठ्या झालेल्या पोराने बापालच काढलं बाहेर, बारामती लोकसभा मतदार संघातील मतदारांची अजित पवार यांच्यावर टीका…

  • 28 Apr 2024 09:08 AM (IST)

    Live Update |अन्न व पाण्याच्या शोधात जंगलातील मोरांची मानवी वस्तीकडे धाव

    उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक भागात पाणी टंचाई… मनुष्यांप्रमानेच वन्य प्राण्यांना व पक्षांनाही बसतोय पाणी टंचाईचा फटका… निसर्गातील नैसर्गिक पणीसाठे आटल्याने वन्यप्राणी व पक्षी व्याकूळ… पाणी टंचाई मुळे पाणी व अन्नाच्या शोधात जंगली प्राणी व पक्षी वळतायेत मानवी वस्तीकडे… आंबेगाव तालुक्यात सातगाव पठार भागात पाण्याच्या व अन्नाच्या शोधत मोरांचे थवे मनुष्यवस्तीकडे फिरकण्याचे प्रमाण वाढले आहे…

  • 28 Apr 2024 08:53 AM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत 66 कोटी 81 लाख रुपयांची भर

    तुळजाभवानी देवीच्या वार्षिक उत्पन्नात विक्रमी 66 कोटी 81 लाख रुपयांची भर पडली आहे. भक्तांनी देवीला अर्पण 16 किलो सोने व 270 किलो चांदी अर्पण केली आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी ही माहिती दिली.

  • 28 Apr 2024 08:36 AM (IST)

    नाशिकमध्ये छावा निवडणूक रिंगणात

    नाशिक लोकसभेची निवडणूक छावा संघटना लढवणार आहे. सोमवारी छावा संघटना उमेदवाराची घोषणा करणार आहे. छावा संघटनेकडून 8 जण लढण्यास इच्छुक आहेत, असे छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर यांनी सांगितले.

  • 28 Apr 2024 08:20 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिवंडीत सभा

    कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांकरीता येत्या १० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार आहे. देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी यांचा झंझावात प्रचार सुरु आहे.

  • 28 Apr 2024 08:02 AM (IST)

    भांडूपमध्ये रोकड जप्त

    भांडूप येथील सोनापूर सिग्नल येथे नाकाबंदी दरम्यान तीन ते साडेतीन कोटींची कॅश पकडण्यात आलीय. गाडी एटीएमचे पैसे वाहतूक करणाऱ्या वाहणासारखी असून वाहन चालकाकडे कुठलाही पुरावा नसल्याच्या संशयावरून गाडी निवडणूक आयोग भरारी पथकाने पोलीस ठाण्यात आणली.

Published On - Apr 28,2024 8:01 AM

Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.