VIDEO: दोन लग्न आणि एका साखरपुड्याची गोष्ट! राऊत, ठाकूर, पाटलांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; पाहा, विवाह सोहळ्यांचा थाटमाट

राज्यात आज दोन विवाह सोहळे आणि एका साखरपुड्याची चर्चा चांगलीच रंगली. शिवसेना नेते संजय राऊत यांची कन्येचा विवाह सोहळा थाटात पार पडला.

VIDEO: दोन लग्न आणि एका साखरपुड्याची गोष्ट! राऊत, ठाकूर, पाटलांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर; पाहा, विवाह सोहळ्यांचा थाटमाट
wedding ceremony in maharashtra
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 7:12 PM

मुंबई: राज्यात आज दोन विवाह सोहळे आणि एका साखरपुड्याची चर्चा चांगलीच रंगली. शिवसेना नेते संजय राऊत यांची कन्येचा विवाह सोहळा थाटात पार पडला. तर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचाही विवाह पार पडत आहे. त्याशिवाय धडाकेबाज क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरही लग्नाच्या बेडीत लवकरच अडकणार आहे. त्याचाही साखरपुडा आज पार पडला. त्यामुळे संपूर्ण मीडिया या दोन लग्न सोहळ्यांनी आणि शार्दुलच्या साखरपुड्याने व्यापून गेला.

पूर्वशीची धमाकेदार एन्ट्री

शिवसेनेची बुलंद तोफ आणि रोखठोक भाष्य करणारे नेते संजय राऊत यांची कन्या पूर्वशीचा विवाह सोहळा अत्यंत थाटात पार पडला. मुंबईत रेनन्सां हॉटेलात ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह पार पडला. या लग्नसोहळ्यात पूर्वशी आणि मल्हार यांनी धमाकेदार एंट्री घेतली. एखाद्या राजकुमारीप्रमाणे पूर्वशी हॉलमध्ये येताच वाजंत्र्यांनी तिचं सनईच्या सूरात स्वागत केलं. तर, नवरदेव मल्हार यांनी देखील एका विंटेज गाडीतून मांडवात एंट्री घेतली. या विवाह सोहळ्याला स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.

लेकाचं लगीन अन् गुलाबरावांनी ठेका धरला

शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील यांचा विवाह सोहळा पार पडत आहे. चोपडा तालुक्यातील शेतकरी सनपुले भगवान भिका पाटील यांची सुकन्या प्रेरणा हिच्यासोबत विक्रमचा विवाह होत आहे. चोपडा तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिरात हा लग्नसमारंभ होत आहे. या विवाह सोहळ्याला राज्य मंत्रिमंडळातील 14 मंत्री उपस्थित राहणार आहेत. काल विक्रम यांच्या हळदीचा कार्यक्रम होता. यावेळी अनेकांनी ठेका धरत नृत्य केलं. स्वत: गुलाबराव पाटील यांनी अहिराणी भाषेतील गीतांवर ठेका धरला. गुलाबरावांना पहिल्यांदाच गाण्यावर थिरकताना पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला.

शार्दुल क्लिन बोल्ड

आज आणखी एक साखरपुडा चर्चेत राहिला. तो म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकरचा. शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत एंगेजमेंट केली आहे. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रांगणात पार पडलेल्या एका साध्या सोहळ्यात हा साखरपुडा पार पडला. या समारंभासाठी केवळ 75 लोकांना आमंत्रित केले होते, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि दोघांचेही मित्र उपस्थित होते. एंगेजमेंटनंतर जवळपास एक वर्षानंतर शार्दुल ठाकूर आणि मिताली परुळकर लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर दोघेही लग्नबंधनात अडकू शकतात.

संबंधित बातम्या:

Photo : शार्दुल ठाकुरचा गर्लफ्रेन्ड मितालीसोबत साखरपुडा, लवकरच लग्नच्या बेडीतही अडकणार

Anil parab : हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या, लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश

Video | बापूंचा चरखा चक्क सलमान खानने चालवला! ‘अंतिम’च्या प्रमोशनसाठी ‘भाईजान’ साबरमती आश्रमात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.