मिशन महापालिका ! उद्धव ठाकरे यांचे आता उत्तर भारतीय व्होटबँकेवर लक्ष; गोरेगावात संवाद साधणार

गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील नाहर निकेतन येथे सायंकाळी 5 वाजता उत्तर भारतीयांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

मिशन महापालिका ! उद्धव ठाकरे यांचे आता उत्तर भारतीय व्होटबँकेवर लक्ष; गोरेगावात संवाद साधणार
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 9:19 AM

मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मतांची बेगमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आधी गुजराती आणि जैन समाजाशी संवाद साधल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय व्होटबँकेच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. उद्धव ठाकरे आज गोरेगावात उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोशल इंजीनिअरिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्या आजच्या कार्यक्रमाकडे पाहिलं जात आहे.

जैन धर्मीय व्होटबँकेप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय व्हॉटबँकेवरही लक्ष वेधलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करण्याची ठाकरे गटाने व्यूहरचना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उत्तर भारतीय समाजाने आयोजित केलेल्या संपर्क अभियानात उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

सायंकाळी कार्यक्रम

गोरेगावच्या राम मंदिर रोडवरील नाहर निकेतन येथे सायंकाळी 5 वाजता उत्तर भारतीयांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला स्वत: उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या परिसरात उत्तर भारतीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहून काय मार्गदर्शन करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या 15 दिवसांत उद्धव ठाकरेंनी जैन धर्मियांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून धर्मगुरुंचे आशीर्वाद घेतले होते. मुंबईत उत्तर भारतीय, जैन आणि गुजराती समाजाचे लाखो मतदार आहेत. त्यामुळे हे मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी ठाकरे गटाने प्रयत्न सुरू केले आहेत.

तेजस्वी यादव यांच्याशी भेट

दरम्यान, मधल्या काळात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं. पण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे.

आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या या भेटीनंतर पहिल्याांदाच उद्धव ठाकरे आज उत्तर भारतीयांशी संवाद साधणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

उत्तर भारतीयांची मुंबईतील ताकद

मुंबईची लोकसंख्या दीड कोटी आहे. त्यात उत्तर भारतीयांची लोकसंख्या 40 लाखाच्या आसापास आहे.

मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत. त्यापैकी 50 वॉर्डांमध्ये उत्तर भारतीयांची मते निर्णायक आहे. इतर 40 ते 50 वॉर्डात त्यांची मते दखल घेण्यासारखी आहेत. 2012मध्ये मुंबई महापालिकेत 15 उत्तर भारतीय नगरसेवक होते. 2017मध्ये ही संख्या जैसे थे होती.

मुंबईत एकूण फिरवाले सुमारे दीड लाख आहेत. त्यापैकी 60 टक्के फेरिवाले उत्तर भारतीय आहेत.

फळ विक्री, भाजी विक्री, सँडविच, वडापाव, पाणीपुरी आणि नारळपाणी विक्रीच्या व्यवसायातही उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणावर आहेत. रस्त्यावर बसून केस कापण्याचं कामही उत्तर भारतीय करतात.

पाणीपुरीच्या धंद्यात 90 टक्के फेरीवाले हे उत्तर भारतीय आहेत.

मुंबईत तब्बल दीड लाख टॅक्सी चालक आहेत. त्यातील 80 टक्के टॅक्सीचालक उत्तर भारतीय आहेत.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर नाका कामगार आहेत. रोजंदारी मजूर आहेत. त्यात उत्तर भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. दूध विक्रीच्या व्यवसायातही उत्तर भारतीयांचा टक्का सर्वाधिक आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.