मोठी बातमी ! संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, लोखंडी रॉड आणि स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल

संदीप देशपांडे रोज पहाटे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला जात असतात. त्याप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. शिवाजी पार्कात सकाळी बरीच गर्दी असते. लोक योगा आणि मॉर्निंग वॉकसाठी येत असतात.

मोठी बातमी ! संदीप देशपांडे यांच्यावर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, लोखंडी रॉड आणि स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल
sandeep deshpandeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 8:13 AM

मुंबई : मनसेचे नेते, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्लेखोर चेहऱ्यावर मास्क लावू आले होते. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे  जखमी झाले आहेत. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संदीप देशपांडे हे आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला शिवाजी पार्कात आले होते. यावेळी मॉर्निंग वॉक करत असतानाच अचानक काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना रॉड आणि स्टम्पने बेदम मारहाण करण्यात आली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संदीप देशपांडे प्रतिकार करू शकले नाही. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देशपांडे जखमी होऊन खाली कोसळले. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी देशपांडे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हल्लेखोर पसार झाले. त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ देशपांडे यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशपांडे यांची प्रकृती गंभीर नसल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मास्क लावून आले

काही हल्लेखोर तोंडावर मास्क लावून आले होते. या हल्लेखोरांनी देशपांडे यांच्यावर हल्ला करून तिथून पळ काढला. जखमी अवस्थेतील देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मनसेचे नेते, पदाधिकारी आणी कार्यकर्ते तात्काळ हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत.

गर्दी असूनही हल्ला

संदीप देशपांडे रोज पहाटे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला जात असतात. त्याप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. शिवाजी पार्कात सकाळी बरीच गर्दी असते. लोक योगा आणि मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. देशपांडे हे आपल्या रोखठोक राजकीय मतांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राजकीय स्टेटमेंटमुळे ते नेहमीच वादात असतात. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यामागे काही राजकीय धागेदोरे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

पूर्वनियोजित कट?

संदीप देशपांडे यांना कोणतंही संरक्षण नव्हतं. मागे त्यांना पोलीस संरक्षण देऊ केलं होतं. पण त्यांनी ते नाकारलं होतं. संरक्षणाशिवायच ते लोकांमध्ये मिसळायचे. त्याचाच फायदा घेऊन हा हल्ला करण्यात आला असावा असं सांगितलं जात आहे. तसेच हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा एक भाग असावा अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.