ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड, आंबेडकर आक्रमक, म्हणाले…

ओबीसींच्या आरक्षणासाठी आज वंचित बहुजन आघाडीने विधानभवनासमोर जोरदार आंदोलन केलं. वंचितच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून सोडला.

ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड, आंबेडकर आक्रमक, म्हणाले...
Prakash Ambedkar
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 1:30 PM

मुंबई: ओबीसींच्या आरक्षणासाठी आज वंचित बहुजन आघाडीने विधानभवनासमोर जोरदार आंदोलन केलं. वंचितच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण विधानभवन परिसर दणाणून सोडला. प्रचंड संख्येने आंदोलक जमल्याने त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरही संतापले आहेत. आता हे आंदोलन आम्ही गावपातळीपर्यंत घेऊन जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज विधानभवनावर वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धडक दिली. ओबीसींना आरक्षण मिळालच पाहिजे, अशी मागणी करतच हे आंदोलक विधानभवन परिसरात धडकले. अचानक शेकडो कार्यकर्ते आल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पोलिसांनी जमाव पांगवायला सुरुवात केली. तसा जमाव अधिक आक्रमक झाला. आंदोलक अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहून पोलिसांनी आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पोलीस आणि आंबेडकरांची चर्चा सुरू असतानाच इकडे आंदोलकांच्या जोरजोरात घोषणाही सुरू होत्या. त्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांची तात्काळ धरपकड करण्यास सुरुवात केली.

गावपातळीपर्यंत ओबीसींचा लढा नेणार

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या दोन्ही सरकारांना ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाहीये, असा दावा आंबेडकर यांनी केला. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई असणार आहे. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. राज्यभर हे आंदोलन घेऊन जाऊ. तालुका आणि गावपातळीपर्यंत ही लढाई लढली जाईल, असं आंबेडकर म्हणाले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल, असं ते म्हणाले. या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचंही वाटोळं केलं आहे. गरीब मराठ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

144 कलम लावण्यात आलं?

दरम्यान, वंचितच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. त्यालाही आंबेडकरांनी आक्षेप घेतला. कशाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लावण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. ते बरे झाल्यानंतर त्यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षणावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

भेटीत तृष्टता मोठी…कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!

VIDEO: हिंमत असेल तर अविश्वास ठरावा आणाच, तुमच्यासोबत कोण ते तरी कळेल?; नवाब मलिकांचा टोला

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.